भौगोलिक नकाशा पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या जवळ असणाऱ्या सामग्रीचे वितरण दर्शवितो. खडक प्रकार किंवा असंघटित साहित्य सामान्यतः नकाशामध्ये गटबद्ध केले जातात आणि विविध रंगांचा वापर करून चित्रित केले जातात. भौगोलिक नकाशाचा एक प्रकार म्हणजे भूशास्त्रीय नकाशा. यालाच भूवैज्ञानिक नकाशा असे सुद्धा म्हणता.
भूशास्त्रीय नकाशा म्हणजे स्थलीय क्षेत्रामध्ये बाहेर पडणाऱ्या विविध प्रकारच्या खडकांचे आणि त्यांच्यातील विविधतेचे प्रकार यांचे प्रतिनिधित्व करणारा स्थलाकृतिक नकाशा. या नकाशात खडकांना वेगळे दर्शविण्यासाठी वेगवेगळे रंग वापरले जातात. तसेच नकाशामध्ये विकृती संरचना पद्धतीचा (टेक्टोनिक स्ट्रक्चर; ज्यामुळे पृथ्वीवरील खंडांचे, महासागराचे खोरे, पर्वत यांमध्ये पट (folds) आणि दोष (faults) दोष निर्माण करून] देखील वापर करण्यात येतो. भूशास्त्रीय नकाशे तयार करण्यासाठी कार्यक्षेत्रात स्वहस्ते माहिती गोळा केली जाते. त्यामुळे ही श्रम केंद्रित असून कार्यक्षेत्रावर प्रत्यक्ष जावून काम करावे लागते.
भूशास्त्रीय नकाशे जमिनीच्या वापराच्या नियोजनाच्या विविध पैलूंसाठी माहितीचे प्राथमिक स्त्रोत आहेत. इमारतींसाठी जागा निवडणे आणि वाहतूक व्यवस्था करणे यांसारख्या माहितीचा समावेश असतो. हे नकाशे पाणीपुरवठा विहिरी शोधण्यात मदत करतात आणि जलवाहकांपासून सुरक्षितपणे दूर असलेल्या जमिनीत भराव टाकण्यासाठी वापरलेले टाकाऊ पदार्थांसारख्या संभाव्य प्रदूषण कार्यांना शोधण्यात मदत करतात. अशी नकाशे प्रत्यक्षात चार-आयामी माहिती प्रणाली स्रोत आहेत. नैसर्गिक धोक्यांचे आणि पर्यावरणीय किंवा सामाजिक-आर्थिक जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी हे काळाचे चौथे परिमाण (Dimension) आहे. भूशास्त्रीय नकाशा वाचणे म्हणजे केवळ साहित्य आणि संरचना कोठे आहेत हे समजून घेणे नव्हे तर ही वैशिष्ट्ये कशी आणि केव्हा तयार झाली हे देखील समजून घेणे. अंकीय भूशास्त्रीय नकाशे परस्परसंवादी इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आहेत, जे भूवैज्ञानिक समस्या भूस्थानिक चौकटीत ठेवतात. ते पृथ्वीच्या साहित्याचा आकार, खोली तसेच भौतिक आणि रासायनिक संदर्भाची नोंदणी करतात आणि ते व्याख्यात्मक संशोधनाच्या परिणामांसह माहितीची मांडणी एकत्र करतात.
भूशास्त्रीय नकाशाचे प्रकार : पृष्ठभाग भूशास्त्रीय नकाशा – पृष्ठभागाच्या खाली भूशास्त्रीय माहिती असते. १:५०००० किंवा अधिक प्रमाण वापरले जाते. पृष्ठभागावरील दृश्यमान होणाच्या वस्तूंचा नकाशा : खडकाच्या स्थानाच्या शोधाबद्दल महत्त्वाचा आहे. हे नकाशे खडकाचे गुणधर्म आणि त्याच्या संरचनेच्या स्थितीबद्दल माहिती देतात. या प्रकारचे नकाशा सामान्यतः मोठ्या प्रमाणावर असतात. भूशास्त्रीय नकाशाचे विहंगावलोकन : उघड झालेल्या एखाद्या निर्मितीबद्दल माहिती देते. तसेच निर्मितीचे विकसित स्थान अजूनही होलोसीनच्या थराने झाकलेले असते. या नकाशांमध्ये सहसा 1: 100,000 किंवा त्यापेक्षा लहान प्रमाण असतात. संरचनेचा नकाशा : पृष्ठभागाखालील खोलीच्या रेषांचा देखावा स्पष्ट करतो. मध्यम ते मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. योजनाबद्ध भूशास्त्रीय नकाशा : स्थलाकृतीवर आधारित भूशास्त्रीय माहिती असते. जलभूशास्त्रीय नकाशा : विशिष्ट ठिकाणी भूजलाची स्थिती आणि निर्मिती पारगम्य आहे की अभेद्य आहे हे दर्शविते.
भूशास्त्रीय निर्देशन (Geological Mapping) : भूशास्त्रीय निर्देशन ही भूगर्भशास्त्रज्ञाची शारीरिकदृष्ट्या क्षेत्रीय कार्यपद्धती आहे. खडकांच्या पृष्ठभागावरची भूशास्त्रीय माहितीची नोंदणी करण्याची ही एक प्रक्रिया आहे. या माहितीमध्ये विविध खडकांचे प्रकार आणि संरचनांमधील सीमा या गोष्टींचा समावेश असतो. निर्देशन हे खनिज अन्वेषणासाठी विशेष नाही आणि अनेक तपासण्यांमध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे कारण एखाद्या क्षेत्रातील अंतर्निहित खडकांचे स्वरूप समजून घेणे हा सर्व भौगोलिकदृष्ट्या संबंधित अभ्यासाचा पाया आहे. खनिज उत्खननाचा प्रारंभिक टप्पा म्हणून निर्देशन आयोजित करताना, भूगर्भशास्त्रज्ञ खनिजांवर लक्ष ठेवून असतात.
कळीचे शब्द : #वितरण #पट #दोष #खनिज #संसाधने # विहंगावलोकन
संदर्भ :
- https://www.usgs.gov/products/maps/geologic-maps
- https://geoinfo.nmt.edu/publications/maps/geologic/whatis.html
- https://dec.vermont.gov/geological-survey/maps-uses
समीक्षक : अक्षय क्षीरसागर