डेटा इनक्रिप्शनद्वारे (Data encryption) तयार करण्यात आलेल्या माहितीला मूळ स्वरूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया. डिक्रिप्शनमध्ये अवाचनीय किंवा गैरसमजुतीकरिता तयार करण्यात आलेल्या माहितीचे रूपांतरण करण्यात येते आणि मूळ मजकूरात व चित्रात रूपांतरित करते. रूपांतरित माहिती प्रेषकाला तसेच संगणकाला सुद्धा समजण्यास सोपी होते. डिक्रिप्शन ही प्रक्रिया स्वहस्तलिखित अथवा स्वयंचलितरित्या पूर्ण केली जाऊ शकते. तसेच ती कळींच्या संचाद्वारे (encryption key) किंवा संकेतशब्दाद्वारे (password) देखील केली जाऊ शकते.
संगणकीय प्रणालीमध्ये एनक्रिप्शन-डिक्रिप्शन या प्रक्रिया गोपनीयतेच्या कारणासाठी वापरण्यात येते. महाजालकावर माहिती संचरित होत असल्यामुळे ती माहिती हस्तगत करणे आणि अनधिकृत व्यक्ती किंवा संस्था प्रवेश करणे या गोष्टी सहज होऊ शकतात. त्यामुळे ती माहिती गमावू नये किंवा चोरी केली जाऊ नये याकरिता तीला एनक्रिप्ट करण्यात येते. ई-मेल मजकूर, टेक्सट फाइल, चित्रे, वापरकर्त्याची माहिती आणि निर्देशिका इत्यादींचा इनक्रिप्शन करण्याकरिता वापर करण्यात येतो. त्या व्यक्तीस डिक्रिप्शन करावयाचे आहे, त्यास एक संकेतशब्द दर्शविणारी खिडकी प्रदर्शित होते, योग्य संकेतशब्द प्रविष्ट करून एनक्रिप्शन केलेली माहिती डिक्रिप्ट केली जाते. [एनक्रिप्शन].
थोडक्यात, डिक्रिप्शन ही संदेश परत तिच्या वास्तविक स्वरुपामध्ये रूपांतरित करण्यासाठी एन्क्रिप्शनची उलट प्रक्रिया केली जाते यास डीक्रिप्शन असे म्हणतात. प्राप्तकर्ता डिक्रिप्शन अल्गोरिथम आणि कळीचा वापर करून सिफरटेक्स्ट (Ciphertext) परत मूळ संदेशात (प्लेनटेक्स्ट / ओरिजनल टेक्स्ट; Plane text/Original text) रूपांतरित करण्यासाठी वापरतो, याला डिसिफरिंग (Deciphering) देखील म्हणटले जाते.
एनक्रिप्शन आणि डिक्रिप्शनसाठी वापरलेली कळी समान किंवा भिन्न असू शकतात. (उदा. सममितीय एनक्रिप्शन आणि असममितीय एनक्रिप्शन). एखाद्याला माहिती चोरण्यापासुन रोखण्याकरिता माहिती एनक्रिप्ट केली जाते. काही कंपन्या आपला डेटा आणि व्यापार गोपनीयतेच्या सामान्य संरक्षणासाठी डेटा एनक्रिप्ट करतात. जर हा डेटा पाहायचा असेल तर त्याला डिक्रिप्शनची आवश्यकता भासू शकते. डिक्रिप्शन कळीचा उपयोग करुन आपल्याला तो डेटा मिळवता येतो.
एनक्रिप्शन आणि डिक्रिप्शन फरक : एनक्रिप्शन प्रक्रियेच्या वेळी एनक्रिप्शन अल्गोरिथम (Encryption algorithm) मूळ संदेश (प्लेन टेक्स्ट/ओरिजनल टेक्स्ट) आणि कळी वापरून त्याचे रूपांतर सिफरटेक्स्ट (Ciphertext; गुप्तसंदेशात) मधे करतो. दुसरीकडे डिक्रिप्शन प्रक्रियेत डिक्रिप्शन अल्गोरिथम सिफरटेक्स्ट आणि कळी वापरून मूळ संदेश मिळवण्यासाठी करतो. प्रेषकाच्या बाजुला एनक्रिप्शन होते तर प्राप्तकर्त्याच्या बाजुला डिक्रिप्शन ही प्रक्रिया होते.
कळीचे शब्द :#कोडिंग #डिकोडिंग #एनक्रिप्शनकळी #CODE #Encryption #Decryption #Ciphertext
संदर्भ :
- https://techdifferences.com/difference-between-encryption-and-decryption.html
- https://medium.com/@daser/a-lazy-mans-introduction-to-multi-party-encryption-and-decryption-59f62b8616d8
- https://techdifferences.com/difference-between-symmetric-and-asymmetric-encryption.html
समीक्षक : रत्नदीप देशमुख