(संप्रेषण तंत्रज्ञान). झिग्बी तंत्रज्ञान वैयक्तिक कामासाठी तयार करण्यात आले आहे. ते एक वायरलेस वैयक्तिक क्षेत्र नेटवर्क (वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क; WPAN; व्हिपॅन; डब्ल्युपीएएन) आईईई 802.15.4 मानकांवर तयार करण्यात आले असून विशेषत: नेटवर्कवरील नियंत्रण आणि संवेदनशील प्रयोगांकरिता तयार करण्यात आले आहे.  झिग्बी अलायन्स (Zigbee Alliance) या कंपनीने ते तयार केले आहे. हे संप्रेषण मानक कमी डेटा दरावर बरेच उपकरण हाताळण्याकरिता भौतिकीय आणि माध्यमांचा प्रवेश ज्या स्तरावर नियंत्रित होतात त्या स्तरावर तयार करण्यात आले आहे. [माध्यम प्रवेश नियंत्रण; Media Access Control; MAC; मॅक].

झिग्बी व्हिपॅन (WPAN) हे 868 मेगाहर्ट्झ (MHz), 902-928 मेगाहर्ट्झ आणि 2.4 गिगाहर्ट्झ (GHz) वारंवारतेवर कार्य करतात. दर सेकंदाला 250 किलो बिट्स हा डेटा दर नियतवेळी तसेच मधल्या कुठल्याही वेळी संवेदक आणि नियंत्रक यांमधील दोन-मार्गी डेटा पारेषित करण्यास योग्य आहे.

झिग्बी हे कमी-किंमतीचे आणि कमी-शक्ती जाळीचे नेटवर्क (मेश नेटवर्क; Mesh Network) तयार करते. त्याचे व्यापकपणे नियंत्रण आणि देखरेख या अनुप्रयोगासाठी वापर करण्यात येतो. ते 10-100 मी. परिक्षेत्रात कार्यरत असते. ही संप्रेषण प्रणाली खासगी मालकीच्या कमी परिक्षेत्राकरिता वापरण्यात येणाऱ्या वायरलेस सेंसर नेटवर्क जसे की ब्ल्युटूथ (Bluetooth) आणि वाय-फाय (Wi-Fi) पेक्षा कमी खर्चिक आणि सोपी आहे. झिग्बी हे मास्टर टू मास्टर (Master to Master) किंवा मास्टर टू स्लेव्ह (Master to Slave) संप्रेषणाकरिता वेगवेगळ्या नेटवर्क जुळवणीला साहाय्य करते. ते वेगवेगळ्या प्रकारे हाताळले जाते, त्यामुळे बॅटरीच्या उर्जेची बचत होते. राउटरचा वापर करून झिग्बी नेटवर्क विस्तारित करता येते आणि इमारतीत विस्तारित क्षेत्र नेटवर्क तयार करण्यास बरेच नोड (अनेक जुळवणीचा एक केंद्रबिंदू) एकमेकांशी जोडल्या जाऊ शकतात.

झिग्बी उपकरण

सद्य संप्रेषण जगात, असंख्य उच्च डेटा दर संप्रेषण मानक उपलब्ध आहेत, परंतु यांपैकी कोणतेही संवेदक आणि नियंत्रण उपकरणांच्या संप्रेषणाचे मानदंड पूर्ण करीत नाहीत. या उच्च-डेटा-दर संप्रेषण मानकांना अगदी कमी पट्टरुंदीमध्ये देखील कमी-विलंब आणि कमी उर्जा वापराची आवश्यकता असते. उपलब्ध मालकी वायरलेस प्रणालीचे ‘झिग्बी तंत्रज्ञान’ कमी खर्चाचे आणि कमी उर्जा वापराचे आहे आणि त्याची उत्कृष्ट वैशिष्ट्ये ही संप्रेषणाच्या बर्‍याच अनुप्रयोगात, औद्योगिक नियंत्रण आणि घर स्वयंचलन (होम ऑटोमेशन; Home
Automation) वगैरेसाठी सर्वात योग्य ठरतात.

झिग्बीचे 1990 मध्ये स्व-आयोजित तदर्थ अंकीय रेडिओ नेटवर्क तयार करण्यात आले होते. 2003 ला तयार करण्यात आलेले झिग्बीचे वैशिष्ट्ये असणारे आईईई 802.15.4 मानक 2004 ला मंजूर करण्यात आले. झिग्बी अलायन्सने 2005 साली नवीन वैशिष्ट्यांसह 1.0 ची घोषणा केली, त्याला झिग्बी-2004 असे म्हणण्यात आले. झिग्बी हे नाव मधमाशी पोळ्याकडे परतल्यावर करण्यात येणाऱ्या वॅगल डान्स (waggle dance) यावरून देण्यात आले आहे.

क्लस्टर ग्रंथालय (Cluster Library) : 2006 साली झिग्बी-2004 ला बदलविण्याची घोषणा करून अधिक वैशिष्ट्यांसह झिग्बी-2006 तयार करण्यात आले. झिग्बी-2006 हे मुख्यत्वे झिग्बी-2004 मधील कळ-मूल्य (Key-value) तसेच संदेश (Message) यांतील क्लस्टर ग्रंथालयाद्वारे जोड रचना बदलविते. याच्या ग्रंथालयामध्ये सुसंगत आदेशांचा संच, गटांच्या खाली नियोजित नावांचे क्लस्टर-जसे झिग्बीचे होम ऑटोमायझेशन, स्मार्ट एनर्जी आणि लाइट लिंक इत्यादी- यांचा समावेश असतो. 2017 साली झिग्बी अलायन्सने क्लस्टर ग्रंथालयाचे नाव बदलवून डॉटडॉट (Dotdot) असे केले आणि त्याला नवीन  नियम –प्रोटोकॉल-म्हणून घोषित केले. त्यामुळे डॉटडॉट हे सर्व झिग्बी उपकरणांसाठी अनुप्रयोगात्मक स्तर म्हणून कार्य करते.

झिग्बी प्रो (Zigbee Pro) : 2007 साली झिग्बी 2007 सारख्या झिग्बी-प्रो याला अंतिम रूप देण्यात आले. यात एका उपकरणाचा समावेश असून ते झिग्बी नेटवर्कवर कार्य करते. राउटींगच्या पर्यायांमध्ये ‍भिन्नता असल्यामुळे झिग्बी-प्रो असणारी उपकरणे झिग्बी नेटवर्कवर नॉन-राउटींग झिग्बी अंत उपकरणांत (Zigbee End Devices; ZED) किंवा झिग्बी अंत उपकरणांत रूपांतरित झाली पाहिजे. झिग्बी उपकरणे झिग्बी प्रोच्या नेटवर्कवरील झिग्बी अंत उपकरणांत रूपांतर करावे लागते. हे 2.4 गिगाहर्ट्झ आयएसएम पट्टाद्वारे कार्य करते तसेच त्यात उप-गिगाहर्ट्झ पट्टाचा सुद्धा समावेश असतो.

झिग्बी तंत्रज्ञानाचे कार्य : झिग्बी तंत्रज्ञान वेगवेगळ्या उपकरणांना अंकीय रेडिओने एकमेकांशी संवाद साधण्याची परवानगी देऊन कार्य करते. या नेटवर्कमध्ये राउटर (Router), समन्वयक (Coordinator) तसेच अंत उपकरणे (End Devices) या तीन उपकरणांचा समावेश होतो. या उपकरणांचे मुख्य कार्य समन्वयकाकडील सूचना आणि संदेश अंत उपकरणाला -जसे की लाइट बल्ब- वितरित करणे आहे. या नेटवर्कमध्ये समन्वयक हे अतिशय आवश्यक उपकरण आहे, ते प्रणालीच्या मूळ ठिकाणी ठेवले जाते. प्रत्येक नेटवर्कसाठी फक्त एक समन्वयक असून त्याला वेगवेगळी कार्ये करण्यासाठी वापरले जाते. वाहिन्यांचे क्रमवीक्षण करण्याकरिता तसेच कमीत-कमी व्यतिकरण करण्याकरिता समन्वयक योग्य वाहिन्याची निवड करतो. नेटवर्कमध्ये योग्य ओळख देण्याकरिता तसेच प्रत्येक उपकरणाला योग्य पत्ता देण्याकरिता आणि नेटवर्कमध्ये योग्य संदेश आणि सूचना निर्देशित करण्याकरिता समन्वयक मुख्य भूमिका बजावतो.

