(प्रस्तावना) | विद्याव्यासंगी : संतोष ग्या. गेडाम
मानवशास्त्र हे मानवप्राणी व त्याच्या कार्याचा सांगोपांग व सर्वांगीण अभ्यास करणारे शास्त्र आहे. तसेच ते मानवाच्या जीवनशैलीचा व त्याच्या भोवतीच्या पर्यावरणाचा यथायोग्य परामर्श घेते. अँथ्रोपॉलॉजी या इंग्रजी शब्दाचा मानवशास्त्र हा पर्यायी शब्द असून ‘अँथ्रोपॉस’ म्हणजे ‘मानव’ या ग्रीक शब्दापासून तो बनला आहे. अँथ्रोपॉलॉजीला सुरुवातीच्या काळात ‘मानववंशशास्त्र’ असे म्हटले जात; परंतु या विषयात फक्त मानवी वंशाचाच अभ्यास होत नसून मानवाच्या अस्तित्वापासून ते वर्तमानस्थितीतल्या मानवाचा वैकासिक आलेख उलगडून दाखविण्यापर्यंतचा अभ्यास केला जातो. शिवाय वंश कल्पनाही आता त्याज्य झाली असल्यामुळे ‘मानववंशशास्त्र’ या शब्दाऐवजी व्यापक अर्थाने ‘मानवशास्त्र’ हा शब्द सयुक्तिक व सर्वमान्य झाला आहे.
मानव हा एक प्राणी आहे. मानवप्राणी व प्राणिजगतातील इतर प्राण्यांत काय साम्य अथवा फरक आहेत? मानवप्राण्याचे वैशिष्ट्य काय? इत्यादींचे तुलनात्मक अध्ययन मानवशास्त्र करते. याशिवाय मुख्यत्वेकरून यात मानवाच्या शारीरिक व सांस्कृतिक विकासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रचंड विश्वात माणूस कोण आहे? पृथ्वीवर तो अचानकपणे अवतरला की, उत्क्रांतीच्या मालिकेतील तो अखेरचा टप्पा आहे? मानवप्राण्याचे मूळ उगमस्थान जर एकच आहे, तर मानवात इतकी विविधता का? संस्कृतीचे स्वरूप काय व ती कशी बदलते? संस्कृती व व्यक्तिमत्व यांचे परस्पर संबंध काय आहेत? इत्यादी प्रश्नांचा उहापोह मानवशास्त्र करते.
मानवशास्त्राचे भौतिक किंवा शारीरिक अथवा जीवशास्त्रीय मानवशास्त्र आणि सामाजिक-सांस्कृतिक मानवशास्त्र हे दोन मुख्य विभाग असून या दोहोंचे अनेक उपविभाग आहेत. शारीरिक आणि जीवशास्त्रीय मानवशास्त्र हे मानवाची उत्पत्ती, उत्क्रांती, विविधता, शारीरिक वाढ, अनुवंशिकता इत्यादी जीवशास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास करते. त्यांपैकी आदिमानवाच्या जैविक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करणारे पुरामानवशास्त्र होय. मानवाची संस्कृती, सांस्कृतिक उत्क्रांती, विविधता इत्यादींचा तौलनिक अभ्यास सामाजिक – सांस्कृतिक मानवशास्त्रात केला जातो. मानवप्राणी व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधातून जैवविज्ञान व सामाजिक विज्ञान यांच्यातील दुवा जुळवता येतो. मानवी संस्कृतीचा अविष्कार वेगवेगळ्या मानवसमूहांच्या वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळा पहावयास मिळतो. त्यामुळे प्रत्येक संस्कृती एकात्म, स्वतंत्र आणि परिपूर्ण असते. क्षेत्रीय अभ्यास पद्धतीमुळे मानवशास्त्रज्ञांस संस्कृतीच्या सर्व उपांगांचे ज्ञान मिळते.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहेच; परंतु त्याआधी तो एक सजीव घटक आहे. मानवी समाज हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रचनांच्या बदलांतून वर्षानुवर्षे पुढे जात आहे. मानवी संस्कृती स्थलागणिक, समाजानुरूप बदलत जाते. वेगवेगळ्या वातावरणाचा, पर्यावरणाचा, आहारविहाराचा मानवी शरीरावर, स्वरूपावर, मानवी संस्कृतीवर परिणाम होतो आणि त्यामुळेच शारीरिक विविधतेबरोबरच सांस्कृतिक विविधताही पाहावयास मिळते. मानवशास्त्र हे मानवाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी परिवर्तनाचे तसेच त्यांच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. त्यामुळेच मानवशास्त्र या विषयात मानवाच्या सर्वांगीण आणि सर्वव्यापक, तसेच प्राचीन मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतच्या सर्व मानवविषयक माहितीचे संकलन करून योग्य स्वरूपाची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे मराठी विश्वकोशाच्या ‘मानवशास्त्र ज्ञानमंडळा’चे उद्दिष्ट आहे.
अनंतकृष्ण अय्यर (Ananthakrishnan Iyer)

