शहरांमधून उपलब्ध असणार्‍या सुविधा, पुरेसा पाणीपुरवठा, वीज पुरवठा, कुशल कामगार वर्ग, सांडपाणी वाहून नेण्यासाठी नलिकांचे जाळे आणि ह्या सर्वांवर खर्च करण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ इ. ग्रामीण भागांमध्ये अभावानेच आढळतात, त्यामुळे शहरांमध्ये वापरण्याची शुद्धीकरणयंत्रणा ग्रामीण भागात तशीच्या तशी वापरता येत नाही. तसेच ग्रामीण भागांमध्ये लोकवस्ती विखुरलेली असल्यामुळे उत्पन्न झालेले सांडपाणी एकत्र करून शुद्ध करण्याऐवजी स्वतंत्र घरांसाठी स्वतंत्र यंत्रणा असणे योग्य ठरते. ह्या कामी उपयोगी ठरतात ते १) पूतिकुंड (septic tanks), २) जलतल शौचालय (aqua privy), ३) मलकुंड शौचकूप (pit latrine), ४) चराचा शौचकूप (trench latrine), ५) संच्छिद्रण शौचकूप (borehole latrine), ६) जल निमीलक शौचकूप (water seal latrine), ७) रासायनिक प्रसाधनगृह (chemical toilet) इत्यादी. पूतिकुंडाविषयीची माहिती पूतिकुंड व अवायुजीवी निस्यंदक या नोंदीत दिलेली आहे. रासायनिक प्रसाधगृहे वापरण्यास खर्चिक असल्यामुळे त्यांचा उपयोग फारसा केला जात नाही, परंतु वरील यादीमधील इतर यंत्रणांचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे : १) कमी खर्चांत बांधकाम, २) कमी पाणी वापरावे लागते, ३) सांडपाणी वाहून नेण्याचा खर्च नाही, ४) वापर सुरू केल्यावर विशिष्ट काळानंतर उपयुक्त खत उपलब्ध होते, ५) सांडपाणी आणि मैला जमिनीत खोदलेल्या एकाच खड्ड्यामध्ये जमा होतात. आकृती क्र. २३.१ ते २३.५ ह्यामध्ये ह्या यंत्रणांची वैशिष्ट्ये दाखविली आहेत.

आ. २३.१(अ). घराच्या आत बांधण्यासाठी जलतल शौचालय.

 

आ. २३.१(आ). घराच्या आत बांधण्यासाठी जलतल शौचालय (उभा काटच्छेद).

 

 

 

आ. २३.३. चराचा शौचकूप : (१) मूत्राचा प्रवाह, (२) पाय ठेवण्यासाठी दगडी लाद्या, (३) विष्ठा झाकण्याकरिता माती.
आ. २३.२ समुद्रकिनार्‍याजवळ बांधण्यायोग्य शौचालय : (१) खड्ड्याकडे उतार असलेली गोल आकाराची लादी, (२) मूळची जमीन, (३) बांबूचे अस्तर, (४) तळापर्यंत दिलेले बांबूचे अस्तर, (५) घट्ट केलेला मातीचा उंचवटा.
आ. २३.४. जल निमीलक शौचकूपाची बैठक : (अ) आडवा काटच्छेद, (आ) शौचकूपाचा साचा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आ. २३.५. रासायनिक शौचालय : (१) बैठक, (२) कॉस्टिक सोड्याचा द्राव असलेली टाकी, (३) वायुवीजनासाठी नलिका, (४) तपासणीसाठी जागा, (५) जलोत्सारण नलिका.

संदर्भ :

  • Wagner, E. G.; Lanoix, J. N. Excreta Disposal For Rural Areas and Small  Communities.
  • Deo, R. G. Manual on Low Cost Sanitation, Goa, 2009.
  • Manual on Sewerage and sewage treatment, Central Public Health and Environmental Engineering  organization,  Ministry of  Urban development, New Delhi, 1993.