(प्रस्तावना) पालकसंस्था : गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, पुणे | समन्वयक : संतोष दास्ताने | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मनुष्याचा समाजातील वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या सामाजिक शास्त्रांमधील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र म्हणून अर्थशास्त्र ओळखले जाते. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी चाणक्य-कौटिल्याने अर्थशास्त्र हा अजरामर ग्रंथ लिहिला. मानवसंस्कृती जसजशी विकसित होत गेली, तसतशी मानव समाजातील अर्थव्यवस्था विकसित होत गेली. म्हणजेच अर्थशास्त्र बदलत गेले. पाश्चात्त्य देशांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा उदय अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला, असे म्हटले जाते. भारतातही अस्सल भारतीय आर्थिक विचार मांडणाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आघाडीवर होते. मानवाच्या अमर्याद गरजा पूर्ण करण्याकरिता हाताशी असलेल्या मर्यादित साधनसामग्रीचा वापर कसा करायचा, याचे आडाखे शिकविणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असे याचे स्थूलमानाने स्वरूप आहे. भाववाढ, कर, तेजी-मंदी, चलनाचा विनिमय दर इत्यादी कारणांमुळे तसेच दारिद्र्य-विषमता या समस्यांमुळे सामान्य माणसांचा अर्थशास्त्राशी संबंध येतो. आता तर अर्थशास्त्राची व्याप्ती चहूबाजूंनी विस्तारली आहे. आर्थिक सिद्धांत, आर्थिक धोरण, आर्थिक संकल्पना, आर्थिक संशोधन, बँकांसारख्या आर्थिक संस्था इत्यादींचा अभ्यास येथे अनिवार्य मानला जाऊ लागला आहे. अर्थशास्त्राच्या विकासाला नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांसारख्या विद्वान विचारवंतांनी नवे परिणाम दिले. अर्थशास्त्राने केवळ सिद्धांत-आकडेवारी यांमध्येच गुंतून न राहाता शिक्षण, आरोग्य, आयुर्मान, घरबांधणी, पिण्याचे पाणी अशा अनंत समस्यांशी भिडावे असे त्यांनी आग्रहाने सूचविले आहे. १९६८ सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या अनेक विद्वानांनी असे अपारंपारिक नवोन्मेषी विचार मांडले आहेत.

आज विकासाचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, नागरीकरणाचे अर्थशास्त्र, आरोग्याचे अर्थशास्त्र अशा नवनवीन उपविषयांनी हे गतिमान शास्त्र सर्वव्यापी झाले आहे. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र, वित्तव्यवहार, प्रशासन इत्यादी विद्याशाखांना आज अर्थशास्त्र स्पर्श करते. अध्यापन, संशोधन, विश्लेषण, निर्णयशास्त्र, सामाजिक पूर्वकथन अशा कितीतरी आंतरक्रिया यात समाविष्ट होतात. प्रशासक, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पत्रकार, बँकर्स, विमा व्यावसायिक, शेअर्स गुंतवणूकदार, वित्तविश्लेषक, उद्योजक, लोकप्रतिनिधी, समाजशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, धोरणकर्ते, माध्यमांचे अभ्यासक इत्यादींना अर्थशास्त्र हा विषय अभ्यासयुक्त-वाचनीय आहे.

७२ चा नियम (Rule of 72)

७२ चा नियम

गुंतवणूक केलेला पैसा किती वर्षांत दुप्पट होईल, हे निश्चित करण्यासाठीचा एक नियम. इटालियन गणितज्ज्ञ फ्रा लुका बारटोलोनिओ डी पासिओली हे ...
अँगस एस. डेटन (Angus S. Deaton)

अँगस एस. डेटन

डेटन, सर अँगस एस. (Deaton, Sir Angus S.) : (१९ ऑक्टोबर १९४५). प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती ...
अतिरिक्त क्षमता (Excess Capacity)

अतिरिक्त क्षमता

उद्योगसंस्थेच्या पारंपरिक सिद्धांतात उत्पादन व्यय वक्राचा आकार इंग्रजी U अक्षराप्रमाणे आहे. U आकारामुळे उद्योगसंस्थेच्या अतिरिक्त क्षमतेची समस्या दृग्गोचर होते. उद्योगसंस्थेच्या ...
अत्युच्च भार किंमत निश्चिती (Peak Load Pricing)

अत्युच्च भार किंमत निश्चिती

अत्युच्च भार किंमत निश्चिती ही किंमत ठरविण्याची अशी व्यूहरचना आहे की, ज्यामध्ये वस्तू व सेवा यांची मागणी जास्त असताना जास्त ...
अधिकार दृष्टीकोन (Entitlement Approach)

अधिकार दृष्टीकोन

गरीबी, वंचितता, दुष्काळ, दारिद्र्य व भूकबळी यांचे विश्लेषण करणारी एक अर्थशास्त्रीय संकल्पना. यालाच अधिकारिता तत्त्व असेही म्हणतात. या संकल्पनेचे विश्लेषण ...
अध्ययन वक्र (Learning Curve)

अध्ययन वक्र

अनुभव वक्र. अनुभवाच्या उत्पादनखर्चावर होणाऱ्या परिणामाचे गणितिक प्रमाण. या वक्राला ‘विद्वता वक्रʼसुद्धा म्हणतात. १९३६ मध्ये प्रसिद्ध अमेरिकन वैमानिक आणि प्रशिक्षक ...
अनुत्पादक मालमत्ता (Non Performing Asset - NPA)

अनुत्पादक मालमत्ता

बँकेशी संबंधित असलेली एखादी मालमत्ता जेव्हा उत्पन्न निर्माण करण्यास असमर्थ असते, तेव्हा तिला अनुत्पादक मालमत्ता असे म्हणतात. बँकेने ग्राहकाला दिलेल्या ...
अनुसूचित बँका (Scheduled Banks)

अनुसूचित बँका

आधुनिक काळातील बँका जी कामे करतात, त्यांपैकी बहुतेक कामे ब्रिटिशपूर्व भारतात सावकारी पेढ्यांमार्फत पार पाडली जात. त्यामुळे त्यांचा उल्लेख एतद्देशीय ...
अनौपचारिक अर्थव्यवस्था (Informal Economy)

अनौपचारिक अर्थव्यवस्था

किमान मजूर एकत्र येऊन काम करण्याचे एक क्षेत्र. अनौपचारिक अर्थव्यवस्थेला असंघटित क्षेत्र असेही म्हणतात. अनौपचारिक अर्थव्यवस्था हा शब्द प्रथमत: १९७१ ...
अन्न सुरक्षा (Food Security)

अन्न सुरक्षा

सर्व नागरिकांना पुरेसे, वेळेवर आणि सर्वकाळ म्हणजेच बाराही महिने चांगल्या दर्जाचे अन्न मिळणे म्हणजे अन्न सुरक्षा, असे ढोबळ मानाने म्हणता ...
अभिजित बॅनर्जी (Abhijit Banerjee)

अभिजित बॅनर्जी

बॅनर्जी, अभिजित (Banerjee, Abhijit) : (२१ फेब्रुवारी १९६१). अमेरिकेत स्थित प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व नोबेलस्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक स्तरावरील गरिबी ...
अमर्त्य सेन (Amartya Sen)

अमर्त्य सेन

सेन, अमर्त्य : (३ नोव्हेंबर १९३३). जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न आणि अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे मानकरी. कल्याणकारी अर्थशास्त्र, ...
अर्थशास्त्र (Economics)

अर्थशास्त्र

मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र ...
अवपुंजन (Dumping)

अवपुंजन

अवपुंजन म्हणजे एखाद्या राष्ट्राने किंवा एखाद्या व्यापारीमंडळाने केलेली वस्तूची अशी निर्यात की, ज्या वस्तूची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात त्या वस्तूच्या निर्माण ...
असंघटित क्षेत्र (Unorganised Sector)

असंघटित क्षेत्र

खाजगी किंवा अत्यल्प कर्मचारी असलेल्या घरगुती व्यवसायांचे एक क्षेत्र. हे व्यवसाय क्षेत्र अनौपचारिक क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या क्षेत्रात लघु ...
आडत (Factoring)

आडत

आडत हा वित्तपुरवठा करण्याचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये व्यवसाय आपले प्राप्य लेखे किंवा बीजके (Invoice) एका तिसऱ्या पक्षास विकून आपली ...
आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँक (Bank For International Settlement)

आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँक

जागतिक स्तरावर बँक व्यवसाय करणारी तसेच जगातील अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांची बँक म्हणून कार्यरत असलेली सर्वांत जुनी वित्तसंस्था. पहिल्या महायुद्धात ...
आभास खंड (Quasi Rent)

आभास खंड

खंडनिभ. कोणत्याही घटकास तात्पुरता मिळणारा अतिरिक्त नफा म्हणजे त्याचा आभास खंड होय. तो खंडासारखा वाटतो; परंतु आर्थिक स्वरूपाचा नसतो. आभास ...
आर. गांधी समिती (R. Gandhi Committee)

आर. गांधी समिती

मालेगाम समितीच्या शिफारशींची पडताळणी करणे आणि मान्यताप्राप्त व्यावसायिक रूपरेषा, व्यावसायिक आकार आणि आव्हानांची पडताळणी करून शिफारस करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ...
आर्थिक पर्यावरण (Economic Environment)

आर्थिक पर्यावरण

सभोवताली असलेल्या विविध आर्थिक घटकांमधील परस्परसंबंध म्हणजे आर्थिक पर्यावरण होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सभोवतालची आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक पर्यावरण ...