राउटरची समन्वयक तसेच अंत उपकरणांमध्ये व्यवस्था केली जाते. राउटर मुख्यत: विविध नोड्समधील संदेशांच्या मार्गासाठी जबाबदार असतो. समन्वयकाकडून राउटर संदेश प्राप्त करतात आणि ते अंत उपकरणाला प्राप्त होण्याच्या स्थितीत येईपर्यंत त्यांना संचित करतात. झिग्बी नेटवर्कमधील राउटर इतर अंत उपकरणांना तसेच इतर राउटरला देखील जोडण्यास मदत करते.

झिग्बी नेटवर्कमध्ये, प्रमुख नोडमध्ये असणारे उपकरण जसे की, राउटर किंवा समन्वयक यांसोबत संप्रेषणाच्या तुलनेत अंत उपकरणे कमी माहिती नियंत्रित करतात. अंत उपकरणे थेट एकमेकांशी संवाद साधत नाहीत. सर्वप्रथम सर्व माहिती राउटर सारख्या प्रमुख नोडकडे वळविली जाते, राउटर ती माहिती अंत उपकरणांना जाणीव होण्याच्या स्थितीत येईस्तोर धरून ठेवतात. अंत उपकरणे प्रमुख उपकरणांकडून प्रतीक्षा करीत असलेल्या संदेशाच्या विनंती करण्याकरिता वापरली जातात.

झिग्बी संरचना (Zigbee Architecture) : झिग्बी प्रणालीच्या रचनेमध्ये झिग्बी समन्वयक, राउटर आणि अंत उपकरणे यांचा समावेश होतो. प्रत्येक झिग्बी नेटवर्कचे मार्ग आणि माध्यम म्हणून कार्य करण्यासाठी किमान एक समन्वयक असणे आवश्यक आहे. माहिती प्रक्रिया करीत असतांना ते प्राप्त आणि प्रसारित करीत असतांना त्याला हाताळण्याची आणि संग्रहित करण्याची जबाबदारी समन्वयकाची असते.

झिग्बी राउटर मध्यस्थ यंत्र म्हणून कार्य करतात. त्यांच्याद्वारे इतर उपकरणांवर माहिती पाठविणे-घेणे यास परवानगी दिली जाते. प्रमुख नोड्ससोबत संप्रेषण करण्यासाठी अंत उपकरणांची मर्यादित कार्यक्षमता असते. राउटर, समन्वयक आणि अंत उपकरणे यांची नेटवर्कमध्ये किती संख्या असणार, हे स्टार (Star), क्लस्टर-ट्री (Cluster-tree) आणि जाळी (मेश; Mesh) यांसारख्या नेटवर्कच्या प्रकारावर अवलंबून असते.

झिग्बी प्रोटोकॉल संरचनेमध्ये विविध स्तरांची रास असते, परंतु आयईईई 802.15.4 मानकांप्रमाणे भौतिकीय आणि माध्यम प्रवेश नियंत्रण (MAC Layer) या स्तरांद्वारे परिभाषित करून झिग्बीने स्वतःचे नेटवर्क आणि अनुप्रयोग स्तर तयार करून झिग्बी प्रोटोकॉल पूर्ण केला आहे.