अनंतकृष्ण अय्यर

अय्यर, अनंतकृष्ण (Iyer, Ananthakrishnan) : (? १८६१ – २६ फेब्रुवारी १९३७). एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव लक्ष्मीनारायणपुरम कृष्ण अनंतकृष्ण अय्यर ...
अ‍नल जमात (Anal Tribe)

अ‍नल जमात

भारतातील मणिपूर राज्यातील एक जमात. मुख्यत: ती चंदेल, इंफाळ, कबावदरी व चुराचंदपूर या जिल्ह्यांत वास्तव्यास असून बांगलादेश व म्यानमार या ...
अर्नेस्ट आल्बर्ट हूटन (Earnest Albert Hooton)

अर्नेस्ट आल्बर्ट हूटन

हूटन, अर्नेस्ट आल्बर्ट (Hooton, Earnest Albert) : (२० नोव्हेंबर १८८७ – ३ मे १९५४). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील प्रसिद्ध शारीरिक मानवशास्त्रज्ञ. त्यांचा ...
अल्कॅप्टोन्युरिआ (Alkaptonuria)

अल्कॅप्टोन्युरिआ

एक आनुवंशिक दुर्मीळ आजार. कायिक अप्रभावी/अप्रकट (रिसेसिव्ह) जनुकांमुळे हा रोग संभवत असून त्याची जनुके मातापित्यांकडून संक्रमित झालेली असतात. ही एक ...
अल्तामिरा गुहा (Cave of Altamira)

अल्तामिरा गुहा

प्रागैतिहासिक मानवाने रेखाटलेल्या चित्रांकृतींसाठी प्रसिद्ध असलेली स्पेनमधील एक गुहास्थळ. ते उत्तर स्पेनमधील कँटेब्रीअन प्रदेशात सँटिलाना दे मार येथे आहे. ही ...
अ‍ॅलेस एफ. हर्डलिका (Ales F. Hrdlicka)

अ‍ॅलेस एफ. हर्डलिका

हर्डलिका, अ‍ॅलेस एफ. (Hrdlicka, Ales F.) :  (२९ मार्च १८६९ – ५ सप्टेंबर १९४३). प्रसिद्ध अमेरिकन शारीरिक मानवशास्त्रज्ञ. ‘निएंडरथल मानव’ ...
आईमोल जमात (Aimol Tribe)

आईमोल जमात

भारतातील एक अनुसूचित जमात. ती आसाम, मणिपूर या राज्यांत वास्तव्यास आहे. मणिपूर राज्याच्या चंडेल, चुराचंदनपूर आणि सेनापती या जिल्ह्यांमध्ये त्यांचे ...
आदी जमात (Adi Tribe)

आदी जमात

भारतातील एक आदिवासी जमात. ही जमात प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व व पश्चिम सियांग जिल्ह्यात वास्तव्यास आहे. आदी जमातीची लोकसंख्या २०११ ...
आंध जमात (Andh Tribe)

