संक्षिप्त रूप आयजी (IG), इंस्टा (Insta) किंवा द ग्राम (the gram). चित्रे-व्हिडिओ सामायिक करणारे अमेरिकेतील सोशस नेटवर्किंग सेवा. याला केल्व्हिन सिस्ट्रॉम (Kelvin Systrom) आणि माइक क्रिगर (Mike Krieger) यांनी तयार केले. फेसबुकने इंस्टाग्रामच्या सेवेला 2012 ला सु. 1 अब्ज डॉलरला खरेदी केले. इंस्टाग्राम या ॲपवर विविध चित्रे-व्हिडिओ यांना फिल्टरच्या (ऑप्टिकल फिल्टर; प्रकाशगाळणी; Optical Filter; Filter) माध्यमातून संपादित करून आणि हॅशटॅग (#; hashtag) व भौगोलिक अंकनाद्वारे (Geographical tagging) आयोजित करता येते. इंस्टाग्रामवर सामायिक केलेले चित्रे-व्हिडिओ (यालाचा पोस्ट्स (Posts) असे म्हणतात) सार्वजनिकरित्या किंवा पूर्व-स्वीकृत अनुयायांना पाहाता येते.
सुरुवातीला इंस्टाग्राममधील मजकूर दृश्यपटलावर चौरस (1 : 1) या क्रियाव्याप्त गुणोत्तरास (Aspect ratio) 640 पिक्सेलसह दिसत असे. मूळत: आयफोनच्या दृश्यपटलाच्या रुंदीशी जुळवून बसेल या पद्धतीने ते तयार करण्यात आले होते. पुढे 2015 साली 1,080 पर्यंत पिक्सेलची क्षमता वाढविण्यात आली. नंतर मॅसेजिंग करण्याच्या वैशिष्ट्यांसह एका पोस्टमध्ये एकाधिक चित्रांची-व्हिडिओंची भर टाकण्याची क्षमता वाढविण्यात आली. स्नॅपचॅटप्रमाणे (Snapchat) एखाद्या गोष्टीसारखे वैशिष्ट्ये त्यात समाविष्ट करण्यात आले. यामुळे वापरकर्त्यांला प्रत्येक चित्राला-व्हिडिओला क्रमवारीत जोडता आले. प्रत्येक पोस्टवर इतर वापरकर्ते 24 तासांपर्यत प्रवेश करू शकतात. 2019 पर्यंत जवळपास 500 दशलक्ष वापरकर्त्यांनी दररोज गोष्ट तयार करणे या वैशिष्ट्यांचा वापर केला. मूळत: ऑक्टोबर-2010 साली आय-ओएसकरिता इंस्टाग्राम तयार करण्यात आले होते. जवळपास दोन महिन्यात दहा लाख, एक वर्षांत 10 दशलक्ष तर जून 2018 पर्यंत जवळपास 1 अब्ज नोदणीकृत वापरकर्त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे इंस्टाग्रामची लोकप्रियता वेगाने वाढत गेली असे प्रदर्शित होते.
इंस्टाग्रामची अँड्रॉइड आवृत्ती एप्रिल-2012 मध्ये प्रकाशित करण्यात आली. डेस्कटॉपचे इंटरफेस असणारी मर्यादित वैशिष्ट्यांसह आवृत्ती नोव्हेंबर 2012 मध्ये प्रकाशित झाली आणि विंडोज-10ची ॲप आवृत्ती ऑक्टोबर 2016 मध्ये प्रकाशित झाली. ऑक्टोबर 2015 पर्यंत जवळपास 40 अब्जाहून अधिक चित्रे इंस्टाग्रामवर टाकण्यात आले. इंस्टाग्रामच्या प्रभावाबद्दल कौतुक केले जात असले तरी, ते विशेषत: धोरण आणि इंटरफेसमधील बदल, परिनिरीक्षकाचे आरोप आणि वापरकर्त्यांद्वारे अपलोड केलेली बेकायदेशीर किंवा अनुचित चित्रे यांबाबत टीकेचे विषय ठरले आहे.
