दोन किंवा त्यांपेक्षा जास्त व्यापारी घटकांकडून वस्तूंच्या खरेदी-विक्रीबाबत पाळले गेलेल्या निर्बंधांना व्यापार शर्ती असे म्हणतात. व्यापार शर्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर, देशपातळीवर, राज्यपातळीवर, जिल्हापातळीवर आणि काही प्रमाणात गावपातळीवरसुद्धा दिसून येतात.
व्यापार शर्तीचे प्रकार : (१) वस्तूगत व्यापार शर्ती (कमोडिटी टर्म्स ऑफ ट्रेड) : याला निव्वळ वस्तूविनिमय व्यापार शर्ती (नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड) असेही म्हणतात. व्हायनर यांनी वस्तूगत व्यापार शर्तीची कल्पना समीकरणाद्वारे मांडली आहे.
ep1 = चालू वर्षातील निर्यात मूल्य
ep o = आधार वर्षातील मूल्य
ep OIPI = चालू वर्षातील आयात मूल्य
Tc = ———- ×100 Ipo = आधार वर्षातील आयात मूल्य
e = निर्यात, P = मूल्य किंवा किंमत, I = आयात, IP = आयातीचे मूल्य, O हे आधार वर्ष व 1 हे चालू वर्ष दर्शवितो.
वरील सुत्रांत Tc म्हणजे निर्यात वस्तूच्या एका मात्रेच्या बदल्यात मिळणाऱ्या विदेशी वस्तूंच्या भौतिक मात्रांची प्रवृत्ती मोजणारा निर्देशांक होय. हा निर्देशांक पूर्वीपेक्षा वाढला, तर व्यापार शर्ती अनुकूल झाल्याचे समजते. याउलट, हा निर्देशांक घटला, तर व्यापार शर्ती प्रतिकूल झाल्याचे समजावे. निर्यात किमतीमधील बदलाचे आयात किमतीमधील असलेले गुणोत्तर काढले म्हणजे देशाच्या व्यापार शर्तीत झालेला बदल मोजता येतो.
(२) आयगत व्यापार शर्ती (इन्कम टर्म्स ऑफ ट्रेड) : व्यापाराच्या आकारमानात झालेल्या बदलांच्या परिणामांचा विचार वस्तूगत व्यापार शर्तीत होत नाही. ही त्रुटी दूर करण्याकरीता आयगत व्यापार शर्तीची संकल्पना जी. एस. डॉरन्स यांनी मांडली. याचे सूत्र पुढील प्रमाणे आहे.
Ty = tcQXO
Tc म्हणजे वस्तूगत व्यापार शर्तीला निर्यातीच्या आकारमानातील बदलाच्या निर्देशांकाने गुणले असता आयात व्यापार QXO शर्ती कळू शकतात. हे वरील सुत्रावरून स्पष्ट होते.
QX1 = चालू वर्षातील निर्यातीचे परिमाण
Tc = tc – QXO = आधार वर्षातील निर्यातीचे परिमाण
X = निर्यात व Q = परिमाण सुत्रात किमती ठेऊन
समजा १९९० ते १९९५ या कालखंडात एका देशाच्या वस्तूगत व्यापार शर्ती १०० पासून ८० पर्यंत कमी होतात. म्हणजे १९९० च्या तुलनेत १९९५ मध्ये २० टक्के आयाती कमी मिळायला पाहिजे. म्हणजे देशाची आयात क्षमता ही कमी व्हायला हवी; परंतु आयात क्षमता ही कमी न होता पूर्वीपेक्षा वाढलेली असते. याचे कारण १९९० ते १९९५ या कालावधीत निर्यातीच्या (व्यापाराच्या) आकारमानात १०० पासून १५० पर्यंत वाढ झाली.
आयगत व्यापार शर्ती वाढून १२० झाल्यात. अशाप्रकारे निर्यातीच्या प्रत्येक मात्रेच्या मोबदल्यात कमी आयाती मिळत असल्या, तरी देशाची आयात क्षमता सुधारलेली आहे हे कळते. ही कल्पना वस्तूगत व्यापार शर्तीवरून येत नाही.
आयगत व्यापार शर्तीतील कमतरता म्हणजे या शर्तीवरून देशाच्या उत्पन्नात काय बदल झाला याची कल्पना येत नाही. असे असले, तरी आयातीची किंमत निर्यातीद्वारे देश फेडू शकतो किंवा नाही. याची कल्पना येण्याकरीता या शर्ती उपयुक्त ठरतात.