भौतिकीय स्तर (Physical Layer) : या स्तरावर संकेत पारेषित आणि प्राप्त केल्यावर अनुक्रमे मॉड्युलेशन आणि डिमोड्युलेशन या प्रक्रिया केल्या जातात. झिग्बीमध्ये 868/915 मेगाहर्ट्झ व 2450 मेगाहर्ट्झ यांसारख्या दोन भौतिकीय स्तरांचा समावेश आहे.

झिग्बीचा डेटा दर 868 वारंवारता पट्टासाठी 20 केबीपीएस, (Kbps), 915 वारंवारता पट्टासाठी 40 केबीपीएस, आणि 2450 वारंवारता पट्टासाठी 250 केबीपीएस आहे. यात 16 आरएफ वाहिन्या आहेत.

माध्यम प्रवेश नियंत्रण स्तर (Media Access Control Layer) : नेटवर्कमध्ये माहिती प्रवाहित असतांना इतर माहितींसोबतच्या टक्करी टाळण्यासाठी तसेच वेगळया नेटवर्कमध्ये प्रवेश करून डेटाच्या विश्वसनीय संप्रेषणासाठी हा स्तर जबाबदार असतो. संप्रेषण अद्ययावत करण्याकरिता हा स्तर बीकन फ्रेम (Beacon frames) देखील पारेषित करतात.

नेटवर्क स्तर (Network Layer) : या स्तरामध्ये नेटवर्कशी निगडीत प्रक्रियांची काळजी घेतली जाते, जसे की, नेटवर्कची व्यवस्था, अंत उपकरणे जोडणी, नेटवर्कमध्ये उपकरणांसोबत जोडणीमध्ये आलेला व्यत्यय, राउटींग, उपकरणांची जुळवणी इत्यादी.

अनुप्रयोग सहायक उप-स्तर (Application Support Sub-layer; APS) : हा स्तर डेटा व्यवस्थापन सेवांसाठी नेटवर्क स्तरांशी संवाद साधण्यासाठी झिग्बी-उपकरण-वस्तू (ZDO; Zibee Device Object) आणि अनुप्रयोग-वस्तू (Application Object) यांसाठी आवश्यक सेवा सक्षम करताे. हा स्तर त्यांच्या सेवा आणि आवश्यकतेनुसार दोन उपकरणे जुळविण्यासाठी जबाबदार असतो.

अनुप्रयोग फ्रेमवर्क (Application Framework) : या स्तरामध्ये कळ-मूल्य जोडी (Key-value pair) आणि सर्वसामान्य संदेश (Generic Message) या दोन प्रकारांची सेवा दिली जाते. सामान्य संदेश एक विकसक-परिभाषित रचना असते, तर कळ-मूल्य जोडी अनुप्रयोग-वस्तूंमध्ये विशेषता प्राप्त करण्यासाठी वापरली जाते. झिग्बी-उपकरण-वस्तू अनुप्रयोग-वस्तू आणि अनुप्रयोग सहायक उप-स्तर (APS Layer) यांदरम्यान झिग्बी उपकरणात संवाद प्रस्थापित करतात. ते नेटवर्कमध्ये इतर उपकरणे शोधण्यासाठी, आरंभ करण्याकरिता आणि इतर उपकरणांशी जुळवून घेण्याकरिता जबाबदार असतात.

झिग्बी वापरण्याची पद्धत आणि टोपॉलॉजी : झिग्बी मध्ये दोन मार्गानी डेटा दोन वेगवेगळ्या पद्धतीने हस्तांतरित केला जातो. नॉन-बीकन पद्धत आणि बीकन पद्धत. बीकन पद्धतीत समन्वयक आणि राउटर सतत येणार्‍या डेटाच्या सक्रिय स्थितीचे परीक्षण करतात आणि म्हणून तेथे अधिक उर्जा वापरली जाते. बीकन पद्धतीत राउटर आणि समन्वयक निष्‍क्रिय नसतात, कारण कोणत्याही वेळी कोणतीही नोड सक्रिय होऊन संप्रेषण करू शकते. जरी यासाठी अधिक वीजपुरवठा आवश्यक असला तरी त्याचा एकूण वीज वापर कमी असतो, कारण बरेच उपकरणे नेटवर्कमध्ये दीर्घ कालावधीसाठी निष्क्रिय स्थितीत असतात.