जून 2021 पर्यंत सर्वांत जास्त अनुकरणीय व्यक्ती पोर्तुगिजचा व्यावसायिक फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा असून त्याला 300 दशलक्ष अनुयायी आहेत. तर सर्वाधिक अनुकरणीय महिलांच्या यादीत अमेरिकेतील गायिका ॲरियाना ग्रांड ही आहे.
जानेवारी 2019 पर्यंत एका अंड्याचे सर्वाधिक आवडलेले चित्र हे असून ते @world_record_egg या खात्यावरून प्रकाशित केले आहे. इंस्टाग्राम 2010 च्या दशकात सर्वाधिक डाउनलोड केलेला मोबाइल अॅप आहे.
वैशिष्ट्ये आणि साधने : वापरकर्ते चित्रे आणि लहान व्हिडिओ अपलोड करू शकतात, इतर वापरकर्त्यांच्या पोस्टचे अनुसरण करू शकतात आणि स्थानाच्या नावासह जिओटॅग (Geotag) चित्र देऊ शकतात. वापरकर्ते त्यांचे खाते “खाजगी” म्हणून वापरू शकतात, ज्यामुळे त्यांना कोणत्याही नवीन अनुयायी यांच्या विनंत्यांना मंजूरी आवश्यक असते. वापरकर्ते त्यांचे इंस्टाग्राम खाते अन्य सोशल नेटवर्किंग साइटला जोडणी करू शकतात, जेणेकरुन त्या साइटवर अपलोड केलेले चित्रे सामायिक करण्यास सक्षम होतात. सप्टेंबर 2011 मध्ये, अॅपच्या नवीन आवृत्तीत नवीन आणि थेट फिल्टर, इन्स्टंट टिल्ट-शिफ्ट, उच्च-रिझोल्युशन चित्रे, पर्यायी सीमा, एक-क्लिक फिरविणे आणि चिन्हे समाविष्ट केले गेले. सुरुवातीला फोटो 1: 1 क्रियाव्याप्ती गुणोत्तरास चौरसावर मर्यादित होते; ऑगस्ट 2015 पासून हे अॅप उभ्या आणि मोठ्या पटलाला साहाय्य करते. वापरकर्ते पूर्वी वापरकर्त्याच्या भौगोलिक चित्राचा नकाशा पाहू शकत. हे वैशिष्ट्य कमी वापराचे कारण देत सप्टेंबर 2016 मध्ये काढले गेले. डिसेंबर 2016 पासून, अॅप्सच्या खासगी क्षेत्रात पोस्ट्स “जतन” केल्या जाऊ शकतात. वापरकर्त्यांनी जतन केलेल्या पोस्ट्सना नामांकित संग्रहात व्यवस्थापित करू देण्यासाठी वैशिष्ट्य एप्रिल 2017 मध्ये अद्ययावत केले गेले. वापरकर्ते आपले खाजगी क्षेत्रात “संग्रह” (Archive) मध्ये आपल्या पोस्टस जतन करून ठेऊ शकतात. त्यामुळे इतर वापरकर्त्यांना ते दिसू शकत नाही. इंंस्टाग्रामने चित्रे-व्हिडिओ यांमधील संभाव्य धोके टाळण्यासाठी टिप्पण्या आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वापरकर्त्यांना प्रत्युत्तरांसह सहजतेने संवाद साधता येतो. फेब्रुवारी 2017 पासून, एका पोस्टमध्ये दहा पर्यंत चित्रे-व्हिडिओ समाविष्ट केले जाऊ शकतात, त्यात फिरत्या पट्ट्यासारखे चित्रे-व्हिडिओ पुढे-मागे करण्याची क्षमता असते. एप्रिल 2018 मध्ये इंंस्टाग्रामने “लक्षकेंद्रीत रीत (Focus mode)” नावाच्या उभ्या पद्धतीची आवृत्ती सुरू केली, जे निवडलेल्या विषयावर लक्ष केंद्रित करतेवेळी चित्रे-व्हिडिओची पार्श्वभूमी हळूवारपणे धूसर करते. नोव्हेंबरमध्ये दृष्टिबाधित व्यक्तींसाठी चित्रांचे वर्णन जोडण्यासाठी इंस्टाग्रामने अल्ट टेक्स्ट (Alt text) पाठिंबा देऊ केला. ते एकतर वस्तूंची ओळख स्वयंचलितपणे केले जातात किंवा अपलोडद्वारे व्यक्तिचलितरित्या निर्दिष्ट केले जातात. 2021 मध्ये इंंस्टाग्रामने इंंस्टाग्राम लाइव्ह “रूम्स (Rooms)” नावाचे एक नवीन वैशिष्ट्य सुरू केले, तेथे चार लोक एकत्र राहून संवाद साधू शकतात. निर्मात्यांना त्यांच्या सामग्रीवर बंद मथळे ठेवण्याची अनुमती देण्यासाठी इंस्टाग्रामने इंंस्टाग्राम रील्स (Reals) आणि गोंष्टींवरील व्हिडिओंसाठी नवीन प्रवेशयोग्यता वैशिष्ट्याची घोषणा केली.
