गुलमोहर (Peacock flower)

रस्त्याच्या कडेने शोभेसाठी व सावलीसाठी वाढविण्यात येणारा शोभिवंत वृक्ष. हा फॅबेसी कुलातील पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्स रेजिया आहे. गुलमोहर मूळचा मादागास्करमधील असून आता तो जगभर आढळतो. भारतातही तो सर्वत्र…

गुणसूत्रे (Chromosomes)

सर्व सजीवांच्या पेशींत आढळणारी धाग्यांसारखी सूक्ष्म संरचना. प्रत्येक गुणसूत्रात डीएनएचे रेणू असतात. डीएनए म्हणजे डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे जटिल रासायनिक संयुग. गुणसूत्रे आनुवंशिक पदार्थांची वाहक आहेत; या पदार्थांच्या एककांना जनुक (जीन) म्हणतात.…

अंकमूळ (Digital Root)

‘अंकमूळ’ ही संकल्पना आकडेमोडीची पडताळणी करण्यासाठी उपयोगी आहे. दोन किंवा अधिक अंकी (दहापेक्षा मोठी नैसर्गिक संख्या) संख्येचे अंकमूळ शोधण्यासाठी प्रथम त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करावी. ही बेरीज दहा पेक्षा…

पंचविध कषायकल्पना

ज्यावेळी वनस्पतिज किंवा प्राणिज पदार्थ आहे त्या स्वरूपात शरीरात वापरता येऊ शकत नाही, त्यावेळी तो शरीराकरिता योग्य अशा स्वरूपात परिवर्तित करून वापरला जातो; त्याला ‘कषाय’ असे म्हणतात. ‘कष’ धातूपासून (‘हिंसा’…

Read more about the article गुग्गूळ (Guggul)
गुग्गुळाचा डिंक

गुग्गूळ (Guggul)

गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. उत्तर आफ्रिकेपासून मध्य आशियापर्यंत हा वृक्ष आढळतो. भारतात…

गिबन (Gibbon)

गिबन या मानवसदृश कपीचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील हायलोबेटिडी कुलात होतो. हा प्राणी म्यानमार, मलेशिया, बांगला देश, जावा, सुमात्रा, बोर्निओ, थायलंड, भारत इ. देशांमध्ये वर्षावनांतील दाट झाडीत आढळतो. त्याच्या…

गिनी पिग (Guinea pig)

स्तनी वर्गाच्या कृंतक गणातील व केव्हीइडी कुलातील प्राणी. याचे शास्त्रीय नाव केव्हिया पोरर्सेलस आहे. केव्हिया हा प्रजातिदर्शक पोर्तुगीज शब्द असून याचा अर्थ उंदीर, तर पोरर्सेलस हा जातिदर्शक लॅटिन शब्द असून याचा अर्थ छोटे डुक्कर. हा…

गिधा़ड (Vulture)

अ‍ॅक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे गिधाड समुद्रसपाटीपासून १,५२५ मी. उंचीपर्यंत व बंगाली गिधाड २,४४० मी.…

गालगुंड (Mumps)

विषाणूंच्या संसर्गामुळे माणासाला होणारा एक संसर्गजन्य रोग. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या खालील भागात असलेल्या लाळग्रंथी सुजून खूप वेदना होतात. या रोगाला…

गारवेल (Railway creeper)

जगभर सर्वत्र आढळणारी बहुपयोगी, सदाहरित व प्रसर्पी (सरपटत वाढणारी) वेल. गारवेल ही बहुवर्षायू वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयापोमिया पामेटा आहे. बागेत कुंपणावर व कमानीवर, गावांमध्ये आणि विशेषकरून बहुतेक रेल्वे…

पेशी चक्र (Cell Cycle)

पेशी चक्र म्हणजे पेशींमध्ये क्रमाने घडणाऱ्या घटना, ज्यांच्याद्वारे एका पेशीचे विभाजन होऊन दोन पेशी तयार होतात. जी पेशी विभाजित होते तिला ‘जनक पेशी’ म्हणतात आणि तयार झालेल्या पेशींना ‘जन्य (अपत्य)…

पेशी मृत्यू (Cell Death)

पेशींची जैविक कार्ये थांबण्याच्या घटनेला पेशी मृत्यू म्हणतात. पेशी मृत्यू ही एक नैसर्ग‍िक प्रक्रिया असून पेशी मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. बहुधा जुन्या पेशींची जागा नवीन पेशींनी घेतल्याने, एखाद्या रोगामुळे,…

पेशी (Cell)

सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक. सर्व सजीव पेशींचे बनलेले असून प्रत्येक पेशी स्वयंपूर्ण असते. सर्व पेशींमध्ये पेशीद्रव्य असून ते पेशीपटलाने वेढलेले असते आणि पेशीद्रव्यात प्रथिने, न्यूक्लिइक आम्ले यांसारखे…

ज्ञानमुद्रा (Dnyanmudra)

योगाभ्यासातील एक आसन प्रकार. हाताचा अंगठा हे विश्वात्म्याचे व तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट) हे जीवात्म्याचे प्रतीक मानलेले आहे. या दोहोंची जुळणी हे ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशा सुखावह  पद्धतीमध्ये बसून…

अंकचिन्हे (Numerals)

०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, आणि ९ ही एकूण दहा देवनागरी अंकचिन्हे आहेत. म्हणून ह्या अंकांच्या साहाय्याने केलेल्या संख्यांना आणि गणनाला ‘दशमान पद्धती’ किंवा ‘दशचिन्ह पद्धती’…