आंध जमात

महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. हिला अंध जमात असेही म्हटले जाते. या जमातीची वसती प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा या विभागांत आहे ...
इरावती दिनकर कर्वे (Iravati Dinkar Karve)

इरावती दिनकर कर्वे

कर्वे, इरावती दिनकर (Karve, Iravati Dinkar) : (१५ डिसेंबर १९०५ — ११ ऑगस्ट १९७०). प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा व लेखिका. त्यांचा जन्म ...
उपर्जित गुणवैशिष्ट्ये आणि आनुवंशिकता (Acquired Characteristics and Inheritance)

उपर्जित गुणवैशिष्ट्ये आणि आनुवंशिकता

एखाद्या सजीवामधील एखादा अवयव असंख्य वर्षांपूर्वी सक्रीय असून कालांतराने त्याचा वापर कमीकमी होऊन तो बंद झाल्याने सद्यस्थितीत तो अवयव शरीरामध्ये ...
कीर जमात (Keer/Kir Tribe)

कीर जमात

मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद, मुख्यत: भोपाळ, रायसेन आणि सिहोर या जिल्ह्यांत आढळणारी एक जमात. राजस्थान कीर जमातीची मुख्य भूमी आहे ...
कुलचिन्हवाद (Totemism)

कुलचिन्हवाद

आदिवासी जमातींमधील कुटुंब, घराणे, कुळ, वंश अथवा जमातींचे प्रतिकात्मक चिन्ह असलेला, त्यांच्या पूर्वजांची ओळख जपणारा किंवा त्यांच्या भूतकाळाशी नाळ जोडणारा ...
कुलीया जमात (Kulia Tribe)

कुलीया जमात

आंध्र प्रदेशातील एक आदिवासी जमात. या जमातीतील लोक मुख्यत: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या जिल्ह्यात विखुरलेले दिसतात. यांना मुलीआ किंवा मुलीया ...
केनिथ एड्रियन रेने केनेडी (Kenneth Adrian Raine Kennedy)

केनिथ एड्रियन रेने केनेडी

केनेडी, केनिथ एड्रियन रेने (Kennedy, Kenneth Adrian Raine) : (२६ जून १९३० – २३ एप्रिल २०१४). प्रसिद्ध अमेरिकन जैविक व न्यायवैद्यक ...
कोरकू जमात (Koraku Tribe)

कोरकू जमात

महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत आढळणारी मुंडा ऊर्फ कोलवंशी आदिवासी जमात. मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वतरांग हे या जमातीचे ...
खारिया जमात (Kharia Tribe)

खारिया जमात

मध्य भारतातील ओडिशा, झारखंड, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांत आढणारी एक आदिवासी जमात. छोटा नागपूर पठार, झारखंडचा पूर्व सिंघभूम, गुमला, ...
गुस्ताव हाइन्रीच राल्फ कोनिग्सवाल्ड वॉन (Gustav Heinrich Ralph Koenigswald Von)

गुस्ताव हाइन्रीच राल्फ कोनिग्सवाल्ड वॉन

वॉन, कोनिग्सवाल्ड गुस्ताव हाइनरीच राल्फ (Von Koenigswald  Gustav Heinrich Ralph) : (१३ नोव्हेंबर १९०२ ते १० जुलै १९८२). प्रसिद्ध जर्मन-डच ...
ग्रेट अंदमानी जमात (Great Andmani Tribe)

ग्रेट अंदमानी जमात

भारतातील अंदमान व निकोबार या बेटांवरील एक आदिवासी जमात. त्यांची गणना नेग्रिटो/आफ्रिकन या समुहात होत असुन ते या बेटावरील मूळ ...
चक्मा जमात (Chakma Tribe)

चक्मा जमात

भारतात प्रामुख्याने त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांत वास्तव्यास असणारी एक आदिवासी जमात. ही जमात काही प्रमाणात मेघालय ...