(३) एक घटक व्यापार शर्ती (सिंगल फॅक्टरिअल टर्म्स ऑफ ट्रेड) : व्हायनर यांनी वस्तूगत व्यापार शर्तीतील दोष दूर करण्यासाठी या शर्तीची मांडणी केली आहे. यासाठी त्यांनी निर्यात वस्तूच्या उत्पादन परिव्ययाचा म्हणजेच उत्पादकतेचा निर्देशांक तयार केला. हा निर्देशांक निर्यात वस्तूंच्या उत्पादनाचा सरासरी तांत्रिक गुणक या सरासरी स्वरूपात तयार करण्यात येतो. वस्तूगत व्यापार शर्तीच्या निर्देशांकाला या सरासरी तांत्रिक गुणकाच्या निर्देशांकाच्या व्यस्तकाने गुणल्यास त्यामुळे मिळणारा फलित निर्देशांक हा व्यापार लाभाची प्रवृत्ती वस्तूगत व्यापार शर्तीच्या निर्देशांकापेक्षा अधिक चांगल्या रितीने स्पष्ट करू शकतो. या सुधारित निर्देशांकाला व्हायनर ‘एक घटक’ (साधानिक) व्यापार शर्ती असे म्हणतात. व्हायनर यांनी याचे सूत्र पुढील प्रमाणे दिले आहे.
Ep1 वरील सुत्रात हा सरासरी तांत्रिक गुणकाच्या निर्देशांकाचा व्यस्तांक आहे. या व्यस्तांकाने वस्तूगत Ep0
eF0 व्यापार शर्तीला गुणले असता एक घटक व्यापार
Tc = f ——X——
eF1 शर्ती तयार होतात.
Ip1
Tc f = Tc X eF0
—- eF1
एक घटक व्यापार शर्तीतील दोष म्हणजे यात आयातीच्या संभाव्य स्वदेशी उत्पादन व्ययातील बदलांचा विचार केलेला नाही. हा दोष दूर करून वास्तविक लाभाची कल्पना याकरिता व्हायनर यांनीच वास्तविक व्यय व्यापार शर्तीचा निर्देशांक उपयोगात आणण्याची सूचना केली. एखाद्या देशातील उत्पादक घटकांच्या सेवाचा विदेशी वस्तूंशी कोणत्या दराने विनिमय होतो, हे या शर्तीद्वारे स्पष्ट होते.
(४) द्विघटक व्यापार शर्ती (डबल फॅक्टरिअल टर्म्स ऑफ ट्रेड) : स्वदेशी घटकांच्या एकमात्र सेवेपासून उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या ज्या विदेशी वस्तूशी विनिमय होतो, त्यात विदेशी घटकांच्या किती मात्रा अंतर्भूत आहेत, याचा विचार करण्याच्या दृष्टीने व्हायनर यांनी द्विघटक व्यापार शर्ती ही संकल्पना मांडली. ही संकल्पना सुत्ररूपात पुढील प्रमाणे आहे.
ep1 IF1
——- —–
ep0 IF0
Tc = t — X ——
Ip1 eF1
——- —–
Ip0 eF0
व्हायनर यांच्या मते, द्विघटक व्यापार शर्ती निर्देशांक हा देशाला निरपेक्ष लाभ किती मिळतो, हे दर्शविणाऱ्या निर्देशांकाऐवजी लाभाची आंतरराष्ट्रीय विभागणी कशाप्रकारे होते, हे दर्शविणाऱ्या निर्देशांकाला अधिक जवळचा आहे.
वस्तूगत व्यापार शर्ती व द्विघटक व्यापार शर्ती या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत, असे काही अर्थशास्त्रज्ञांचे मत होते. स्थिर व्ययाचे गृहित हे अवास्तव आहे; कारण उत्पादन व्ययात काळानुसार बदल होतात.
(५) स्थूल वस्तूविनिमय व्यापार शर्ती : वस्तूगत व्यापार शर्तीलाच टॉसिंग यांनी ‘निव्वळ वस्तू विनिमय व्यापार शर्ती’ असे म्हटले आहे. या निव्वळ वस्तूविनीमय व्यापार शर्तीमधील दोष दूर करण्याकरिता टॉसिंग यांनी स्थूल वस्तूविनिमय व्यापार शर्तीची संकल्पना मांडली.
या व्यापार शर्तीचा संबध वस्तूच्या किमतीऐवजी वस्तूच्या परिणामाशी असतो. वास्तविक निर्यात परिमाम किंवा मात्रा आणि वास्तविक आयात परिणाम लक्षात घेण्यात येतो. या व्यापार शर्तीचे सूत्र पुढील प्रमाणे मांडण्यात येते.
