आंतरावरील (गॅप) वित्त पुरवठा करणारी एक व्यवस्था. ज्यामध्ये कर्जदारास अल्पमुदतीच्या तरलतेची गरज पूर्ण करण्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज मिळू शकते. इंग्लडमध्ये १९६० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आधुनिक अंतरिम कर्जासारखा अल्पकालीन वित्त पुरवठा होत होता; परंतु समान्यतः केवळ उच्च स्ट्रिट बँका आणि ज्ञात ग्राहकांच्या सोसायटीद्वारेच मर्यादित सावकारासह अंतरिम कर्जबाजार अनेक वर्षे अल्प राहिला. २००८-०९ च्या जागतिक महामंदीनंतर अंतरिम कर्जे ब्रिटनमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय झाली. अंतरिम कर्जाची जसजशी लोकप्रियता वाढत गेली, तसतसे त्यांच्याभोवती असलेले विवादसुद्धा वाढत गेले. वित्तीय सेवा प्राधिकारणाने (एफ. एस. ए.) २०११ मध्ये गृहकर्जांना सामान्य तारणांचा पर्याय म्हणून अंतरिम कर्जाचा स्वीकार केला.
अल्पकालीन रोख गरज आणि दीर्घकालीन कर्ज यांदरम्यान ही दरी भरून काढण्यात अंतरिम कर्ज मदत करते. ही कर्जे साधारणपणे १२ महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविली जातात. ही कर्जे आत्याधिक व्याजदराने प्रदान केली जातात आणि सामान्यतः समभाग (इक्विटी), ऋणपत्र किंवा कर्ज रोखे (डिबेंचर) इत्यादी मालमत्तांना अप्रत्यक्ष पाठींबा दर्शवितात. एका कर्जासाठी वापरलेली अप्रत्यक्ष मालमत्ता वेगवेगळ्या कर्जासाठी ती अप्रत्यक्षपणे वापरली जाऊ शकते. येथे कर्ज हे मालमत्ता मूल्याचे प्रमाण कमी असू शकते. जोपर्यंत एखादी व्यक्ती अथवा कंपनी कायम वित्त पुरवठा काढून घेत नाही, तोपर्यंत अंतरिम कर्ज या अल्पमुदतीच्या वित्तपुरवठ्याचा वापर केला जातो. या प्रकारच्या कर्जाचा वापर साधारपणे रिअल इस्टेटमध्ये केला जातो.
एखादी व्यक्ती अथवा कंपनी कायम वित्त पुरवठा करत नाही किंवा अस्तित्वात असलेली जबाबदारी काढून घेत नाही, तोपर्यंत अंतरिम कर्ज हे एक अल्पकालीन कर्ज असते. हे त्वरीत रोखप्रवाह प्रदान करून वापरकर्त्यास सद्य जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास अनुमती देते.
अतिरिक्त जोखमीची भरपाई करण्यासाठी अंतरिम कर्ज पारंपरिक वित्तपुरवठ्यापेक्षा अधिक महाग असतात. ते सहसा तुलनेने कमी कागदपत्रांसह उपलब्ध केले जाते. अंतरिम कर्ज अनेकदा मालमत्ता ताबडतोब घेण्यासाठी, स्थावर मालमत्ता परत मिळविण्यासाठी अथवा दीर्घ मुदतीच्या वित्त पुरवठ्यासाठी, अल्प मुदतीसंधीचा फायदा घेण्यासाठी, व्यवसायिक स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले जाते.
अंतरिम कर्ज आणि हार्ड मनी कर्ज हे दोन्ही समान आहेत. दोन्ही अल्पमुदतीच्या अथवा असामान्य परिस्थितीमुळे प्राप्त झालेले प्रमाणित कर्ज आहेत. मात्र, हार्ड मनी कर्ज देण्याचे स्रोत सामान्यतः एक वैयक्तिक, गुंतवणूक उच्च जोखीम, जास्त व्याज कर्ज मिळविण्यासाठी व्यवसायात बँक नसलेली खाजगी कंपनी असते; तर अंतरिम कर्ज ही अल्प मुदतीची असते. ही कंपनी दीर्घ मुदतीच्या कर्जात अंतर कमी करणारे कर्ज देते. अंतरिम कर्जाचे उदाहरण म्हणजे, स्वत:च्या घराच्या विक्रितून मिळालेल्या रकमेची थकबाकी देण्याची योजना आखली जात असताना नवीन घर घेतल्याशिवाय सध्याच्या मालकीचे घर बंद करता येत नाही. अंतरिम कर्ज खरेदीदारास सध्याच्या घरातून व समभाग घेण्यास आणि नवीन घरावर डाऊन पेमेंट म्हणून वापरण्याची परवानगी देते. ज्याच्या अपेक्षेने चालू घर थोड्या कालावधीत बंद होईल आणि पूर्वीचे कर्ज परतफेड होईल. थोडक्यात, घरमालक त्यांचे नवीन घर खरेदी करण्याच्या दिशेने अंतरिम कर्जाचा वापर करू शकतात. तसेच त्यांच्या सध्याच्या घराच्या विक्रीसाठी प्रतिक्षा करतात.
