तरणतलावचे पुढील दोन प्रकार वापरले जातात :

(अ) भरण आणि उपसा प्रकार (Fill and draw type) : तलाव पाण्याने भरून ८ ते १० दिवस वापरला जातो.  त्यानंतर ते पाणी काढून टाकून नव्या पाण्याने भरला जातो.

(आ) एकदा भरलेले पाणी सतत शुद्ध करून त्याचे पुनर्चक्रीकरण (Recirculation) केले जाते.  ह्यासाठी लागणारी यंत्रणा पुढील प्रमाणे : (१) हेअर कॅचर (Hair catcher), (२) निस्यंदक – सहसा दाब निस्यंदक (Pressure filters), (३) पाण्याचा सामू योग्य मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी धुण्याचा सोडा (Washing soda) मिसळण्याची यंत्रणा, (४) पाणी निर्जंतुक करण्यास क्लोरीन, क्लोरामीन, ब्रोमीन, ओझोन, चतुर्थक अमोनियम संयुग (Quaternary ammonium compounds) इत्यादी मिसळण्याची यंत्रणा, (५) पाणी पंप करण्यासाठी पंप, (६) संतुलन जलाशय (Balancing tanks).

वरील शुद्धीकरण परिणामकारकपणे पुढील रोगांचा प्रतिबंध करू शकतात. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (Conjunctivitis), श्वसनसंस्थेला होणारे कोटरदाह (Sinusitis), घशातील गाठींची सूज (Tonsillitis), कर्णदाह (Otitis), त्वचेला होणारा इसब (Eczema) वगैरे.

पाण्याचे निस्यंदन करण्याआधी त्यामध्ये तुरटीची छोटी मात्रा दिली जाते. त्यामुळे पाण्यामधील कलिल (Colloidal) पदार्थ काढता येतात. वारंवार पुनर्चक्रीकरण केल्यामुळे पाण्यामधल्या विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण (विशेषतः पाणी दुष्फेन करणारे पदार्थ) वाढत जाते.  अशा वेळी तलावामधील काही पाणी काढून टाकून त्याच्या जागी निष्फेन केलेले पाणी मिसळतात आणि पाण्याची दुष्फेनता मर्यादेमध्ये ठेवली जाते.

गुणधर्म कमाल मर्यादा
रंग, हेझन एकक (Hazen unit)
वास त्रासदायक नसावा
चव स्वीकार्य असावी
गढूळपणा NTU (Nephelometric turbidity units)
सामू ६.५ ते ८.५
एकूण दुष्फेनता (as CaCO3) ३००
लोह (as Fe) ०.३
क्लोराईड (Cl) २५०
मुक्त उर्वरित क्लोरीन ०.२
विरघळलेले पदार्थ ५००
कॅल्शियम (Ca++) ७५
मॅग्नेशियम (Mg++) ३०
तांबे (Cu++) ०.०५
मंगल (Mn) ०.१
सल्फेटस् (SO4) २००
नायट्रेटस् (NO3) ४५
फ्ल्युओराइडस् (F)
फेनॉलिक संयुगे (C6H5OH) ०.००१
पारा (Hg) ०.००१
कॅडमियम (Cd) ०.०१
सेलेनियम (Se) ०.०१
आर्सेनिक (As) ०.०५
सायनाईडस् (CN) ०.०५
शिसे (Pb) ०.०५
जस्त (Zn)
अनायनिक प्रक्षालक (MBAS) ०.२
क्रोमियम (Cr6+) ०.०५
Polynuclear aromatic hydrocarbons कॅन्सरला कारणीभूत होऊ शकतात
खनिज तेल ०.०१
कीटकनाशक रसायने शून्य
किरणोत्सारक द्रव्ये

अ)  अल्फा कण (Bq/l)

आ)बीटा कण (Bq/l)

 

०.१

अल्कता (CaCO3) २००
अॅल्युमिनियम (Al) ०.०३
बोरॉन

सूक्ष्मजीवशास्त्रानुसार पिण्याच्या पाण्यामध्ये ई. कोलाय  (E-Coli) किंवा Thermotolerant bacteria असता कामा नयेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणधर्मांच्या मानकानुसार कमाल मर्यादा BIS 10500-1991. रंग, वास, चव, सामू, गढूळपणा आणि किर्णोत्सारक द्रव्ये यांच्या व्यतिरिक्त बाकी सर्व संख्या मिलीग्रॅम / लिटर मध्ये.

समीक्षक : सुहासिनी माढेकर