(प्रवाहआलेख; प्रवाहआलेखन). एक प्रकारचा आराखडा आहे, अल्गॉरिदमच्या (Algorithm; रीती) साहाय्याने संगणकीय कार्यप्रवाह (workflow) किंवा प्रक्रिया (process) दाखविता येतो. फ्लोचार्ट विविध प्रकारच्या चौरसाकृती आकृत्या (बॉक्सेस; Boxes) बाणांसह (Arrows) जोडून त्यांचा क्रम दाखवितो. फ्लोचार्टचा वापर विविध क्षेत्रांतील संगणकीय प्रक्रियेचा किंवा प्रोग्रामचे (आज्ञावल्याचे; Programme) विश्लेषण, डिझाइन, दस्ताऐवज किंवा व्यवस्थापनात केला जातो. सोप्या संगणकीय प्रक्रिया किंवा आज्ञावल्याचे  डिझाइन आणि दस्तावेजीकरण करण्यासाठीही फ्लोचार्टचा वापर केला जातो. संगणकीय प्रणालीमध्ये इतर प्रकारच्या आकृत्यांप्रमाणे, काय घडत आहे याची कल्पना करण्यासाठी मदत करतात आणि त्याद्वारे प्रक्रिया समजून घेण्यास देखील मदत होते.

फ्लोचार्ट मधील प्रतीके

फ्लोचार्ट हा अल्गॉरिदमचा एक चित्रात्मक रूप आहे. ज्यात सूचना दर्शवण्यासाठी प्रतीकांचा (सिम्बॉल; symbols) वापर केला जातो आणि हे प्रतीक अल्गॉरिदम कोणत्या दिशेने जातोय हे सांगतात. फ्लोचार्टमुळे संगणकीय आज्ञावल्या समजणे खूप सोपे बनते आणि आज्ञावल्या लिहिणे सोपे जाते. यामुळे आज्ञावल्यामधील चुका सुधारणे सरळ जाते. फ्लोचार्ट मध्ये संगणकीय आज्ञावल्याची भाषा (Programming language) शैली शामिल नसते. सामान्यतः फ्लोचार्ट विविध प्रकारांचे असतात. प्रत्येक प्रकाराच्या फ्लोचार्टमधे चौरस आकृत्यांना काही अर्थ आणि विशिष्ट चिन्हांकन (नोटेशन; Notation) असतात. फ्लोचार्टमध्ये दोन सामान्य प्रकारचे चौरस असतात :

एक म्हणजे प्रक्रिया चरण, सामान्यतः त्याला क्रिया (ॲक्टिव्हिटी; Activity) म्हणतात, आणि ते एक आयताकृती आकाराने निर्देशित केले जाते.
दुसरा म्हणजे निर्णय, सामान्यतः ते शंकू (डायमंड; Diamond) आकाराने निर्देशित केले जाते.

फ्लोचार्ट मधील प्रतीके
१. सीमांत (Terminal) – फ्लोचार्ट : सुरुवात आणि अंत करण्याकरिता.
२. इनपुट/आउटपुट (Input/Output) – फ्लोचार्ट : निर्णय दाखविण्याकरिता.
३. प्रक्रिया (Processing) – फ्लोचार्ट : गणनक्रिया दाखविण्याकरिता.
४. निर्णय (Decision) – फ्लोचार्ट : अटी, संकेत आणि निर्णय दाखविण्याकरिता.
५.  प्रवाहरेषा (Flow line) – फ्लोचार्ट : दिशा दाखविण्याकरिता.
६.  जोडक (Connector) – फ्लोचार्ट : दोन फ्लोचार्ट यांना जोडण्याकरिता.

विविध संगठनात्मक भागांचे नियंत्रणाचे वर्णन करण्यासाठी फ्लोचार्ट भिन्न भिन्न किंवा समांतर भागांमध्ये विभागले जातात, त्याला ‘क्रॉस-फंक्शनल (cross functional) फ्लोचार्ट’ असेही म्हणतात. एक क्रॉस-फंक्शनल फ्लोचार्ट लेखकांना कृती किंवा निर्णय घेण्याच्या जबाबदारीची आणि एका प्रक्रियेच्या वेगवेगळ्या भागांसाठी प्रत्येक संस्थात्मक एककांची जबाबदारी दर्शविण्यास परवानगी देतो. फ्लोचार्ट विशिष्ट प्रक्रियेबद्दल माहिती एकत्रित करण्यासाठी, प्रक्रियेचं कार्यप्रदर्शन मोजण्यासाठी, तसेच प्रक्रियेचे संरचनाचे वर्णन करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो.

कळीचे शब्द : #अल्गॉरिदम # कार्यप्रवाह #workflow #प्रक्रिया #process #आयताकृती #शंकू

संदर्भ :

समीक्षक : रत्नदीप देशमुख