(ह्युमन रिसोअर्स). मानवी संसाधने म्हणजे लोकांचा समूह. जे एखाद्या संस्थेचे, व्यवसायाचे क्षेत्र, उद्योग किंवा अर्थव्यवस्थेचे कर्मचारी असतात. याची एक त्रोटक संकल्पना म्हणजे मानवी भांडवल. ज्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा वापर करण्यात येतो. तसचे यामध्ये मनुष्यबळ, कामगार, कर्मचारी, सहयोगी किंवा फक्त: लोक यांचा समावेश होतो.

एखाद्या संस्थेचा मानवी संसाधन विभाग (एचआर विभाग; HR Section) मानवी संसाधन व्यवस्थापन करतो, रोजगाराच्या विविध पैलूंवर देखरेख ठेवतो. उदा., कामगार कायदा आणि रोजगार मानकांचे पालन करणे, मुलाखती घेणे, कर्मचारी फायद्यांचे प्रशासन, भविष्यातील संदर्भांसाठी आवश्यक कागदपत्रांसह कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज तयार करणे आणि भरती संदर्भातील विविध पैलू (महत्त्वाच्या काही प्रतिभांसह, त्याच्या स्वभावाबाबत माहिती जतन करणे). मानवी संसाधन हे संस्थेचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून काम करते. या कर्तव्यामध्ये भरती प्रक्रिया, नोकरी संदर्भात जाहिराती काढणे, नोकरीविषयक गोषवारा आणि उपयोजन आयोजित करणे, मुलाखतींची परिशिष्ट यादी तयार करणे आणि प्रक्रियेत मदत करणे, पार्श्वभूमी तपासणे आणि सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. या कर्तव्यांमध्ये कर्मचाऱ्याचे पेरोल तसेच फायदे व्यवस्थापन, ज्यामध्ये सुट्टी आणि वैद्यकीय रजेचा कालावधी सुनिश्चित करणे, पेरोलचे पुनरावलोकन करणे आणि फायदेशीर कार्यांमध्ये सहभागी होणे, उदा., दावा ठराव, फायद्याचे निवेदन यांचा समावेश असतो. तसेच वेतनासाठी चलनाची मान्यता व शेवटची केली गेलेली नोकरी ह्यांचे नियमन केले जाते. वर्तमान मानवी संसाधन दस्तऐवज आणि डेटाबेस अद्ययावत आहेत की नाही, कर्मचारी फायदे आणि रोजगाराची स्थिती राखत आहे की नाही याची खात्री करणे आणि पाठपुरावा करणे ही कामे करतो, तसेच पेरोल/फायदे-संबंधित सुद्धा कामे केली जातात. कॉर्पोरेट व्यवसायामध्ये परंपरेने मानव संसाधनास मालमत्ता म्हणून पहिले जाते, ज्याचे मूल्य पुढील शिक्षण व विकासाने वाढवले ​​आहे, त्यासच मानव संसाधन विकास म्हणतात.

मानवी संसाधने कर्मचा-यांनी पुरवलेल्या श्रमामुळे सुरुवातीस कंपनीला यश मिळवून देण्यामागे  महत्वाची भूमिका निभावतात. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम कार्यप्रणाली आणण्यासाठी आणि म्हणून चांगले कामकाजाचे वातावरण निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

अर्थातच मानव संसाधन व्यवस्थापन कार्यरत संस्थांमधील लोकांचे व्यवस्थापन करते. यालाच कर्मचारी व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, कर्मचारी संबंध, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि कर्मचारी प्रशासन असेही म्हणतात. हे सामान्य व्यवस्थापनाच्या प्रमुख उपश्रेणीचे प्रतिनिधित्व करते, केवळ मानवी संसाधनांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते, उदा., आर्थिक किंवा भौतिक संसाधनांपासून वेगळे केले जाते. विशेष कर्मचारी अधिकारी किंवा विभागांना नियुक्त केलेल्या निवडक विशिष्ट कार्ये किंवा क्रियाकलापांचा संदर्भ देण्यासाठी हा शब्द वापरला जाऊ शकतो. कर्मचारी भरती, वाटप, नेतृत्व आणि दिशा यांमधील व्यवस्थापन धोरणे आणि कार्यक्रमांची संपूर्ण व्याप्ती ओळखण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

संदर्भ :

समीक्षकअक्षय व्यंकटराव क्षीरसागर