(नेटवर्किंग तंत्रज्ञान). वायरलेस फिडीलीटी (Wireless-Fidelity) यांचे संक्षिप्त रूप वाय-फाय असे आहे. वाय-फाय हे संगणकीय नेटवर्किंगचे तंत्रज्ञान असून त्यामध्ये रेडिओ तरंगाचा वापर कमी पल्ल्यामध्ये उच्च-गती डेटा/माहिती हस्तांतरित करण्याकरिता होतो.
अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशनने 1985ला वाय-फाय तंत्रज्ञानाची निर्मिती केली. त्यांनी 900 मेगाहर्ट्झ (MHz), 2.4 गिगाहर्ट्झ (GHz) आणि 5.8 गिगाहर्ट्झ (GHz) च्या रेडिओ पंक्तींचे पट्ट (Radio Spectrum Band) विनापरवानगीने कोणालाही वापरता येतील याकरिता प्रसारित केले. नवीन उपलब्ध रेडिओ पंक्तीचा फायदा घेण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी वायरलेस नेटवर्क आणि उपकरणे तयार करण्यास सुरवात केली. परंतु सामान्य वायरलेस मानकांशिवाय हालचाल खंडित राहिली, कारण भिन्न उत्पादकांचे उपकरण सुसंगत नव्हते. अखेरीस औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्याच्या समितीने सामान्य मानक तयार केले, त्याला 802.11 असे म्हणण्यात आले. त्यालाच नंतर इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर्स (आयईईई; IEEE) या संस्थाने 1997 मध्ये मंजूर केले. दोन वर्षांनंतर मोठ्या कंपन्यांच्या गटाने वायरलेस इथरनेट कॉम्पॅटिबिलिटी अलायन्स (डब्ल्यूईसीए; WECA; आता वाय-फाय अलायन्स Wi-Fi Alliance) या संस्थेची स्थापना केली. या जागतिक, ना-नफा संस्थेची स्थापना नवीन वायलेस मानक याला चालना देण्याकरिता करण्यात आली. डब्ल्यूईसीएने नवीन तंत्रज्ञानाचे नाव वाय-फाय असे ठेवले. त्यानंतर आयईईईचे वाय-फाय बाबतचे मानक उच्च-प्रतीच्या पट्टरुंदीकरिता तयार करण्यात आले. मूळचे 802.11 मानक जास्तीत-जास्त दर सेकंदाला 2 मेगाबिट्स (Mbps) डेटा प्रसारित करीत होते, तर 2007च्या 802.11n मानकाद्वारे जास्तीत-जास्त दर सेकंदाला 600 मेगाबिट्स डेटा हस्तांतरित करता येतो.
आयईईईच्या वाय-फाय मानका अंतगर्त उपलब्ध वारंवारता पट्ट विविध प्रकाराच्या वाहिन्यांमध्ये विभागले जातात. या वाहिन्या वारंवारतेवर परस्पर व्यापतात. प्रत्येक वाहिन्यांमध्ये वाय-फाय विस्तारित पंक्ती तंत्रज्ञानाचा वापर होतो, त्यामध्ये संकेताचे लहान-लहान तुकड्यांमध्ये विभाजन होते आणि एकाधिक वारंवारतेवर प्रसारित केले जाते. विस्तारित पंक्ती तंत्रज्ञानामुळे संकेताला प्रति वारंवारतेच्या कमी ऊर्जावर प्रसारित करण्यास सक्षम करते आणि एकाधिक उपकरणांना समान वाय-फाय प्रसारित करण्याची अनुमती देते. वाय-फाय संकेत सहसा लहान अंतरांवर (सहसा 100 मी. पेक्षा कमी) पारेषित होत असल्यामुळे, हे संकेत भिंती, फर्निचर आणि इतर अडथळे प्रतिबंधित करू शकतात. अशा प्रकारे काही वेळेच्या अंतराने समस्या उद्भवू शकतात आणि या अडथड्यांना बहुपथ व्यतिकरण (Multipath Interference) असे म्हणण्यात येते. ऑस्ट्रेलियन अभियंता जॉन ओ’सुलिव्हन आणि सहयोगींनी विकसित केलेल्या पद्धतीमध्ये वाय-फाय संकेत प्रसारित करण्याचे तीन भिन्न मार्ग एकत्रित करून बहुपथ व्यतिकरण कमी होते.
वाय-फायची लोकप्रियता निरंतर वाढत जात आहे. वाय-फाय स्थानिक क्षेत्र नेटवर्क (लॅन; LAN; Local Area Network) केबल आणि वायर जोडणीशिवाय वापरता येते, त्यामुळे ते घर आणि व्यवसाय नेटवर्कसाठी एक लोकप्रिय निवड आहे. लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट संगणक आणि इलेक्ट्रॉनिक गेमिंग कन्सोल यांसारख्या बर्याच आधुनिक उपकरणांसाठी वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट प्रवेश प्रदान करण्यासाठी वाय-फायचा वापर केला जातो. वाय-फाय सक्षम उपकरणे वाय-फाय प्रवेश असलेल्या भागात हॉट-स्पॉट (Hot spots; उष्ण बिंदू) म्हणून इंटरनेटशी जोडण्यास तयार असतात. जवळजवळ 20 मी. घरामध्ये आणि एक मोठी श्रेणी बाहेर असते. हॉट-स्पॉट आता सर्वसामान्य झालेले आहेत. बरीच सार्वजनिक ठिकाणे जसे की, रेल्वे, विमानतळ, हॉटेल, कॉफी शॉप इ. यांमध्ये वाय-फाय प्रवेश प्रदान केला जातो. काही शहरामध्ये विनामूल्य सिटीवाइड वाय-फाय नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. वाय-फाय याची नवीन आवृत्ती वाय-फाय डायरेक्ट (Wi-Fi Direct) ही असून ती लॅनशिवाय उपकरणाला जोडण्यास परवानगी देते.[हॉट-स्पॉट].
जवळची श्रेणी, वाय-फायच्या काही आवृत्त्या, योग्य हार्डवेअरवर चालत असताना 1 जीबीपीएस (Gbps) पेक्षा जास्त वेग मिळू शकताे. वायरलेस नेटवर्क इंटरफेस कंट्रोलरसह श्रेणीतील कोणीही नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न करू शकतो; यामुळे वाय-फाय वायर्ड नेटवर्कपेक्षा आक्रमण (इव्हेंडीप्राइपिंग) अधिक संवेदनशील आहे. वाय-फाय संरक्षित प्रवेश म्हणजे वाय-फाय नेटवर्कवर हलविण्याच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेल्या आणि वैयक्तिक आणि एंटरप्राइझ नेटवर्क्ससाठी समाधाने समाविष्ट असलेल्या तंत्रज्ञानाचे एक कुटुंब आहे.
कळीचे शब्द : #डिव्हाइसेस # Devices #एनक्रिप्शन#Encryption #रेडिओ #बँड #चॅनेल्स
संदर्भ :
- https://www.digitaltrends.com/computing/what-is-wi-fi/
- https://www.cisco.com/c/en_in/products/wireless/what-is-wifi.html
समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर