वेल्च, विल्यम हेन्री : (८ एप्रिल १८५० – ३० एप्रिल १९३४) विल्यम हेन्री वेल्च यांचा जन्म नॉर्फोक कनेक्टिकट येथे झाला. वेल्स यांचे शिक्षण नॉर्फोक अकादमी आणि विंचेस्टर संस्था या बोर्डींग शाळेत झाले. वेल्च यांनी ग्रीक आणि अभिजातचा अभ्यास येल विद्यापीठातून केला. वेल्स यांना सुरुवातीला डॉक्टर बनण्यात स्वारस्य नव्हते. त्यांची महत्त्वाकांक्षा ग्रीक शिकण्याची होती. त्यांनी ए. बी. पदवी प्राप्त केली आणि कवटी आणि हाडे संशोधन समितीमध्ये सामील झाले.
नॉर्वीच न्यूयॉर्कमध्ये थोड्या काळासाठी अध्यापन करून पुढे त्यांनी औषध अभ्यासासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी एम. डी. पदवी प्राप्त झाली. त्यांनी ज्युलियस कोनहम यांच्यासोबत अनेक जर्मन प्रयोगशाळांमध्ये अभ्यास केला. त्यांच्या या अनुभवातून त्यांनी एक नवीन वैद्यकीय संस्था चालू करण्याची योजना केली. त्यांनी अमेरिकेत बेलव्यू मेडिकल कॉलेज सुरू केले. आता ही संस्था न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलच्या अंतर्गत काम करते. बॉलटिमूर येथील नव्याने निर्माण झालेल्या जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटल व मेडिकल स्कूल येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्यांमध्ये ते प्रथम होते. त्यांच्याकडे १६ पदवीधर डॉक्टर होते. वेल्स हे पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले. ते जॉन्स हॉपकिन्स वैद्यकीय विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले आणि नंतर त्यांनी जॉन हॉपकिन्स स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य शाळेची स्थापना करून नेतृत्व केले. ही शाळा देशातील पहिली सार्वजनिक आरोग्य शाळा ठरली. या दरम्यान वेल्स यांनी एक नवीन वैद्यकीय ग्रंथालय चालू केले. त्यांनी अनेक संशोधक तयार केले. त्यात यलो फीवरचे संशोधक वॉल्टर रीड, मेडिकल रिसर्च रॉकफेलर इन्स्टिट्यूटचे संस्थापक निदेशक सायमन फ्लेक्सनर, नोबेल पुरस्कारप्राप्त जॉर्ज व्हिप्ले आणि पेथॉन राउस अशांची गणना आहे.
एका ३८ वर्षाच्या व्यक्तीचे शव-विच्छेदन करत असतांना त्यांना त्या रोग्याच्या रक्त वाहिन्यात वायूचे बुडबुडे आढळले. हा जिवाणू दंड गोलाकार, ग्राम +ve, अवायूजीवी असून उच्च आणि थंड तापमानास विरोध करणारा होता. त्याला बॅसिलस ॲरोजीनोसा कॅप्शुलॅटस असे नाव देण्यात आले. पुढे विल्यम हेन्री वेल्च यांच्या नावे या जिवाणूला क्लोस्ट्रीडीयम वेल्चाय असे संबोधले जाऊ लागले. सध्या त्या जीवाणूंना क्लोस्ट्रीडीयम परफ्रीनजेन (clostridium perfringens) असे संबोधले जाते. त्यांनी गॅस गॅंग्रेन (Gas gangrene) या रोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावला.
ते मेडिकल रिसर्च रॉकफेलर इन्स्टिट्यूटचे ३२ वर्षे अध्यक्ष होते. अमेरिकन मेडिकल असोसिएशन आणि अमेरिकन फिजिशीयन असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष होते.
वेस्लने पहिल्या महायुद्धामध्ये यू. एस. आर्मी वैद्यकीय कॉर्पची मदत केली. त्यांना ब्रिगेडियर जनरलचा हुद्दा प्राप्त झाला होता. त्यासाठी त्यांना प्रतिष्ठित सेवापदक प्राप्त झाले. १९१८ सालच्या इन्फ्लुएंझा पॅंडेमिक मध्ये सुद्धा त्यांनी आपली सेवा दिली होती.
वेल्स यांचा मृत्यू जॉन्स हॉपकिन्स रुग्णालयात कर्करोगामुळे झाला.
संदर्भ :
- https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/15387691/#:~:text=Abstract,new%20bacterium%2C%20Bacillus%20aerogenes%20capsulatus
- https://www.researchgate.net/publication/8326757_William_H_Welch_MD_and_the_discovery_of_Bacillus_welchii
- Johns Hopkins Medicine : The Four Founding Professors. Hopkinsmedicine.org.Retrieved on 2012-03-12.
- “Dr. William H. Welch” New York Times. May 2, 1934. Retrieved 20yti07.
समीक्षक : गजानन माळी