संदेशन प्रणाली (इन्स्टंट मॅसेजिंग सेवा). यामार्फत स्मार्टफोनद्वारे आपण इंटरनेट वापरून इतर व्हॉट्सऍप वापरकर्त्याला त्वरित संदेश पाठवता व वाचता येतो. संदेशासोबतच चित्रे, गाणी, व्हिडियो व इतर प्रकारच्या फाईल्स देखील एकमेकांना पाठविता येतात. व्हॉट्सऍप प्रणाली आयफोन (iPhone), अँड्रॉइड (Android), विंडोज (Windows) फोन इ. सर्व आघाडीच्या स्मार्टफोनवर (Smartphone) उपलब्ध असून सप्टेंबर २०१५ मध्ये जगभर व्हॉट्सऍपचे ९० कोटी वापरकर्ते हाेते.
व्हॉट्सऍपची निर्मिती २००९ साली ब्रायन ऍक्टन (Brian Acton) व जॅन कोम (Jan Koum) या दोन अमेरिकन व्यक्तींनी केली. कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू ह्या शहरामध्ये मुख्यालय असलेल्या व्हॉट्सऍपला २०१४ साली फेसबुक कंपनीने विकत घेतले. व्हॉट्सऍप मध्ये आज नवनवीन बदल घडून येत आहे.
व्हॉट्सऍप ही संदेशन प्रणाली युवावर्गात फारच लोकप्रिय आहे. फेसबुकवर चॅटिंग साठी स्वतंत्र ऍप आहे, त्यास मॅसेजर (Messenger) म्हणून ओळखले जाते.
वैशिष्ट्ये : १. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना संदेश पाठवाता येतात.
२. संपर्कात राहण्यासाठी गट बनवू शकता. गटगप्पांच्या साहाय्याने तुम्ही एकाच वेळी लोकांना संदेश, फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. तुम्ही तुमच्या गटाला नाव देऊ शकता, नोटिफिकेशन्स म्यूट किंवा नियंत्रित करू शकता, तसेच इतरही अनेक गोष्टी करू शकता.
३. व्हॉइस कॉल्स द्वारे तुम्ही मित्रमैत्रिणी व कुटुंबियांशी बोलू शकता, ते परदेशी असले तरीही आणि जेव्हा तुमचा आवाज आणि मजकूर पुरेसा नसतो तेव्हा मोफत व्हिडिओ कॉल्सद्वारे तुम्ही समोरासमोर संभाषण देखील साधू शकता. व्हॉट्सऍपचे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स हे तुमच्या सेल्युलर प्लॅनचे व्हॉइस मिनिट्स न वापरता फोनचे इंटरनेट कनेक्शन वापरते, त्यामुळे तुम्हाला महागड्या कॉलिंग चार्जेसची चिंता करण्याची गरज नाही.
४. व्हॉट्सऍपवर आता तुम्ही तात्काळ फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता. बिल्ट-इन कॅमेरा वापरून तुम्हाला जे क्षण मोलाचे वाटतात ते सुद्धा तुम्ही टिपू शकता. तुम्ही जरी मंद गती इंटरनेट कनेक्शन वापरत असाल तरी व्हॉट्सऍपच्या साहाय्याने तुम्ही अतिशय तत्परतेने फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकता.
५. ई-मेल किंवा फाईल शेअरिंग ऍपची उस्तवार न करता आता तुम्ही पीडीएफ (PDFs), डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स, स्लाईडशोज आणि इतर पाठवू शकता. तुम्ही कमाल १०० MB इतक्या क्षमतेचे डॉक्युमेंट्स पाठवू शकता त्यामुळे कोणापर्यंतही तुम्हाला जे हवे आहे ते पोहोचवणे अगदी सोपे होते.
६. फक्त एका टॅप ने तुम्ही ध्वनी संदेश रेकॉर्ड करू शकता, चटकन प्रतिसाद देण्याकरिता किंवा एखाद्या छोट्याशा कहाणीसाठी अगदी उत्कृष्ट.
७. व्हॉट्सऍप 53 भाषांमध्ये वापरले जाते. संदेश पाठवण्यासाठी व्हॉट्सऍप इंटरनेटचा वापर करते, ज्यामुळे तुम्ही इतर शुल्क टाळू शकता.
कळीचे शब्द : संदेशन प्रणाली, ऍप,
संदर्भ :
- https://www.whatsapp.com/about
- https://www.quora.com/topic/WhatsApp-product
- https://www.imore.com/whatsapp
समीक्षक : विजयकुमार नायक