ऑनलाइन टेलिफोनीला इंटरनेट टेलिफोनी सुद्धा म्हणतात. इंटरनेट टेलिफोनी हे एक प्रकारचे संप्रेषण (communication) तंत्रज्ञान आहे जे इंटरनेटद्वारे व्हॉइस कॉल (Voice Call) आणि अन्य टेलिफोनी सेवा जसे फॅक्स (Fax), एसएमएस (SMS) आणि इतर व्हॉइस-मेसेजिंग करण्यास परवानगी देते. इंटरनेट टेलिफोनीला आयपी टेलीफोनी किंवा ब्रॉडबॅन्ड टेलिफोनी देखील म्हणतात. इंटरनेट टेलिफोनी वरून कॉल होत असताना व्हॉइस सिग्नल चे रूपांतर इंटरनेट प्रोटोकॉल मध्ये केले जाते व कॉल रिसिव्हर असलेल्या ठिकाणी इंटरनेट प्रोटोकॉल चे रूपांतर पुन्हा व्हॉइस सिग्नल मध्ये केले जाते. या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत असणारे सॉफ्टवेअर कमी खर्चिक आणि सोयिस्कर आहे. जोपर्यंत इंटरनेट कनेक्शन आहे तोपर्यंत वापरकर्त्याला फॅक्स, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्सद्वारे जगात कुठेही संवाद साधण्याची अनुमती मिळते. तथापि, या सेवाची गुणवत्ता पारंपारिक टेलिफोन सेवांकरिता वापरले जाणाऱ्या पारंपारिक सर्किट-स्विच केलेल्या नेटवर्क एव्हढी चांगली नाही कारण की इंटरनेट टेलिफोनी ही सेवा पूर्णपने इंटरनेटच्या गती वर अवलंबून असते. एनएफओएन क्लाऊड टेलीफोन सिस्टम (NFON Cloud Telephony System) आणि स्काईप फॉर बिझनेस (Skype for Business) ही ऑनलाईन टेलिफोनी ची उदाहरण आहेत.

संदर्भ :

समीक्षक – विजयकुमार नायक

प्रतिक्रिया व्यक्त करा