ॲसिटिक अम्‍ल (Acetic acid)

भौतिक गुणधर्म : एक कार्बनी अम्‍ल. सूत्र CH3·COOH. इतर नावे अथॅनॉइक अम्‍ल, एथॅनॉलाचे अम्‍ल. स्वच्छ, वर्णहीन व द्रवरूप असते. याला तिखट वास असतो. वि.गु. १·०५५, वितळबिंदू १६·७० से., उकळबिंदू ११००…

अल्कलॉइडे (Alkaloides)

सजीवांनी (वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी) आपल्या विविध शारीरिक भागात निर्मिलेल्या नायट्रोजनयुक्त (Nitrogen containing) पदार्थांना अल्कलॉइडे असे संबोधिले जाते. याची सर्वसमावेशक व्याख्या केलेली  नाही. ह्या पदार्थातील नायट्रोजन हा अतिसौम्य अल्कधर्मी असावा आणि…

ॲट्रोपीन (Atropine)

सोलॅनेसी कुलातील ॲट्रोपा बेलाडोना (Atropa belladonna)  ह्या वनस्पतीच्या मुळांमध्ये  मुख्य प्रमाणात मिळणारे आणि पुरातन काळापासून वापरात असलेले एक अल्कलॉइड संयुग आहे. आपल्याकडे सर्वत्र आढळणाऱ्या धोतऱ्याच्या झाडाच्या  (Datura stramonium)  मुळांमध्येसुद्धा हे अल्कलॉइड मोठ्या प्रमाणात आढळते.  ॲट्रोपिनाचे रासायनिक  सूत्र  C17H23NO3…

टर्पिने (Terpenes)

ज्या अणूंमध्ये कार्बनचे अणू पाचच्या पटीतील ​संख्येनुसार  असतात आणि  जवळजवळ  प्रत्येक वनस्पती तसेच काही प्राणिमात्र आपल्या  अंतरंगात ज्यांना  निर्मितात  अशा  पदार्थांना टर्पिन म्हणतात. ह्या अणूंमध्ये कार्बनशिवाय  ​केवळ हायड्रोजन आणि कधीकधी ऑक्सिजन इतकीच  मूलद्रव्ये असतात.  टर्पेंटाइन  ह्या  वनस्पतिजन्य  पदार्थांच्या केल्या गेलेल्या  प्रथम   अभ्यासापासून त्यासारख्या  पदार्थांना टर्पिने संबोधिले जाऊ…

ओझोन (Ozone)

ओझोन किंवा ट्रायऑक्सिजन हे O3 रेणुसूत्र असलेले ऑक्सिजनचे एक प्रारूप (allotrope) आहे. याच्या एक रेणूत ऑक्सिजनचे तीन रेणू असून त्याची संरचना खालीलप्रमाणे:   ह्या वायूच्या  दाहक वासानुरूप त्याला  ozon  ह्या मुळातील  ग्रीक भाषेतील शब्दार्थान्वये  नाव दिले गेले. गुणधर्म : प्रयोगशाळेतील…