संगणकीय उपकरण. मॉडेम हे संगणकाला, राउटर किंवा स्विच सारख्या दुसर्या एखाद्या उपकरणाला आंतरजालाशी जोडण्यास मदत करते. मॉडेम या शब्दाची व्युत्पत्ती Modular आणि Demolulator या शब्दांच्या आद्य अक्षरांपासून झालेली आहे. संगणकाला माहिती अंकीय स्वरूपात (0 अथवा 1) समजू शकते, परंतु प्रदत्त माहिती ही सदृश्य अर्थात ॲनालॉग स्वरूपात असते. संगणकाद्वारे ओळखू शकणार्या व टेलिफोन किंवा केबल वायरींमधून अंकात्मक माहिती (1 आणि 0) वाहून नेणाऱ्या सदृश्य संकेतांना रूपांतरित करण्याकरिता, त्याचप्रमाणे ते संगणकाद्वारे किंवा अन्य उपकरणावरील अंकात्मक माहितीचे अनुरूप संकेतामध्ये रूपांतर करण्याचे काम या उपकरणाने होते.
सुरुवातीला मॉडेम हे “डायल-अप” होते, अर्थात आंतरजाल सेवा प्रदात्याशी जोडण्यासाठी त्यांना फोन नंबर डायल करावा लागत असे. डायल-अप मॉडेमला स्थानिक टेलिफोन लाइनचा पूर्ण वापर आवश्यक आहे, कारण व्हॉइस कॉल आंतरजाल जोडणीमध्ये व्यत्यय आणत असे. ऑप्टिकल फायबरच्या वापरामुळे ऑप्टिकल मॉडेमसची वाढ झाली आहे. याचा उपयोग आता ऑप्टिकल फाइबरच्या माध्यमाने माहिती प्रसारित करण्याच्या उद्देशाने केला जातो. याचा या मॉडेममध्ये प्रसारणचा (Transmission) दर सुमारे एक अब्ज बिट प्रती सेकंदापर्यंत पोहोचवू शकतो. जरी अलिकडच्या काळात मॉडेम आंतरजाल जोडणीची जागा ब्रॉडबँडने घेतली असली, तरी टेलिफोन संदेशवहनसारख्या आधुनिक जगाच्या इतर बाबींमध्ये मॉडेमची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
लॅनला आंतरजालाशी जोडणे, प्रदत्त आदान-प्रदानाचा वेग अधिक असणे, मर्यादित संगणक आंतरजालाशी जोडणे आणि माहितीचे संप्रेषण करणे इत्यादी मॉडेमचे महत्त्वाचे फायदे आहेत. लॅन आणि आंतरजाल यांच्यामधील जोडणी प्रमाणेच कार्य करणे आणि माहितीच्या रहदारीची देखभाल नसणे ही मॉडेम वापराची तोटे आहेत.
कळीचे शब्द : #मॉडेम #राउटर #इंटरनेट #डायल-अप #ब्रॉडबँड.
संदर्भ :
- https://techterms.com/definition/modem
- http://www.yourmaindomain.com/web-articles/What-is-Modem-and-its-benefits.asp
समीक्षक : रोहित गुप्ता