‘वज्जा’ चे संस्कृतीकरण ‘व्रज्या’ करून टीकाकार रत्नदेवाने ‘सजातीय गाथांचे एकत्रीकरण’ असा अर्थ जरी दिलेला असला, तरी ‘वद्’—‘बोलणे’ पासून ‘वद्या, ‘वज्जा’ ,‘म्हण’ किंवा सुभाषित’ असाही अर्थ घेता येईल. वज्जालग्गात प्रथम ७०० गाथा असाव्यात, असे ह्या ग्रंथाच्या काही पोथ्यांतील पुष्पिका पाहता दिसते. तथापि ह्या ग्रंथाच्या ८ पोथ्यांच्या आधारे यूलिअस लाबेर ह्याने संपादिलेल्या वज्जालग्गात ७९५ गाथा आहेत. ह्या ग्रंथातील गाथा वसंतादी ऋतू, चंदन, वटादी वृक्ष, गज, सिंह, हरिण इ. पशू, स्त्रियांची अंगप्रत्यंगे इ. वज्जांत वा प्रकरणांत विभागलेल्या आहेत. वज्जालग्गात अधूनमधून अपभ्रंश भाषेची रूपे येतात.
संस्कृत अलंकारशास्त्रज्ञांनी हालाच्या गाहा सत्तसईतील अनेक गाथा उदधृत केल्या आहेत. परंतु त्यांनी ह्या ग्रंथाची अशा प्रकारे दखल घेतलेली दिसत नाही.
संदर्भ :
- https://www.scribd.com/doc/177481183/vajjalagga
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.