बीकन पद्धतीत अंत उपकरणाकडून जेव्हा माहिती संप्रेषण होत नाही त्यावेळी राउटर आणि समन्वयक हे निष्क्रिय स्थितीत असतात. कालांतराने समन्वयक सक्रिय होऊन नेटवर्कमधील राउटरला बीकन पारेषित करतात.

बीकन नेटवर्क ठराविक वेळेत म्हणजेच ते जेव्हा संप्रेषणाची गरज असते तेव्हाच कार्यरत असतात. त्यामुळे कमी कार्य वेळेत दीर्घकाळ बॅटरीचा वापर होतो. झिग्बीच्या या बीकन आणि नॉन-बीकन पद्धतीत नियतकालिक (सेन्सर डेटा), ठराविक वेळेने (लाइट स्विचेस) आणि पुनरावृत्त डेटा प्रकारांचे व्यवस्थापन करू शकतो.

झिग्बी टोपॉलॉजी : झिग्बी वेगवेगळ्या नेटवर्क टोपॉलॉजीला साहाय्य करते. सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या नेटवर्क जुळवणीमध्ये स्टार, जाळी (मेश; Mesh) आणि क्लस्टर ट्री टोपॉलॉजी आहेत. कोणत्याही टोपॉलॉजीमध्ये एक किंवा अधिक समन्वयक असतात. स्टार टोपॉलॉजीमध्ये, नेटवर्कमध्ये एक समन्वयक असतो तो नेटवर्कवर उपकरणाला आरंभ आणि व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असतो. इतर सर्व उपकरणांना अंत उपकरणे असे म्हटले जाते, ते थेट समन्वयकाशी संवाद करतात. औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो, जेथे मध्यवर्ती नियंत्रकाशी संप्रेषण करण्याकरिता सर्व अंत उपकरणांची आवश्यकता असते आणि ही टोपॉलॉजी सोपी आणि उपयोजित करणे सोपे आहे.

जाळी आणि ट्री टोपॉलॉजीजमध्ये, झिग्बी नेटवर्क बर्‍याच राउटरनी विस्तारित केले जाते आणि समन्वयक त्यांना तारांकित करण्यास जबाबदार असतो. या संरचनेमुळे नेटवर्कमधील कोणतेही उपकरण त्याच्या इतर जवळच्या नोडशी संपेष्रण करण्यास अनुमती देतो, फक्त त्या माहितीचा अतिरेक करता कामा नये.

जर कोणताही नोड निष्क्रिय झाल्यास, माहिती या टोपॉलॉजीद्वारे अन्य उपकरणावर स्वयंचलितपणे मार्गस्थ केली जाते. औद्योगिक क्षेत्रात माहितीचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे मेश टोपॉलॉजी तेथे बहुदा वापरण्यात येते.

क्लस्टर-ट्री नेटवर्कमध्ये, प्रत्येक क्लस्टरमध्ये लीफ नोड्स (Leaf nodes) असलेले समन्वयक असतात आणि हे समन्वयक प्रमुख समन्वयकाशी जोडलेले असतात आणि त्यामुळेच संपूर्ण नेटवर्क आरंभ होते.

झिग्बी तंत्रज्ञानाच्या कमी किंमती, कमी उर्जा, प्रक्रिय पद्धती आणि त्यांचे टोपॉलॉजी यांसारख्या फायद्यांमुळे ब्लूटूथ, वाय-फाय इत्यादीसारख्या अन्य मालकीच्या संप्रेषणाच्या तुलनेत हे अल्प-श्रेणी संप्रेषण तंत्रज्ञान बर्‍याच अनुप्रयोगांसाठी योग्य आहे.

