(प्रस्तावना) पालकसंस्था : अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | समन्वयक : सुहासिनी माढेकर | संपादकीय सहायक : पल्लवी नि. गायकवाड
स्थापत्य अभियांत्रिकी’ ही शाखा सर्व अभियांत्रिकी शाखांमधील मूलभूत व प्राचीन मानली जाते. अगदी आदीमानवाच्या काळापासून निवारा ही मानवाची अत्यावश्यक गरज आहे. वर्षानुवर्षे प्रगतीपथावर असलेल्या संशोधनातून स्थापत्य अभियांत्रिकीची विविध क्षेत्रे विकसित होत आहेत. प्राचीन व सुस्थापित असूनही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात विविध स्तरांवर बदल होत आहेत.
संरचनात्मक अभियांत्रिकी (Structural Engineering), भू-तांत्रिक अभियांत्रिकी (Geotechnical Engineering), रचना/बांधकाम व्यवस्थापन (Construction Management), पर्यावरणीय व पाण्याचे स्रोत(Environmental & water resources) आणि नगररचना (Town planning)या पाच शाखांवर स्थापत्य अभियांत्रिकीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. या शाखांचेही इतर अनेक संलग्न विषयांमध्ये वर्गीकरण करता येईल.
स्थापत्य अभियांत्रिकी या व्यावसायिक अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मुख्यत: विविध प्रकारच्या वास्तूंवर (उदा., निरनिराळ्या उंचीच्या इमारती, पूल, पाण्याच्या टाक्या, बंधारे, रस्ते, धरणे, बंदरे इत्यादींवर) परिणाम करणाऱ्या घटकांचा अतिशय सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. निरनिराळ्या वास्तूंचे विश्लेषण करून त्यानुसार त्यांचे आराखडे बनविणे हा स्थापत्य अभियांत्रिकीचा महत्त्वाचा भाग आहे. या क्रियेमध्ये भौतिक शास्त्रातील व स्थापत्य अभियांत्रिकीतील महत्त्वाची तत्त्वे व प्रणालींचा समावेश होतो. विविध वास्तूंच्या बांधणीसाठी व त्यांचे आयुर्मान वाढविण्यासाठी मूलभूत संकल्पना व तत्त्वांचा अभ्यास करून महत्त्वाच्या बाबींचे सखोल आकलन करून घेणे गरजेचे ठरते. याशिवाय, या शाखेमध्ये सिंचन योजना, पाणी व्यवस्थापन, वात अभियांत्रिकी, भूकंप अभियांत्रिकी, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन इत्यादींसारख्या जीवनावश्यक विषयांचा देखील समावेश होतो.
मराठी विश्वकोशात उपलब्ध असलेल्या माहितीत आवश्यक तो सकारात्मक बदल करून जिज्ञासू वाचकांस ही अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे. या गरजेची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ज्ञानमंडळात केला आहे. नोंदींचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन होण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार आकृत्या, चित्रे, दृक-श्राव्य चित्रपटांश यांचा वापर केला आहे. नोंदी जरी संक्षिप्त पद्धतीने सादर केल्या असल्या तरी वाचकांचे कुतुहल जागृत करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
अमृतांजन पूल (Amrutanjan Bridge)

अमृतांजन पूल

पार्श्वभूमी : १६ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली. परंतु हा लोहमार्ग पुण्यापर्यंत नेण्यास पुढील ...
आंतर छिद्र-तास स्तंभिका (Under-Reamed Piles)

आंतर छिद्र-तास स्तंभिका

काही विशिष्ट मृदा परिस्थितींमध्ये मृदेच्या आकारमानात मोठे बदल होत असतात. उदाहरणार्थ, प्रसरणशील मृदेमध्ये ऋतुमानानुसार मृदेतील आर्द्रतेत होणाऱ्या बदलांमुळे मृदेचे आकारमान ...
आवेष्टित जल संस्करण संयंत्र (Package Water Treatment Plants)

आवेष्टित जल संस्करण संयंत्र

आवेष्टित जलशुद्धीकरण संयंत्र (उभा काटच्छेद) काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पाण्याचे शुद्धीकरण करून देऊ शकणारी आटोपशीर आणि सहज हलवता येण्यासारखी यंत्रणा म्हणजे ...
इमारतींची भूकंप संकल्पन तत्त्वे (Seismic Design Philosophy of Buildings)

इमारतींची भूकंप संकल्पन तत्त्वे

भूकंप मार्गदर्शक सूचना क्र. ८ भूकंपविरोधक इमारतींचे संकल्पन : एखाद्या विवक्षित स्थळी भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या हादऱ्यांची तीव्रता हलकी, साधारण किंवा ...
इमारतींच्या बांधकामासाठी उपयुक्त सरल संरचनात्मक विन्यास (Simple Structural Configuration of Masonry Buildings)

इमारतींच्या बांधकामासाठी उपयुक्त सरल संरचनात्मक विन्यास

भूकंप मार्गदर्शक सूचना १३ इमारतींच्या बांधकामातील पेटीसदृश्य क्रिया (Box Action) : दगडी बांधकामाच्या भिंतींचे वस्तुमान अधिक असल्याने त्या भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान ...
इमारतींमधील भारमार्गांचे महत्त्व (Importance of Load Paths in Buildings)

इमारतींमधील भारमार्गांचे महत्त्व

भूकंप मार्गदर्शक सूचना २५                       भारमार्ग : इमारतीच्या पायापासून तिच्या छतापर्यंत तिचे वस्तुमान सर्वत्र अस्तित्वात असते. इमारतींमध्ये ज्या ठिकाणी वस्तुमान ...
इमारतींमधील भारमार्गांना क्षति होण्याची कारणे

