माथुर, डॉ. अरविंद : (२५ स्पटेंबर १९५३). भारतीय वैद्यकशास्त्राचे कुशल शल्यचिकित्सक. ते वैद्यकीय संशोधनाचे अतिशय उत्कट समर्थक आहेत. वृद्धांच्या आरोग्यसेवेसाठी डॉक्टर आणि परिचारिकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार) साठी प्रमुख अन्वेषक म्हणून काम केले आहे.

डॉ. माथुर यांचा जन्म जोधपूर (अंदाजित) येथे झाला. त्यांनी डॉ. एस. एन. मेडिकल कॉलेज, जोधपूर येथून पदवी आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली (IIM)एम.डी. (औषध आणि उपचार) एम.डी पदवी संपादन केली. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंदीगड येथून किरणोत्सर्गी समस्थानिक वापरण्याचे आणि बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून रेणवीय वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण घेतले. एस. एन. मेडिकल कॉलेज, जोधपूरचे ते प्राचार्य आणि नियंत्रक होते. ते वैद्यकीय क्षेत्रात अध्यापन, नैदानिक कार्य आणि आरोग्य संशोधनात सक्रियपणे व्यस्त आहेत.

माथुर यांनी भारतात जराशास्त्राच्या विकासासाठी सक्रियपणे काम केले. ते भारतातील वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या विकासासाठी राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांच्या संस्थेतील प्रादेशिक वृद्धाचिकित्सा केंद्राच्या विकासासाठी ते प्रमुख व्यक्ती असल्याने, त्यांनी त्यांच्या राज्यात वृद्धापकाळाच्या शिक्षणाच्या सुविधांचा विस्तार करण्याची संधी मिळाली. त्यांनी डॉक्टर, परिचारिका आणि काळजी घेणाऱ्यांसाठी वृद्ध काळजीचे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. ते मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या जेरियाट्रिक्सच्या विशेष मंडळावर होते. तसेच ते इंडियन अॅकॅडमी ऑफ जेरियाट्रिक्सचे संस्थापक सदस्य आहेत आणि त्याचे भूतपूर्व अध्यक्ष देखील होते. डॉ. माथुर इंडियन अकादमी ऑफ जेरियाट्रिक्सचे अधिकृत प्रकाशन जर्नल ऑफ द इंडियन अकॅडमी ऑफ जेरियाट्रिक्सचे संपादक देखील आहेत.

डॉ. माथुर यांनी सार्वजनिक आरोग्य विद्यालयाची स्थापना करून सार्वजनिक आरोग्य शिक्षण विकसित केले. त्यांनी एचआयव्ही/एड्ससाठी काळजी आणि साहाय्य सेवा देखील स्थापन केली. डॉ माथुर हे केअर गिव्हर्स आशा सोसायटीचे संस्थापक आहेत, जी अनौपचारिक काळजी घेणाऱ्यांना मदत करते. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्दमुळे त्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) टॅलेंट सर्च स्कीम सीनियर रिसर्च फेलोशिप प्रदान केली. वृद्धांसाठी काळजी घेण्यावरील त्यांचे पुस्तक इंग्रजी, तमिळ आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये प्रकाशित आहे.

डॉ. माथुर यांना त्यांच्या कार्यासाठी जिल्हा प्रशासन, राजस्थान सरकार आणि विविध सामाजिक संस्थांकडून वैद्यकीय सामाजिक कार्यासाठी प्रशंसा पुरस्कार मिळाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे प्रतिभा शोध योजना वरिष्ठ संशोधन फेलोशिपही त्यांना देण्यात आली.

डॉ. माथुर सध्या एशियन सेंटर फॉर मेडिकल एज्युकेशन, रिसर्च अँड इनोव्हेशन (ACMERI) चे संचालक आहेत. ही संस्था वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य समस्यांवर संशोधन करून वृद्धांसाठी आरोग्य सेवा सुधारण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग विकसित करते.

कळीचे शब्द : #वृद्धसेवा

संदर्भ :

समीक्षक : अ. पां. देशपांडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply