नाकपुड्यांच्या बाहेरील बाजुला असलेल्या सर्वांत कडेच्या बिंदुंना अथवा नाकपुड्यांवरील सर्वाधिक रुंद असलेल्या बिंदुंना अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू असे संबोधतात. नाकपुड्यांच्या दोन बिंदुंमधील येणारे अंतर हे नाकाची सर्वाधिक रुंदी म्हणून मानण्यात येते. अलारे किंवा नासिका रुंदी बिंदू हा बिंदू शरीरमितीसाठी (Somatometry) वापरण्यात येणाऱ्या बिंदुंपैकी एक आहे. नाकाची रुंदी व लांबी यांवरून नाकाचा निर्देशांक काढता येतो. या निर्देशांकावरून लांब, रुंद, मध्यम असे नाकाचे वर्गीकरण करता येते.
संदर्भ :
- जोशी, बी. आर.; कुलकणी, पी. के.; कुलकणी, शौनक, समाजशास्त्र, मानवशास्त्र : सामाजिकशास्त्र कोश, पुणे, २००८.
- Juvekar, Sanjay, Beginner’s Manual of Anthropometry, Pune, 2019.
समीक्षक : शौनक कुलकर्णी