कल्पनाचित्र

संघटनेतील सर्वोच्च अधिकारी आणि तिच्या कार्याची जबाबदारी असणारा व्यक्ती म्हणजे कार्यकारी प्रमुख होय. कार्यकारी प्रमुखाचे संघटनेतील प्रशासकांवर नियंत्रण असते, तो संघटनेच्या आर्थिक व्यवहारांचे नियमन करतो. संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे, त्यासाठी नियोजन आणि कामाचे वाटप करण्याची जबाबदारी कार्यकारी प्रमुखाकडे असते.

संघटनेतील विविध घटकांमध्ये सुसूत्रीकरण राखण्याचे काम त्याच्याकडे असते. कार्यकारी प्रमुखाचे आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण असते. संघटनेसाठी आवश्यक कार्ये तो करत असतो. ही कार्ये म्हणजेच संघटनेसाठी आवश्यक नियोजन, संघटन, दिशादर्शन, सेवक भरती, मार्गदर्शन, सुसूत्रीकरण, अहवाल आणि आर्थिक अंदाज तयार करणे होय. लोकप्रशासनामध्ये राजकीय कार्यकारी प्रमुख हाच प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो. उदा. पंतप्रधान हे देशाच्या प्रशासनाचे कार्यकारी प्रमुख असतात.