झिग्बीमधील कमी डेटा दर : ब्ल्युटूथ तसेच वाय-फाय यांसारख्या विविध प्रकारांचे वायरलेस तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहेत. ते उच्च-गती*डेटा प्रदान करतात. परंतु झिग्बी मधील डेटा दर कमी आहे कारण झिग्बी विकसित करण्यामागील मुख्य उद्देश वायरलेस नियंत्रक (Controller) तसेच परिक्षक (Monitor) वापरणे हा आहे.

आयईईई 802.15.4  सारख्या नेटवर्कसाठी उच्च डेटा दर मिळविणे शक्य असले तरी, अशा अनुप्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्‍या संप्रेषणाची वारंवारता आणि डेटाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणून झिग्बी तंत्रज्ञान आयईईई 802.15.4 नेटवर्कवर आधारित आहे.

आयओटी (IoT) मधील झिग्बी तंत्रज्ञान : झिग्बी ब्ल्युटूथ तसेच वाय-फाय प्रमाणेच एक प्रकारचे संप्रेषण तंत्रज्ञान आहे, तथापि,  असंख्य नवीन वाढते नेटवर्किंग पर्याय देखील आहेत जे घर स्वयंचलन अनुप्रयोगांसाठी एक पर्याय आहे. प्रमुख शहरांमध्ये, व्हाइटस्पेस तंत्रज्ञान आयओटी-आधारित विस्तृत प्रदेश वापर प्रकरणांसाठी लागू केले गेले.

झिग्बी एक कमी-उर्जा डब्ल्यूएलएएन (वायरलेस लोकल एरिया नेटवर्क; WLAN) तंत्रज्ञान असल्याने कमी डेटा आणि कमी उर्जा बॅटरी बंद करण्यासाठी वापरण्यात येते. यामुळे, एम2एम (मशीन-टू-मशीन) संप्रेषण तसेच औद्योगिक आयओटी (इंटरनेटच्या गोष्टी; IoT) द्वारे मुक्त मानक जोडले केले गेले आहे. झिग्बी आयओटी प्रोटोकॉल बनला आहे जो जागतिक स्तरावर स्वीकारला गेला आहे.

झिग्बी उपकरणे : आयईईई 802.15.4 च्या वैशिष्ट्यांमध्ये झिग्बीमध्ये प्रामुख्याने पूर्ण-कार्यक्षम उपकरण (फुल-फंक्शन डिव्हाइसेस; एफएफडी; FFD) तसेच कमी-कार्यक्षम उपकरण (रिड्युस्ड-फंक्शन डिव्हाइसेस; आरएफडी; RFD) अशी दोन उपकरणे समाविष्ट आहेत. एक एफएफडी उपकरण भिन्न कार्ये करतो आणि ते त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये स्पष्ट केले जाते, तसेच नेटवर्कमध्ये ते कोणतेही कार्य स्वीकारू शकतात.

आरएफडी उपकरणांत आंशिक क्षमता असते म्हणून ते मर्यादित कार्ये करतात आणि हे उपकरण नेटवर्कमधील कोणत्याही उपकरणाशी संवाद साधू शकतात. नेटवर्कमध्ये लक्ष देणे तसेच कार्य करणे आवश्यक आहे. आरएफडी उपकरण सहजपणे एफएफडी उपकरणाशी संवाद करू शकतात. स्विच सक्रिय अथवा निष्क्रिय करून नियंत्रित करणे यांसारख्या सोप्या अनुप्रयोगांमध्ये आरएफडी उपकरण वापरले जाते.

आयईईई 802.15.4 n/w मध्ये, झिग्बी उपकरणे समन्वयक, पॅन समन्वयक (पर्सनल एरिया नेटवर्क; Personal Area Network) आणि उपकरण यांसारख्या तीन भिन्न भूमिका निभावतात. एफएफडी उपकरण समन्वयक तसेच पॅन समन्वयक असू शकतात तर साधे उपकरण हे एकतर आरएफडी किंवा एफएफडी उपकरण असतात.

