उलित्झेर, शिमोन : शिमोन उलित्झेर चेक्लाइट लिमिटेड या कंपनीत प्रमुख वैज्ञानिक म्हणून काम पहात. पूर्वी याच कंपनीत ते प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहत होते. १९८० आणि १९९० च्या मध्यात त्यांनी बायोलूम लिमिटेड आणि वायरोलूम लिमिटेड या जीवतंत्रज्ञानातील दोन कंपन्यांची स्थापना केली. २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्रकाशमान जिवाणूंवर संशोधन केले. जिवाणूंच्या प्रकाशनिर्मितीच्या मूळ आणि उपयोजित बाबींवर त्यांनी ७० हून अधिक शोधनिबंध सादर केले. अनेक जागतिक जीव तंत्रज्ञानातील कंपन्यांच्या सल्लागार समितीवर त्यांनी काम केले. मायक्रोबिक्स उर्फ अझ्युर एन्व्हायर्नमेंटलमध्ये काम करीत असताना त्यांनी दोन चाचण्या प्रस्थापित केल्या – म्युटोटोक्स आणि मायक्रोटोक्स क्रोनिक. या चाचण्यांद्वारे पाण्यातील विष, प्रकाशमान जीवाणूंच्या सहाय्याने शोधून काढता येते. १९८८ पासून त्यांच्या हाताखाली सात एम.एस्सी. आणि पीएच्.डी.च्या विद्यार्थांनी पदवी प्राप्त केली.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे