बार्नेट लेस्ली : ( १२ ऑक्टोबर १९२० – १० फेब्रुवारी २००२ )
मार्गारेट लेस्ली कॉलर्ड यांचा जन्म लंडन येथे झाला. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस त्यांनी एसेक्समध्ये कृषी संस्थेत शिकण्यास सुरुवात केली. १९३९ साली फेलिक्स स्टोवे यांना एका दुग्धशाळेत मदतनीस म्हणून काम केले. पुढे त्यांची लंडन डेअरीत त्यांची दूध तपासणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेथे जेम्स बार्नेट यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
मेडिकल रिसर्च कौन्सिलमध्ये त्यांनी तंत्रज्ञ म्हणून सुरुवात केली. द हट या केंब्रिज प्रयोगशाळेत काम आणि तेथे येणाऱ्या संशोधकांना मदत असे कामाचे स्वरूप होते. सिडनी ब्रेनेर यांच्या आगमनानंतर फाज (phage) प्रयोगशाळेत काम कार्याची संधी त्यांना मिळाली. तेथे त्यांनी फ्रान्सिस कर्क व्हर्नोन इंग्राम यांच्यासाठी काम केले. त्या १९८५ साली निवृत्त झाल्या. व्हर्नोन बरोबर सिकल सेल ॲनिमियामधील हिमोग्लोबिनच्या अमिनो ॲसिड रचनेतील फरक शोधणे, तर फ्रान्सिस आणि ब्रेनर यांच्याश सूक्ष्मजीवाणूच्या प्रगत संशोधन कार्याचा त्या हिस्सा होत्या. त्यांनी Frame shift Mutation या संशोधन कार्यात जनुकांमधील जोड्यांमध्ये उत्परिवर्तन झाल्याने त्यांची आनुवंशिक चौकट कशी बदलते याचा सिद्धांत मांडला आहे. एरिक मिलर यांचे मत आहे की जैविकशास्त्र जनुकांमधील शोधकार्य लेस्ली बर्नेट यांच्या कामाच्या पद्धतीने परिणामकारक झाले आहे. शिफ्ट म्यूटेशनमधील प्रयोगासाठी इतर वैज्ञानिकांनी लेस्ली यांची क्ष-किरण मोजमाप पद्धतीची मदत घेतली.
केंब्रिज येथील एका घराला लेस्ली बार्नेट हाऊस संबोधले जाते. त्यांनी ब्रेनर, क्रिक, बेन्झेर या वैज्ञानिकांबरोबर लेख प्रकाशित केले आहेत. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता, तसेच प्रशन सोडविण्याची तत्परता आणि हातोटी या गुणांमुळे त्या विद्यार्थ्यांत प्रिय होत्या.
संदर्भ :
- लेस्ली बार्नेट -आत्मवृत्त
- Brenner, Sydney; My Life in Science, Bio-Med Central 2001, 199pp ISBN 0-9540278-0-9
- Chadarevian, Soraya De; Designs For Life: Molecular Biology After World War II, CUP 2002, 444 pp; ISBN 0-521-57078-6
- Crick, Francis; What Mad Pursuit: A Personal View of Scientific Discovery (Basic Books reprint edition, 1990) ISBN 0-465-09138-5
- Ferry, Georgina; Max Perutz and the Secret of Life, (Chatto & Windus 2007) 352pp, ISBN 978-0-7011-7695-2.
- Finch, John; A Nobel Fellow On Every Floor, Medical Research Council 2008, 381 pp, ISBN 978-1-84046-940-0; this book is all about the MRC Laboratory of Molecular Biology, Cambridge.
समीक्षक : रंजन गर्गे