समन्वयकांचे मुख्य कार्य म्हणजे संदेश पुन:प्रक्षेपित करणे. पर्सनल एरिया नेटवर्कमध्ये पॅन- नियंत्रक एक अत्यावश्यक नियंत्रक असतो. झिग्बी मानक झिग्बी उपकरणांवरून समन्वयक, राउटर आणि अंत उपकरण ही तीन प्रोटोकॉल उपकरणे तयार करू शकतात.

झिग्बी समन्वयक : एफएफडी उपकरणांमध्ये, पॅन-समन्वयक नेटवर्क तयार करण्यासाठी वापरले जातो. एकदा नेटवर्क स्थापित झाल्यानंतर, ते नेटवर्कमध्ये वापरलेल्या उपकरणांसाठी नेटवर्कचा पत्ता नियुक्त करतो आणि संदेशांना अंत उपकरणापर्यंतदेखील मार्ग दाखवतो.

झिग्बी राउटर : झिग्बी राउटर एक एफएफडी उपकरण आहे जे झिग्बी नेटवर्कच्या श्रेणीस परवानगी देतो. नेटवर्कमध्ये अधिक उपकरणांना जोडण्यासाठी राउटर वापरला जातो. कधीकधी, हे झिग्बी अंत उपकरण म्हणून कार्य करते.

झिग्बी अंत उपकरण : अंत उपकरण हे राउटर किंवा समन्वयक नाही. ते संवेदकाद्वारे इंटरफेस प्रदान करतात किंवा नियंत्रण प्रक्रिया परिपूर्ण करतात. अनुप्रयोगाच्या आधारे ते आरएफडी किंवा एफएफडी असू शकतात.

झिग्बी आणि वाय-फाय : झिग्बीमध्ये डेटा हस्तांतरणाची गती वाय-फायच्या तुलनेत कमी आहे, झिग्बीमध्ये सर्वाधिक वेग 252 केबीपीएस आहे. वाय-फायच्या कमी वेगाच्या तुलनेत हे खूपच कमी आहे. झिग्बीमध्ये वीज वापराचे दर कमी तसेच बॅटरीचे आयुष्य बरेच असते. त्याचा प्रोटोकॉल बर्‍याच महिन्यांपर्यंत टिकतो कारण एकदा तो पुनर्स्थापित झाल्यावर आपण विसरू शकतो.

झिग्बी वापरणारी उपकरणे : झिग्बी उपकरणाला समर्थन देणारी उपकरणे पुढीलप्रमाणे : बेल्किन वेमो, सॅमसंग स्मार्टथिंग, येल स्मार्ट लॉक, फिलिप्स ह्यू, थर्मोस्टॅट्स फ्रॉम हनीवेल, सिक्युरिटी सिस्टिम फ्रॉम बॉश, कॉमकास्ट एक्सफिनिटी बॉक्स फ्रॉम सॅमसंग, हाइव ॲक्टिव्ह हिटींग अँड ॲक्सेसरीज, ॲमेझॉन इको प्लस, ॲमेझॉन इको शो, इत्यादी. प्रत्येक झिग्बी उपकरण स्वतंत्रपणे जोडण्याऐवजी सर्व उपकरणे नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय हब (Central Hub) आवश्यक असतो. केंद्रीय हब सर्व उपकरणांसाठी नेटवर्कला क्रमवीक्षण करतो आणि आपल्याला केंद्रीय अ‍ॅपसह साधे नियंत्रण प्रदान करतो.

