दालनाचा एक प्राचीन प्रकार. प्वेब्लो लोक धार्मिक समारंभासाठी आणि उपासनेकरिता भूमिगत व गोलाकार कक्षाचा वापर करीत असत, त्यांना ‘किवा’ असे म्हणतात. किवा मधील भिंती रंगरंगोटीसह रंगीत भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. या जागेतच प्वेब्लो लोग तरुणपिढीचे दीक्षाविधी समारंभ देवदेवतांचे किंवा पितरांचे मुखवटे घालून ‘कॅचीना नृत्य’ करत असत.
प्राचीन किवाचे पारंपरिक गोलाकार रचना या निवासी प्वेब्लो वास्तुकलेतील चौकोनी आणि आयताकृती संरचनेच्या पूर्णत: विरोधी होत्या. पूर्वीचे प्वेब्लो (अनासाझी) लोकांची घरे गोलाकार आकारांची आणि घरात गोल खड्डा या स्वरूपांची असत. या लोकांपासूनच प्वब्लो जमात आली आहे. आठव्या शतकाच्या उत्तरार्धापासून किवा पद्धतीची वास्तुशैली निदर्शनास येते. त्याच्या आकारमानात कालानुरूप बदल होत विविधता दिसून येते. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात, मेसा व्हर्दीयन लोकांनी चौकोनी खड्डे बांधण्यास सुरुवात केली, त्यांना पुरातत्वशास्त्रज्ञ ‘प्रोटोकिवा’ म्हणतात. ते सामान्यतः ३ किंवा ४ फूट (९० किंवा १२० सेंमी.) खोल आणि १२ ते २० फूट (४ ते ६ मी.) व्यासाचे होते. दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आणि अकराव्या शतकाच्या सुरुवातीस किवा हे लहान वर्तुळाकार रचनांमध्ये विकसित झाले होते. ते सामान्यतः १२ ते १५ फूट (४ ते ५ मी.) रुंद होत्या. कॅचीना श्रद्धा प्रणाली पूर्व-कोलंबियन-नैऋत्येमध्ये १२५० च्या सुमारास उदयास आली, तर ‘किवा’सारख्या रचना खूप आधी विकसीत झाल्या होत्या. किवाच्या पृष्ठभागावर एक लहान छिद्र (लाकडाच्या फळीतून कोरलेले किंवा जमिनीत खोदलेले) जमातीच्या उत्पत्तीचे प्रतीकात्मक स्थान म्हणून असायचे. किवाचा सर्वांत महत्त्वाचा उद्देश धार्मिक विधींसाठी एक ठिकाण असला तरी, त्याचा वापर राजकीय बैठका आणि गावातील

किवा भित्तिचित्रांमध्ये जमातीच्या दैनंदिन जीवनातील पवित्र व्यक्तिरेखा किंवा दृश्ये दर्शविलेली असायची. या चित्रांची शैली भौमितिक असून त्यामध्ये वक्र रेषांपेक्षा सरळ रेषांवर भर दिलेला आहे आणि संपूर्ण भित्तिचित्र भिंतीभोवती एका रेषीय आरेखनामध्ये मांडले जाते. भित्तिचित्रांना गिलावा देऊन रंगवलेली असल्याने त्यात परिसरातील समृद्ध खनिज साठ्यांपासून बनविलेली उबदार, रंगीत रंगद्रव्य यांचा समावेश असायचा. जुन्या भित्तिचित्रांवर नवीन आरेखन रंगविण्यासाठी वारंवार गिलावा दिले जात असे; अलिकडच्या काळात अनेक किवा भित्तिचित्रांचे थर उघडून पुनर्संचयित केले गेले आहेत.
सांस्कृतिक बदल घडत असताना, विशेषतः ११५० ते १३०० दरम्यान किवाला समुदायात एक प्रमुख स्थान होते. तथापि काही किवा जमिनीच्या वर बांधले गेले. किवा वास्तुकला पुढील काळात अधिक विस्तृत झाली. उदा., किवामधील मनोरे आणि आणि ग्रेट किवामधील विशेष मजले. मेस व्हर्द (कोलोरॅडो) राष्ट्रीय उद्यानातील किवा सामान्यतः कुलपाच्या छिद्रांसारखे होते.
संदर्भ :
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.