कुंडलिनी (Kundalini)
हठयोगात कुंडलिनी शक्तीला आत्यंतिक महत्त्व आहे. घेरण्डसंहिता आणि हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये कुंडलिनी शक्तीचे वर्णन आढळते. कुंडलिनी शक्तीची ईश्वरी, कुंडली, बालरंडा, अरुंधती, भुजंगिनी आणि परमेश्वरी ही पर्यायवाचक नावे आढळतात (हठप्रदीपिका ३.१०३,१०९).…