झिग्बी तंत्रज्ञान फायदे आणि तोटे : झिग्बीच्या फायद्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे : नेटवर्क रचना लवचिक आहे, बॅटरीचे आयुष्य चांगले आहे, वीजेचा वापर कमी होतो, व्यवस्थापित करणे खूप सोपे आहे, अंदाजे 6500 नोड्सना समर्थन देते, कमी खर्चिक आहे, स्व:चिकित्सक तसेच विश्वासार्ह आहे, नेटवर्क स्थापित करणे अगदी सोपे आहे, संपूर्ण नेटवर्कमध्ये भार हा समान प्रमाणात वितरीत केले जातो कारण त्यात मध्यवर्ती नियंत्रक समाविष्ट नाही, दूरस्थाचा वापर करून घरगुती उपकरणे देखरेख तसेच नियंत्रित करणे अत्यंत सोपे आहे, झिग्बी नेटवर्कची जुळवणी करणे तसेच नेटवर्कमध्ये अंत उपकरणाला जोडणे/काढणे सोपे आहे.

झिग्बीच्या तोट्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे : मालकाला झिग्बी आधारित उपकरणे नियंत्रित करण्यासाठी प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे, वाय-फायच्या तुलनेत हे सुरक्षित नाही, झिग्बी आधारित घरगुती उपकरणांमध्ये एकदा कोणतीही समस्या उद्भवल्यास त्यास उच्च प्रतिस्थापन किंमत मोजावी लागते, झिग्बीचा पारेषित दर कमी आहे, झिग्बीमध्ये अनेक अंत उपकरणे समाविष्ट करता येत नाही, कार्यालयीन अधिकृत खाजगी माहितीसाठी वापरणे हे खूप धोकादायक आहे, बाह्य वायरलेस संप्रेषण प्रणाली म्हणून याचा वापर केला जात नाही कारण त्यात मर्यादा कमी आहे, इतर प्रकारच्या वायरलेस प्रणालीप्रमाणेच झिग्बी संप्रेषण प्रणाली अनधिकृत लोकांकडून त्रासिक होऊ शकते.

झिग्बी तंत्रज्ञानाचे अनुप्रयोग :  औद्योगिक स्वयंचलन (Industrial Automation) : वस्तुनिर्माण आणि उत्पादन उद्योगात, एक संप्रेषण दुवा सतत विविध परिमाणांचे आणि गंभीर उपकरणांचे परीक्षण करते. म्हणून या क्षेत्रात झिग्बी या संप्रेषणाची किंमत कमी करते आणि मोठ्या विश्वसनीयतेसाठी नियंत्रण प्रक्रियेस अनुकूल करते.

घर स्वयंचलन (Home Automation) : घरगुती उपकरणे दूरस्थपणे नियंत्रित करण्याकरिता उत्तमप्रकारे उपयुक्त आहे. जसे की, लाइटिंग सिस्टम नियंत्रण, उपकरण नियंत्रण, हिटिंग आणि कूलिंग सिस्टम नियंत्रण, सुरक्षित उपकरण प्रक्रिया आणि नियंत्रित, पाळत ठेवणे इत्यादी.

मोजमाप (Smart Metering) : झिग्बीचे दूरस्थ प्रक्रिया हे मोजमाप करण्यास सक्षम आहेत. यामध्ये उर्जा वापर प्रतिसाद, किंमत समर्थन, वीज चोरीवरील सुरक्षा इ. समाविष्ट आहे.

स्मार्ट ग्रिड देखरेख (Smart Grid Monitoring) : या स्मार्ट ग्रिडमधील झिग्बी प्रक्रियांमध्ये दूरस्थ तापमान देखरेख, दोषाचे स्थान, पुनर्स्थापित पावर व्यवस्थापन इत्यादींचा समावेश आहे. झिग्बी तंत्रज्ञानाचा उपयोग वायरशिवाय अंगुलीमुद्रक उपस्थिती प्रणाली (वायरलेस फिंगरप्रिंट अटेंडन्स सिस्टम) आणि होम ऑटोमेशन सारख्या अभियांत्रिकी प्रकल्प तयार करण्यासाठी केला जातो.

कळीचे शब्द : #डिव्हाइसेस # Devices #एनक्रिप्शन#Encryption डेटा संकलन #Data Storage

संदर्भ :

समीक्षक : अक्षय क्षीरसागर