आ. १२. विरंजक चूर्ण द्रावण क्लोरिनेटर (दाबाखाली वाहणाऱ्या पाण्यासाठी) : (१) मृदू पोलादी (Mild Steel) दाबपात्र, (२) विरंजक चूर्णाकरिता रबरी पिशवी, (३) छिद्रित तबक किंवा व्हेंच्यूरीमापी, (४) नियंत्रण झडप, (५) पकडयुक्त नलिका, (६) वायू झडप, (७) निस्सारण झडप, (८) आगम व निर्गम झडप, (९) क्लोरीन प्रदान झडप, (१०) नलिकाग्र (तोटी).
पाण्याची क्लोरीनची मागणी काढण्याकरिता पुढील कार्यपद्धती अवलंबिली जाते. (१) पाण्याच्या नमुन्याचे सारखे भाग घेऊन प्रत्येकामध्ये वाढत्या प्रमाणात क्लोरीनचा द्रव मिसळतात. (२) विशिष्ट संपर्ककाल (सहसा ३० मिनिटे) झाल्यावर प्रत्येक नमुन्यामध्ये उरलेल्या…