(ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग). हे एक सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वस्तूमध्ये डेटा (विदा) आणि निर्देश दोन्ही असतात. यामुळे याचा वितरित संगणनात सहभाग वाढत आहे. संगणकशास्त्रात वस्तू या शब्दाचा अर्थ चल, विदा संरचना, एखादे चलन किंवा एखादी प्रक्रिया यानुरूप वापरण्यात येते. स्मृतीच्या क्षेत्रामध्ये वस्तूमध्ये मूल्य असतात आणि त्याला ओळख पटविणाऱ्याद्वारे संदर्भित केले जाते. वस्तु-अभिमुख कार्यक्रमण नमुन्यामध्ये वस्तू म्हणजे वेगवेगळ्या चल, चलन आणि विदा संरचनेचे संयोजन असू शकते. उदा., प्रतिमानाच्या वर्ग-आधारित भिन्नतेमध्ये ते वर्गाच्या विशिष्ट उदाहरणाचा संदर्भ देतात. वस्तु-अभिमुख कार्यक्रमण हे कार्यक्रमण भाषेचा नमुना आहे, जे तर्कांऐवजी क्रिया आणि विदाऐवजी वस्तूभोवती संघटीत केली जाते. वास्तविकदृष्ट्या कार्यक्रमण ही तार्किक प्रक्रिया म्हणून पाहिले गेले आहे, जे आदान माहिती स्वीकारून त्यावर प्रक्रिया करते आणि उत्पादित विदा तयार करते.

अगोदरच्या कार्यक्रमण भाषांना जलद आणि देखरेख करणे सोपे करण्यासाठी पूर्वनिर्धारित कार्यक्रमण प्रतिमानातील एककांचा वापर (वस्तू, वर्ग, उपवर्ग) वस्तु-अभिमुख कार्यक्रमण यात करण्यात येते. वस्तु-अभिमुख कार्यक्रमण भाषा मोठ्या कार्यक्रमणामधील जटिलता व्यवस्थापित करण्यास मदत करतात. वस्तूमध्ये विदा आणि त्यावरील प्रक्रिया यांचा समावेश होत असल्याने फक्त त्यावरील प्रक्रियाच सार्वजनिकरित्या प्रवेशयोग्य असतात आणि विदा संरचनेचे अंतर्गत तपशील लपवले जातात. ही माहिती लपविल्याने आज्ञावलीकाराला कार्यक्रमणाच्या प्रत्येक भागाचा एकांतात विचार करण्याची परवानगी देऊन मोठ्या प्रमाणात आज्ञावली तयार करणे सोपे होते. याव्यतिरिक्त, वस्तू अधिक सामान्य गोष्टींमधून प्राप्त केल्या जाऊ शकतात, त्यांच्या क्षमतांचा ‘अनुवांशिकतेने वारसा’ घेतात. अशा वस्तू पदानुक्रमाने सामान्य वस्तूंमध्ये असलेल्या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती न करता विशेष वस्तूंना परिभाषित करणे शक्य करते.

वस्तु-अभिमुख आज्ञावलींची सुरुवात सिमुला (Simula; 1967) भाषासह झाली, ज्याने अल्गोल (ALGOL) मध्ये माहिती लपवली. स्मॉलटॉक (Smalltalk;1980) ही आणखी एक प्रभावशाली वस्तु-अभिमुख भाषा आहे, ज्यामध्ये एक आज्ञावली म्हणजे एकमेकांना संदेश पाठवून संवाद साधणाऱ्या वस्तूंचा संच असतो. 1990 पासून, जावा (Java) ही सर्वात यशस्वी भाषांपैकी एक आहे.

वस्तू हा वस्तु-अभिमुख आज्ञावलीचा मूळ घटक आहे. विदा आणि निर्देश एकत्रितपणे वस्तू नावाच्या स्वयं-अंतर्भूत घटक म्हणून एकत्रित केली जाते.

महत्त्वाच्या संकल्पना : कोशीकरण आणि सारांशीकरण : माहिती आणि प्रक्रिया यांना एकत्र करणे यास विदा संचयन कुपी (एनकॅप्युलेशन) म्हणून ओळखले जाते. डेटा बाहेरील जगासाठी प्रवेश योग्य नाही आणि फक्त त्याच प्रक्रिया प्रवेश करू शकतात ज्या माहितीसोबत एकत्र जोडलेल्या आहेत. आज्ञावलीद्वारे डेटाकडे थेट प्रवेश रोखणे किंवा डेटा लपविणे म्हटले जाते. डेटा सारांश (ऍबस्ट्रक्शन) म्हणजे बाह्य जगात केवळ आवश्यक माहिती प्रदान करणे आणि अंमलबजावणी संबंधित तपशील लपविणे होय. आनुवंशिकता : (इंहेरिटन्स). ही एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एका वर्गातील वस्तू दुसऱ्या वर्गातील वस्तूंचा गुणधर्म मिळवतात. ही प्रक्रिया श्रेणीबद्ध वर्गीकरण संकल्पना याला समर्थन देते. आनुवंशिक प्रक्रिया वंशानुक्रम पुनर्उपयोगीता प्रदान करते. याचा अर्थ असा आहे की, आपण विद्यमान वर्गात (Class) अतिरिक्त सुधारणा करून त्यात अतिरिक्त वैशिष्ट्ये जोडू शकतो. बहुरूपता (पॉलिमॉर्फिझम; Polymorphism) : इंग्रजीत पॉली (Poly) म्हणजे अनेक, बहू. गणितीय चालक (ऑपरेटर) किंवा चलन (फंक्शन्सला) यांना भिन्न अर्थ किंवा कार्य देण्यास, दुसऱ्या शब्दात गणितीय चालक किंवा चलन भिन्न प्रकारे वापरण्याची क्षमता याला बहुरूपता असे म्हटले जाते.

पहा : संगणक कार्यक्रमण.

संदर्भ :

समीक्षक : विजयकुमार नायक