तापायनिक उत्सर्जनाचे उदाहरण म्हणून या परिणामाकडे बघावे लागेल. एखाद्या निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यात तापणार्या तारेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर एक धातूची पट्टी बसवून तिला विद्युत् घटाचे धन अग्र जोडले व ऋण अग्र तापणार्या तारेस जोडले, तर बाहेर विद्युत् प्रवाह मिळतो. अग्रांची उलटापालट केली तर विद्युत् प्रवाह मिळत नाही, असा शोध एडिसन यांना विजेच्या दिव्याची आवरणे आतल्या बाजूस काळी का पडतात, यासंबंधी संशोधन करीत असताना १८८३ साली लागला. तापलेल्या तंतूपासून ऋण विद्युत् भारित कण उत्सर्जित होतात, असे त्यांना आढळून आले. हे ऋण विद्युत् भारित कण म्हणजेच इलेक्ट्रॉन होत असे टॉमसन यांच्या इलेक्ट्रानाच्या शोधानंतर सिद्ध झाले. याच परिणामाच्या तत्त्वावर इलेक्ट्रॉनीय नलिकांचे कार्य चालते.
संदर्भ : मराठी विश्वकोश खंड २, एडिसन परिणाम.
https://www.youtube.com/watch?v=U0oz_ZbQuGM
कळीचे शब्द : #इलेक्ट्रॉनीयनलिका #इलेक्ट्रॉनीय #नलिका #तापायनिकउत्सर्जन #तापायनिक #उत्सर्जन #विद्युत्घट #विद्युत् #घट #विद्युत्प्रवाह
समीक्षक : माधव राजवाडे