संगणकाचा एक प्रकार. मेन फ्रेम संगणक हे आकाराने मोठे असतात, उदा., रेफ्रिजरेटर व मोठे कपाट. मुख्यतः मेन फ्रेम संगणकाचा उपयोग मोठ्या संस्थांद्वारे केला जातो. मोठ्या प्रमाणात माहितीवर (डेटा; Data) प्रक्रिया कारण्यासाठी, खूप जास्त माहितीची साठवून करण्यासाठी, किचकट माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी मेन फ्रेम संगणकाचा उपयोग होतो. साधारणतः खूप मोठ्या माहितीवर ज्या ठिकाणी काम चालते त्या ठिकाणी या संगणकाचा उपयोग केला जातो. उदा., जनगणना, उद्योग आणि ग्राहक आकडेवारी, बॅंक, इन्शुरन्स कार्यालये इत्यादी. फुजीत्सू (Fujistu), हिताची (Hitachi), कॉम्पॅक (Compaq), आयबीएम (IBM) ह्या सर्व संस्था मेन फ्रेम संगणक बनवतात. उदा., सध्याचा मेन फ्रेम संगणक हा आयबीएम ह्या संस्थेने बनवलेला आहे त्याचे नाव आयबीएम सिस्टिम Z असे आहे व याची किंमत साधारणतः ७५,००० डॉलर एवढी आहे.

मेन फ्रेम संगणकाचे वैशिष्ट्ये :

१. मेन फ्रेम संगणकामध्ये एकाच वेळा एकाधिक ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System) चालवता येतात.

२. मेन फ्रेम संगणक पूर्ण पणे बंद न करता त्याची प्रक्रिया करण्याची क्षमता व साठवणुकीची क्षमता वाढवता येते.

३. मेन फ्रेम संगणक हे मोठ्या प्रमाणात इनपुट (Input) आणि आउटपुट (Output) हाताळू शकते.

४. मेन फ्रेम संगणकामध्ये जास्त ताकदीचे प्रोसेसर (Processor) वापरतात जेणे करून माहिती वरील प्रक्रिया देखील लवकर होते.

५. मेन फ्रेम संगणक हा एकापेक्षा अधिक सर्व्हवर (Server) ताबा मिळवून काम करू शकतो.

कळीचे शब्द : #संगणक #बॅंक #इन्शुरन्स #ऑपरेटिंगसिस्टिम

संदर्भ :

समीक्षक : विजयकुमार नायक