Qe1 Qe0
G = —– : ——
QI1 QI0
वरील सुत्रात G = स्थूल वस्तू विनीमय व्यापार शर्ती
Qe1 = चालू काळातील निर्यातीच्या मात्रा किंवा परिमाण
Qe0 = आधार काळातील निर्यातीच्या मात्रा किंवा परिमाण
QI1 = चालू काळातील आयातीचे परिमाण
QI0 = आधार काळातील आयातीचे परिमाण
या सूत्रातील परिमाणे निर्देशांकाच्या रूपात आहेत. परिमाणाला किमतीने गुणले म्हणजे एकूण मूल्य कळते व एकूण मुल्यांच्या निर्देशांकाला किंमत निर्देशांकाने भागितले असता परिमाणांचा निर्देशांक मिळतो. जेव्हा G हा पूर्वीपेक्षा वाढतो, तेव्हा व्यापार शर्ती अनुकूल झाल्या असे समजण्यात येते. G चे उत्तर पूर्वीपेक्षा कमी झाल्यास व्यापार शर्ती प्रतिकूल झाल्या असे समजले जाते.
व्यापार शर्ती ही संकल्पना : व्यापार शर्ती ही संकल्पना एका अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांनी इ. स. १९२७ मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार या पुस्तकात विकसित केलेली आहे; परंतु या संकल्पनेसंदर्भात त्यांच्याही आधी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट टोरेन्स यांनी इ. स. १८४४ मध्ये त्याच्याच अंदाजपत्रक : व्यापारी व धोरण, त्याच बरोबर याचवर्षी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन स्ट्यूअर्ट मिल यांनी त्यांच्या निबंधात व्यापारी जगतातील देशामधून व्यापाराच्या लक्षाचे वर्गीकरण आणि राष्ट्राराष्ट्रांतील आंतरिक नियम यासंबंधांत पुस्तकात अगोदरच उल्लेख केलेला होता.
व्यापार शर्ती हे निर्यात वस्तूच्या एका एककासाठी किती आयात वस्तू अर्थव्यवस्थेतून मिळू शकतात, याचे मोजमाप करत असते. उदा., समजा अर्थव्यवस्थेत फक्त सफरचंदाची निर्यात केली जाते व संत्र्यांची आयात केली जाते, तर साधारणत: सफरचंदाची किंमत विरुद्ध संत्र्याची किंमत असे व्यापारशर्ती असते किंवा एका सफरचंदासाठी किती संत्रे दिली जातात. तसेच अर्थव्यवस्थेत पुष्कळ वस्तू आयात व निर्यात केल्या जातात. या मोजमापासाठी आयात केलेल्या व निर्यात केलेल्या व्यापारशर्तीच्या वस्तूच्या किमतीत निर्देशांकाची गरज असते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केलेल्या वस्तूंच्या किमंतीमध्ये वाढ झाली असता व्यापारशर्तीत वाढ होते आणि आयात केलेले वस्तूंच्या किमतीती घट होते. उदा., तेल निर्यात करणारे देश. वस्तूच्या आयातीच्या बदल्यात निर्यात केलेल्या वस्तूचा दर व्यापारशर्तीमधून दर्शविला जातो, जो आयात केलेल्या वस्तूची किंमत व निर्यात केलेल्या वस्तूची किंमत यांवर अवलंबून असतो. वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी चलने असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात विनिमयपद्धत उपयोगात आणली जाते. त्यामुळे प्रत्येक देशाला आयाताचे मूल्य निर्यातीच्या स्वरूपात दिले जाते. आयात वस्तूच्या परिमाणाच्या बदल्यात निर्यात वस्तूच्या परिमाणाचे दर म्हणजे व्यापार शर्ती होय.
एका देशातून केलेली आयात ही दुसऱ्या देशाकडून केलेली निर्यात असते. उदा., समजा एका देशाने १०० डॉलर आयात वस्तूच्या बदल्यात ५० डॉलर किमतीची निर्यात वस्तू देतो. म्हणजे तो देश व्यापार शर्ती देतो आणि दुसरा देश व्यापार शर्ती घेत असतो.
१०० ÷ ५० = २ जेव्हा हा क्रमांक कमी होत जातो, तेव्हा त्यास खराब गुणांक व्यापार शर्ती असे म्हणतात. जर यास १०० ने गुणल्यास ते टक्केवारीमध्ये दर्शविता येईल. जर देशाच्या व्यापार अटीमध्ये धारणा झाली, तर १००% ते ७०% (१.० ते ०.७) ३०% हे खराब गुणांक व्यापार शर्तीत आहे. व्यापार शर्तीमध्ये पर्यायी निर्देशांकाचा उपयोग केला जातो.
समीक्षक : दि. व्य. जहागिरदार