औषधीय खनिज : वैक्रान्त (Medicinal Mineral : Tourmaline)
आयुर्वेद महारसातील महत्त्वपूर्ण खनिज. कौटिल्य अर्थशास्त्रात याचा उल्लेख ‘वैकृन्तक’ नावाने दिसून येतो. रसहृदयतन्त्र ग्रंथापासून अनुक्रमे सर्व रसशास्त्राच्या ग्रंथात महारस तसेच उपरत्न म्हणून याचा उल्लेख आढळतो. विकृन्तयति लोहानि तेन वैक्रान्तकः स्मृतः…