इंंस्टाग्राममध्ये हॅशटॅग, अन्वेषण, चित्रे फिल्टर, व्हिडिओ, आयजीटीव्ही, रील्स, इंंस्टाग्राम डायरेक्ट, इंंस्टाग्राम गोष्टी, जाहिरात इ. नवीन वैशिष्टे समाविष्ट आहेत.
इंस्टाग्राम सोबत करता येणारे कार्य : आपण आपले चित्र घ्या, एक अनुकूलित फिल्टर जोडा, आणि इंस्टाग्रामच्या समुदायात किंवा ट्विटर, फेसबुक, फोरस्क्वेअर किंवा टुम्ब्लरद्वारे पोस्ट करा. इंस्टाग्राम अनुप्रयोगाद्वारे आपण “पसंती” देऊ शकता आणि आपल्या चित्रांवर टिप्पण्या देऊ किंवा प्राप्त करु शकता.
इंस्टाग्राममध्ये फेसबुक-स्टाईलफीड आहे, जिथे आपण अपलोड केलेले सर्व चित्रे पाहू शकता, आपण अनुकरण करीत असलेले लोक आणि विशिष्ट ठिकाणी आणि हॅशटॅगवर देखील काय चालले आहे ते पाहता येते. आपल्याला काय हवे आहे हे शोधणे पुरेसे नसल्यास आपण वापरकर्त्याचे नाव, हॅशटॅग किंवा स्थानानुसार चित्रे शोधू शकता.
इंस्टाग्राममध्ये इंस्टाग्राम डायरेक्ट नावाची एक चित्रे-व्हिडिओ संदेशन हे वैशिष्ट्य समाविष्ट आहे. हे आपल्याला चित्रे-व्हिडिओ घेण्यासाठी आणि नंतर इंस्टाग्राम मित्रांबरोबर सामायिक करण्याची परवानगी देते. आपण इंस्टाग्राम डायरेक्टद्वारे आपल्या संपर्कांपैकी 15 व्यक्तींपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवू शकता. एक आश्चर्यजनक अंतर्ज्ञानी चित्र-संपादक देखील आहे. हे आपल्याला तीक्ष्णता, रंगकर्मीबदल आणि ब्राइटनेस सारख्या पैलूंवर समायोजित करून चित्र परिष्कृत करण्याची परवानगी देते.
फायदे : वापरण्यास सोपे, विविध सामाजिक नेटवर्कवर सामायिकीकरण, प्रभावी चित्र संपादक, चित्रामध्ये मित्रांना अंकन करणे, जिओटॅगिंग समर्थन, कॅप्चर आणि शेअर करणे इत्यादी.
कळीचे शब्द : #सोशलनेटवर्किंगॲप #मोबाइलॲप #मॅसेजिंग
संदर्भ :
समीक्षक : विजयकुमार नायक