अरविंद प्रभाकर जामखेडकर (Arvind P. Jamkhedkar)

जामखेडकर, अरविंद प्रभाकर : (६ जुलै १९३९). प्राच्यविद्या पंडित तसेच वाकाटककालीन कला व स्थापत्यशास्त्राचे जाणकार म्हणून लौकिक. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. त्यांचे वडील मालेगावच्या शाळेत शिक्षक होते.…

गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर (G. B. Deglurkar)

देगलूरकर, गोरक्षनाथ बंडामहाराज : (१० सप्टेंबर १९३३). प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ; मंदिरस्थापत्य, मूर्ती व शिल्पवैभवाचे ख्यातकीर्त संशोधक आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती. मराठवावाड्यातील हिप्परगा (ता. लोहारा, जि. लातूर) येथे हरीभक्तपरायण…

मधुसूदन नरहर देशपांडे (M. N. Deshapande)

देशपांडे, मधुसूदन नरहर : ( ११ नोव्हेंबर १९२० – ७ ऑगस्ट २००८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि पुरावास्तूंचे जतनकार. जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. प्राथमिक शिक्षण…

शां. भा. देव (Shantaram Bhalchandra Dev)

देव, शांताराम भालचंद्र : (९ जून १९२३–१ ऑक्टोबर १९९६). आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्त्वज्ञ, भारतीय महापाषाणीय संस्कृतीचे संशोधक आणि पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजचे (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे) निवृत्त संचालक. त्यांचा जन्म…

परमेश्वरीलाल गुप्त (P. L. Gupta)

गुप्त, परमेश्वरीलाल : (२४ डिसेंबर १९१४ – २९ जुलै २००१). भारतीय नाणकशास्त्राचे विख्यात संशोधक, हिंदी साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे झाला. शालेय जीवनापासूनच भारतीय…