इंग्लडमध्ये अंतरिम कर्ज हे व्यवसाय आणि स्थावर मालमत्ता या दोन्हींसाठी वापरले जातात. पूर्वी रोखप्रवाह वाढविण्यासाठी सामान्यतः मुक्त समबागसारखा वापर जमीनदार करीत असे. नंतरच्या काळात ते विक्री पूर्ण होण्याच्या तारखांमध्ये विलंब झाल्यास लिलावामध्ये मालमत्तेवर बोली लावण्याऱ्या खरेदीदारांकडून आणि जमिनदार व मालमत्ता यांच्याद्वारे अल्पकालीन अर्थव्यवहार किंवा अर्थसंकल्प प्रदान करून मालमत्ता साखळी तोडण्यासाठी होम मूवर्स म्हणून वापरले जाते.
वैशिष्ट्ये :
- व्यावसायिक स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार किंवा मालमत्ता, मोडकळीस असलेली मालमत्ता आणि जमीन-इमारत-भूखंड यांसह स्थावर मालमत्तेवर अंतरिम कर्ज प्रथम अथवा द्वितीय शुल्क म्हणून सुरक्षित केले जाऊ शकते.
- कर्जाच्या अटी सहसा १८ महिन्यांपर्यंत चालतात, ज्यात चक्रवाढ व्याज दरमहा आकारले जाते. अशा प्रकारच्या सुरक्षित गृह कर्जाच्या इतर प्रकारच्या तुलनेत ते बऱ्याचदा महाग असतात.
अंतरिम कर्ज ही एकतर उघडलेली अथवा बंद म्हणून परिभाषित केली जातात. कर्ज घेण्याऱ्यांकडे स्पष्ट आणि विश्वासार्ह परतफेड योजना असेल अथवा त्या जागेवरून बाहेर पडण्याची रणनीती असेल. उदा., कर्जाची सुरक्षा अथवा दीर्घ मुदतीची वित्तविक्री नियमन. ज्या मालमत्तेमध्ये कर्जदार अथवा जवळचा एखादा सदस्य राहणार असेल, त्या मालमत्तेवर प्रथम शुल्क आकारून सुरक्षित अंतरिम कर्ज नियमित नियमांचे तारण करार मानले जातात. म्हणूनच वित्तीय नियम प्राधिकरण (एफ. एम. ए.) द्वारे नियमन केले जाते. जमीनदार आणि मालमत्ता विकासकांना विकल्या गेलेल्या अंतरिम कर्जाचे समान्यतः नियमन केले जात नाही; परंतु भाड्याने घेतलेल्या मालमत्तेचा ताबा घेतल्यास त्याच्यावर कर्ज दिले गेले असेल अथवा ते कर्जदाराचे जवळचे कुटुंब सदस्य असतील, तर त्यावर वित्तीय नियम प्राधिकरणाचे नियमन असेल.
फायदे :
- अंतरिम कर्जामध्ये कर्जदारास कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्यवसाय करण्यासाठी अल्पकालीन भांडवल प्राप्त होते.
- मोठ्या प्रमाणात निधी तयार होण्याच्या प्रतिक्षेत असताना अंतरिम कर्ज दररोजचे व्यवसायक्रिया करण्यास सक्षम असतात.
- स्थावर मालमत्ता व्यवहार करणाऱ्या व्यक्तीसाठी ते नवीन मालमत्ता ताबडतोब संपत्ती अथवा नुतनीकरणास द्रुतपणे बंद करण्यास परवानगी देते.
तोटे :
- कर्जाचे अल्पमुदत आणि अपेक्षित निधीच्या अनिश्चिततेमुळे जास्त व्याजदर आकारला जातो.
- कायमस्वरूपी निधी मिळविण्यात अयशस्वी झाल्यास ही कर्जे बंदीस्त (बॅन) कर्जात बदलू शकतात आणि त्याचा परिणाम डिफॉल्ट होऊ शकतो.
दोष : अंतरिम कर्ज ही द्रुत तरलतेसाठी त्वरित उपाय असले, तरी त्यांच्यातही कमतरता आहेत.
- अंतरिम कर्ज या अल्पमुदतीच्या कर्जासाठी व्याजदर खूपच कठोर आहेत.
- ही कर्जे भविष्यातील प्राप्य (रिसिव्हेबल) वस्तूंवर आधारित आहेत. जर ते अयशस्वी झाले, तर आपल्यावर खूप मोठे कर्ज होईल.
- वैयक्तिक कर्जाची निवड करणे सुज्ञपणाचे असेल, जो उच्च जोखमीचा घटक टाळण्यासाठी अंतरिम कर्जापेक्षा अधिक लवचिक असते.
संदर्भ :
- गोविलकर, विनायक, अर्थजिज्ञासा, पुणे, २०१९.
- Financial Times, 25 November 2011.
- Mortgage Finance Gazette, 27 November 2018.
समीक्षक : आशुतोष रारावीकर