हम्फ्री रेपटन आणि रेड बुक्स : हम्फ्री रेपटन [१७५२-१८१८] हे अठराव्या शतकातील इंग्लिश लँडस्केप चळवळीतील एक महत्त्वाचे नाव. भूदृष्यकलेविषयीचे विस्तृत विश्लेषण व लेखन हे त्यांचे योगदान. ‘स्केचेस एंड हिंट्स ऑन लँडस्केप गार्डनिंग’ [१७९५] हे त्यांचे महत्त्वाचे पुस्तक. कलेच्या मानसिक आणि दृश्य स्वरूपा यांचा संबंध यावर त्यांनी विवेचन केले आहे.

रेपटन हे त्यांच्या ग्राहकाला ‘before and after’ अर्थात ‘आधी आणि नंतर’ म्हणजे भूदृष्य नियोजनाच्या आधीची स्थिती आणि नंतर बदललेले भूदृष्य, हे रेखाटनातून सादर करीत असत. यामुळे जागा मालकाला अंदाज येई कि नियोजानंतर भूदृष्य व परिसर कसा दिसणार आहे. इमारत, जमीन, पाणी, झाडे या सर्वांचा एकत्रित विचार त्या स्थल रेखाटनांमधून दिसत असे. ही आधी आणि नंतर चित्रे असलेली पुस्तिका म्हणजे रेपटनची रेड बुक्स. ब्रायटन पावलिओन हा त्याचा एक उत्तम प्रकल्प. आखीव रेखीव भौमितिक रचनेपेक्षा नैसर्गिकतेकडे जाणारी त्याची रचना असायची.
संदर्भ :
- Jellicoe, Geoffrey; Susan, Jellicoe, Landscape of Man, Thames and Hudson Publications, 1987.
समीक्षक : श्रीपाद भालेराव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.