(कस्टमर रेलेशनशिप मॅनेजमेंट; सीआरएम). ग्राहक संबंध व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात माहितीचा अभ्यास करून, त्याचे विश्लेषण करून व्यवसाय किंवा इतर संस्था ग्राहकांशी संवाद साधतात. या प्रकारांचे सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअरची श्रेणी असून त्यात व्यवसायांचा विस्तृत संच समाविष्ट असताे. या प्रकारांचे साॅफ्टवेअर व्यवसायांना खालील बऱ्याच व्यावसायिक प्रक्रियेस व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी आरेखित केलेले आहे : ग्राहकांची माहिती, ग्राहक संवाद, व्यवसाय माहितीमध्ये प्रवेश करणे, स्वयंचलित विक्री, पाठपुरावा करणे, करार, विपणन, ग्राहक साहाय्यता, ग्राहक आणि संपर्क, विक्रेता/भागीदार संबंध समर्थन, कर्मचारी ज्ञान आणि प्रशिक्षण, मालमत्ता किंवा संसाधने इत्यादी. व्यवसायात प्रगती करण्यासाठी स्वयंचलित विक्री (सेल्स ऑटोमेशन) करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. विक्री ही या कार्यपद्धतीतील कंटाळवाणी आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. स्वयंचलित पद्धतीने विक्रीची कामे सुव्यवस्थित होऊन, विक्री प्रक्रिया कार्यसंघ प्रशासकावर कमी लक्ष देते आणि विक्रीवर अधिक लक्ष केंद्रित करते.
सीआरएम सॉफ्टवेअर हे बऱ्याच क्षमता एकत्रित करते. या प्रणालीमधून बाहेर पडताना आपण आपले सर्व संभाव्य ग्राहक आणि ग्राहकांना संग्रहित करू शकताे, संपर्क करू शकता, ई-मेल पाठवू शकतो, विक्रीचा अहवाल तयार करू शकतो, नियोजित भेटी निर्धारित करू शकतो, नोट्स जोडू शकतो आणि आपला नवीनतम ई-मेल कोणी उघडला आहे ते शोधू शकतो.
व्यवसायातील ग्राहक संबंध व्यवस्थापित करण्यासाठी सीआरएम सॉफ्टवेअरचा सर्वसाधारणपणे वापर केला जातो. तसेच सीआरएम सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर व्यवसायातील संपर्क, कर्मचारी व्यवस्थापन, ग्राहक संबंध सुधारणे, करार मिळाविणे आणि विक्रीवर आघाडी व्यवस्थापित करण्यासाठी देखील केला जातो. सहसा, नवीन योजनांमध्ये सीआरएम सॉफ्टवेअर वापरला जातो, तथापि बऱ्याच उत्पादनांचा आकार आणि कोणत्याही आकाराच्या व्यवसायात वापरला जाऊ शकतो. सीआरएम किंवा ग्राहक संबंध व्यवस्थापन हे एखाद्या संघटनेच्या संबंधांचे व्यवस्थापन आणि ग्राहक आणि संभाव्य ग्राहकां विषयीच्या परस्पर संवादांचे एक धोरण आहे. सीआरएम प्रणाली कंपन्याना ग्राहकांशी जोडून ठेवण्यात मदत करते, प्रक्रिया सुलभ करते आणि नफा वाढवते.
वैशिष्ट्ये : सीआरएम हे एक तांत्रिक सॉफ्टवेअर आहे, जे क्लावुडच्या (Cloud) साहाय्यानेही उपलब्ध होते. वापरकर्ते आणि कंपनी यांच्यातील संवादांची नोंद ठेवून त्याला अहवाल आणि विश्लेषण करण्यासाठी वापरतात. याला सीआरएम यंत्र असेही म्हणतात. सीआरएम एक धोरण असून हे ग्राहकांचे आणि संभाव्य ग्राहकांशी कसे संबंध राखले जावे याबद्दल एक व्यवसायिक तत्त्वज्ञान आहे. सीआरएम हे ग्राहकांचे नातेसंबंध व्यवस्थापन करणारी एक प्रक्रिया आहे.
संदर्भ :
- https://www.salesforce.com/eu/learning-centre/crm/what-is-crm/
- https://www.webopedia.com/TERM/C/crm_software.html
- https://www.salesforce.com/crm/what-is-crm-infographic/#
- https://www.zoho.in/crm/what-is-crm.html
- https://en.wikipedia.org/wiki/Customer_relationship_management.
समीक्षक : अक्षय व्यंकटराव क्षीरसागर