(अरेबी अंक पद्धती, पाया-10 अंक पद्धती, दशमान पद्धती, हिंदु-अरेबी अंक पद्धती). दशमान अंक पद्धतीत स्थानात्मक अंक पद्धतीचा (Positional numeral system) वापर करण्यात आला आहे. यामध्ये 10 या अंकाला पाया (Base) नियुक्त करून 10 भिन्न अंकाचा म्हणजेच 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यांचा वापर करण्यात येतो. तसेच दशांश अपूर्णांक दर्शविण्याकरिता टिंब (Dot; decimal point, दशांश बिंदू) याचा वापर करण्यात येतो. यामध्ये एखाद्या संख्याचे मूल्य निश्चित करण्याकरिता मूळ संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थानमूल्य (place value) लक्षात घ्यावे लागते. या पद्धतीमध्ये 543.21 या संख्येला पाया-10 अंक पद्धतीत (5 × 102) + (4 × 101) + (3 × 100) + (2 × 10−1) + (1 × 10−2) याप्रमाणे दर्शविण्यात येते.
दशमान अंक पद्धती ही बहुतांश संगणक अनुप्रयोगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मुख्यतः दैनंदिन वापरात देखील ही वापरली जाते. दशमान अंक पद्धतीत प्रत्येक अंकात एक स्थान असते आणि प्रत्येक अंक मागील अंकापेक्षा दहापट अधिक महत्त्वपूर्ण असतो. दहा चिन्हांद्वारे संख्या व्यक्त करण्याची प्रथा सर्वप्रथम भारतात झाली. अंकगणित हे संस्कृत साहित्यातील सर्वोत्कृष्ट विज्ञान मानले जाते. पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी अंकीय संज्ञांचा शोध लावला होता. अशा प्रकारे संख्या मोजण्यासाठी एक (एकक), दशक (दही), शतक (शेकडो), सहस्र (हजार) इत्यादींचा उपयोग केला गेला.
दहा अंक मानवांसाठी खूप परिचित आहे – हातात एकूण दहा बोट असतात; पायात देखील दहा बोटे असतात. दशमान अंक पद्धती इतकी सोयीस्कर आहे की गणिताव्यतिरिक्त, ती मोजण्यासाठी देखील अवलंबली गेली. प्रथम ती फ्रेंच क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात वस्तूंच्या मूल्यमापनात वापरली गेली आणि क्रांतीच्या काही वर्षानंतरच देशाचे सर्व मोजमाप दशांश पद्धतीद्वारे सुरू झाले. या व्यवस्थेच्या सहजतेने प्रभावित होऊन इतर अनेक देशांनीही याचा अवलंब केला. बेल्जियमने १८३३ आणि स्वित्झर्लंडने १८९१ मध्ये ही पद्धती स्वीकारली. या पद्धतीचा जर्मनी, हॉलंड, रशिया आणि अमेरिका यांवरही मोठा परिणाम झाला आणि या देशांनीही लवकरच या प्रकारची पद्धती स्वीकारली.
१८७० मध्ये, फ्रेंच सरकारने या दशमान अंक पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यासाठी एक परिषद आयोजित केली होती, ज्यात ३० देशांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती आणि त्यांनी या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याच्या सूचना मान्य केल्या. हळूहळू, जगातील बहुतेक भागात ही प्रणाली वापरली जाऊ लागली. या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुलभता. त्याचा मूळ अंक 10 आहे.
पहा : अंक, अंक पद्धति, गणित.
कळीचे शब्द : #दशमान #अंकपद्धती
संदर्भ :
समीक्षक : रोहित गुप्ता