ॲपोलोनियस रोडियस : (जन्म.इ. स. पू. २९५). ग्रीक कवी आणि व्याकरणकर्ता आणि ग्रंथपाल. जन्म ग्रीसमधील शेड्स येथे. लायब्ररी ऑफ ॲलेक्झांड्रिया येथे त्याने संशोधक आणि ग्रंथपाल म्हणून काम केले.आर्गोनाउटिका या महाकाव्यलेखनासाठी तो प्रसिद्ध आहे. ईजिप्तच्या सांस्कृतिक जीवनाचे नाविण्यपूर्ण व परिणामकारक चित्रण या महाकाव्यात केले आहे. ॲलेक्झांड्रीयन कवी-ग्रंथपाल कॅलिमॅकसबरोबर ॲपोलोनियसचे साहित्यिक मतभेद होते. अशा प्रकारच्या चर्चा आधुनिक संशोधकांकडून पुढील काळात केल्या गेल्या. होमरचे अनुकरण करणारा कवी म्हणून त्याची गणना केली गेली.अलिकडच्या काळात केले गेलेल्या संशोधनातून त्याला पुन्हा साहित्य आणि तत्वज्ञानविषयक योगदानाविषयी प्रतिष्ठा प्राप्त झाली. या संशोधनानुसार असे सिद्ध करण्यात आले की, ॲपोलोनियस हा प्राचीन काळातील जुन्या साहित्यिक परंपरेतील हेलेनिस्टिक कवींच्या विशेष अभ्यासू परंपरेचा वारस होता.
ॲपोलिनियस हा कवी व संशोधक असलेल्या कॅलिमॅकसचा विद्यार्थी होता. इ. स. पू. २४७-२४६ या वर्षी त्याने हेड ऑफ द लायब्ररी ऑफ ॲलेक्झांड्रिया हे पद भुषविले. त्याच्या पुढील आयुष्याबद्दल अनेक मतभेद आहेत. एका मतानुसार तो रोड्स येथे मरण पावला. तर दुसऱ्या मतानुसार तो अलेक्झंड्रिया येथे परतला व लायब्ररी प्रमुख (ग्रंथपाल) म्हणून पुन्हा कार्यरत झाला. तेथेच मरण पावला. काहींच्या मते कॅलिमॅकससोबत त्याला दफन केले गेले.ॲपोलिनियसच्या काव्यशैली व तंत्राचा पुरस्कार केला गेला.
संदर्भ : https://www.britannica.com/biography/Apollonius-of-Rhodes