तन्य बिडाचे गुणधर्म आणखी सुधारण्याच्या प्रयत्नातून सिलिकॉन मॉलिब्डेनम तन्य बिडाचा जन्म झाला. या मिश्रधातूचे घटक सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असतात.

कार्बन : ३.३० – ३.८० टक्के

सिलिकॉन : ४.००-५.०० टक्के

सल्फर : < ०.०२ टक्के

मॅग्नेशियम : ०.०३ – ०.०५ टक्के

मॉलिबडेनम : ०.५० – १.०० टक्के

या मिश्रधातूचे उच्च तापमानास ताणशक्ती (Tensile Strength), शरणशक्ती (Yield Strength), विसर्पण शक्ती (Creep Strength)  हे गुणधर्म चांगले असतात. तसेच हे मिश्रधातू तापमान वाढल्यामुळे होणाऱ्या ऑक्सिडीकरणास (Oxidation) विरोध करतात.

अंतर्गत रचना : अंतर्गत रचनेत ग्रॅफाइटचे गोळे, मुख्यतः फेराइट व काही प्रमाणात पर्लाइट आढळून येतात. मॉलिब्डेनमचे प्रमाण वाढल्यास कार्बाइड येऊ शकतात व काठीण्य वाढते.

व्यवहारातील उपयोग : याचा उपयोग मुख्यतः एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, टर्बोचार्जर यासाठी केला जातो.

संदर्भ : American Foundry Society (AFS) Ductile Iron Handbook, USA, 1 January, 1992.

समीक्षक : प्रवीण देशपांडे