भूकंप मार्गदर्शक सूचना २६ आघूर्ण विरोधी चौकटींच्या इमारती (Moment Resisting Frames) : आघूर्ण विरोधी चौकट असलेल्या इमारतींमध्ये जडत्व बलांना प्रभावीपणे ...
इमारतींवरील भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी उपाय ( Remedy to Reduce Earthquake Effects on Buildings)

इमारतींवरील भूकंपाचे परिणाम कमी करण्यासाठी उपाय

भूकंप मार्गदर्शक सूचना २४ भूकंपाचे इमारतींवरील परिणाम कमी करण्याची गरज : पारंपरिक भूकंपीय संकल्पन प्रक्रिया तीव्र भूकंपाच्या हादऱ्यांदरम्यान इमारतीला कोसळू ...
उच्चांकी पूल, जगातील (The highest bridges in the world)

उच्चांकी पूल, जगातील

जगातील प्रत्येक प्रकारातील पहिल्या तीन उल्लेखनीय पुलांची छायाचित्रासह माहिती खाली दिली आहे. (अ) तुळई पूल : चि. १९. शिबॅनपो पूल, ...
उल्लेखनीय पूल ( Notable Bridges)

उल्लेखनीय पूल

अ) भारतातील काही उल्लेखनीय पूल : चि. ३७. भूपेन हजारिका सेतू, आसाम व अरुणाचल प्रदेश
  • भूपेन हजारिका सेतू किंवा ...
ऋण पृष्ठ घर्षण (Negative Skin Friction)

ऋण पृष्ठ घर्षण

एखाद्या इमारतीसाठी जेव्हा “स्तंभिका” (Pile) प्रकारचा पाया वापरला जातो, तेव्हा या स्तंभिकेवरचा भार हा दोन प्रकारे तोलला जातो. पहिल्या प्रकारात ...
एक घट व द्विघट पद्धत (One Pot and two pot system)

एक घट व द्विघट पद्धत

आ. २०. (अ) एक घट पद्धती, (आ) द्विघट पद्धती. लहान प्रमाणातील लोकसंख्येला पाणीपुरवठा (विशेषतः विहिरीमधून) करण्याआधी विहिरीमध्येच पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची ...
काँक्रीट (Concrete)

काँक्रीट

काँक्रीटपासून तयार करण्यात आलेली छताची कौले काँक्रीट हे जगातील सर्वाधिक आणि सर्वत्र सामान्यपणे वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य आहे. सर्वसाधारणपणे काँक्रीट ...
काँक्रीट बनविण्याची प्रक्रिया (The process of making concrete)

काँक्रीट बनविण्याची प्रक्रिया

काँक्रीट हे बांधकामाचे साहित्य आहे. काँक्रीट प्रामुख्याने सिमेंट, वाळू, खडी किंवा दगड इ. च्या पाण्यामधील मिश्रणापासून तयार केले जाते. काँक्रीट प्रमाणक ...
Cl_2 + H_2O \leftrightarrows HOCl + H^+ + Cl^-

क्लोरीनचे गुणधर्म

मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीमध्ये (Periodic table)  क्लोरीन, फ्ल्युओरीन, ब्रोमीन व आयोडीन एकाच गटातील असून त्यांना Halogens (हॅलोजन) अथवा मीठ उत्पादक म्हणतात.  ह्या ...
घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management)

घन कचरा व्यवस्थापन

मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणाऱ्या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर “टाकाऊ पदार्थ” सुद्धा मौल्यवान स्रोत ...
घरगुती सांडपाणी : प्राथमिक निवळण टाकी ( Household Wastewater : Primary Sedimentation Tank)

घरगुती सांडपाणी : प्राथमिक निवळण टाकी

प्रारंभिक शुद्धीकरणानंतर प्राथमिक निवळण टाकीमध्ये सांडपाण्यामधील गाळाच्या रूपाने खाली बसणारे सेंद्रिय आणि वालुकाकुंडामध्ये न बसलेले निरींद्रिय पदार्थ अलग होतात. ह्या ...
घरगुती सांडपाणी : प्रारंभिक शुद्धीकरण प्रक्रिया (Household Wastewater : Initial purification process)

घरगुती सांडपाणी : प्रारंभिक शुद्धीकरण प्रक्रिया

चाळणे (Screening) : सांडपाणी  शुद्धीकरण  प्रक्रियेमधील ही पहिली प्रक्रिया असून तिच्यामुळे  शुद्धीकरण  केंद्रामधील पाईपा, झडपा, पंप इत्यादींना तरंगत येणाऱ्या मोठ्या ...
घरगुती सांडपाणी : शुद्धता पातळी ( Household Wastewater : Level of Purity)

घरगुती सांडपाणी : शुद्धता पातळी

घरगुती सांडपाणी कोणत्या पातळीपर्यंत शुद्ध करावे हे त्याच्या पुढील उपयोगांवरून ठरते. उदा., ते नदीत सोडावयाचे असले तर त्यामधील दूषितकांची कमाल ...
घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण (Household wastewater : Purification)

घरगुती सांडपाणी : शुद्धीकरण

ज्याप्रमाणे पाणीपुरवठा प्रकल्पाचे १) पाण्याचे साठवण, २) पाण्याचे शुद्धीकरण केंद्रापर्यंत वहन, ३) शुद्धीकरण आणि ४) वितरण हे भाग असतात, त्याचप्रमाणे ...