जल परिसंस्था (Aquatic ecosystem)

जल परिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेत सागरी पर्यावरण तसेच सरोवरे, नद्या, तलाव,…

जलजीवालय (Aquarium)

जलजीवालय म्हणजे खाऱ्या व गोड्या पाण्यातील प्राणी ठेवण्यासाठी, ज्याची एक बाजू तरी पारदर्शी असेल, असे मुद्दाम तयार केलेले बंदिस्त क्षेत्र. जलजीवालय ही साहचर्याने राहणाऱ्या सजीवांची मानवनिर्मित परिसंस्था असून जलचरांच्या नैसर्गिक…

जरदाळू (Apricot)

रोझेलिस या गणातील रोझेसी कुलामधील प्रूनस या प्रजातीत पीच, चेरी, अलुबुखार व बदाम अशा वनस्पती येतात. याच प्रजातीत जरदाळू याचा समावेश होतो. या वृक्षाच्या फळालाही जरदाळू म्हणतात. भारतातील वनस्पतीचे शास्त्रीय…

जमालगोटा (Purging croton)

ही वनस्पती एरंडाच्या यूफोर्बिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रोटॉन टिग्लियम आहे. चीन, मलेशिया, म्यानमार, श्रीलंका व भारत या देशांत ही वनस्पती वनांत तसेच बागांमध्ये आढळते. भारतात ही पश्चिम बंगाल,…

जनुकीय समुपदेशन (Genetic counselling)

जनुकीय विकारांची रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहिती करून देण्याच्या प्रक्रियेला जनुकीय समुपदेशन म्हणतात. या प्रक्रियेत जनुकीय विकाराचे स्वरूप व त्याचे परिणाम, घ्यावयाची काळजी, रुग्णाला असणारे धोके आणि तो जनुकीय आजार…

जनुकीय संकेत (Genetic code)

प्रथिन निर्मितीसाठी सजीवांच्या जनुकांमध्ये असलेली सांकेतिक माहिती. सर्व सजीवांसाठी प्रथिने आवश्यक असतात. पेशीमध्ये ही प्रथिने वेगवेगळ्या २० ॲमिनो आम्लांपासून तयार होतात. प्रथिनांमधील ॲमिनो आम्ले पेप्टाइड बंधाने जोडलेली असतात. प्रथिनांच्या निर्मितीत…

जनुकीय परिवर्तित पिके (Genetically modified crops)

वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल करण्याला जनुकीय परिवर्तन म्हणतात. पिकांमध्ये कीडरोधी गुणधर्म निर्माण करण्यासाठी, त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी तसेच त्यांची वाढ आणि उत्पन्न सुधारण्यासाठी पिके देणाऱ्या वनस्पतींच्या जनुकीय संरचनेत बदल केला जातो.…

जनुकीय अभियांत्रिकी (Genetic engineering)

जैव तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या सजीवाच्या जीनोममध्ये बदल करण्याच्या तंत्राला ‘जनुकीय अभियांत्रिकी’ म्हणतात. या तंत्रात एखादया सजीवाच्या जीनोममध्ये बाहेरील नवीन जनुक घातला जाऊन त्या सजीवाच्या आनुवंशिक गुणधर्मात इच्छित व आवश्यक…

जनुक (Gene)

सजीवांच्या आनुवंशिक घटकांचे एकक. जनुके ही पेशीच्या केंद्रकातील गुणसूत्रांवर असतात आणि ती सजीवांची आनुवंशिक लक्षणे निश्चित करतात. विशिष्ट जनुके गुणसूत्राच्या विशिष्ट भागावर असतात. एक गुणसूत्र म्हणजे डीएनए (डीऑक्सिरिबो - न्यूक्लिइक…

जठर (Stomach)

ग्रासनली (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) आणि आदयांत्र (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) यांच्यामधील पचन संस्थेच्या भागाला जठर म्हणतात. हा अन्नमार्गातील सर्वात रुंद भाग असतो. मानवी शरीरात मध्यपटलाच्या डाव्या बाजूला उदरपोकळीत जठर…

जटामांसी (Spikenard)

व्हॅलेरिएनेसी कुलातील ही वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव नार्डोस्टॅकिस जटामांसी किंवा नार्डोस्टॅकिस ग्रँडिफ्लोरा आहे. ती एक सुगंधी वनस्पती आहे. हिमालयाच्या चीनकडील भागात सस.पासून ३,३००—५,००० मी. उंचीवरील पर्वतीय प्रदेशात ती सामान्यपणे…

जंत (Ascaris)

गोलकृमी (नेमॅटोडा) संघातील प्राण्यांची एक प्रजाती. जंत परजीवी आहेत. त्यांची एक जाती ॲस्कॅरिस लुंब्रिकॉइडिस  मनुष्याच्या शरीरात असते. त्यांची आणखी एक जाती, ॲस्कॅरिस सुअम डुकराच्या शरीरातील अंत:परजीवी आहे. ते फिकट पिवळसर आणि…

छिद्री संघ (Porifera)

समुद्र व जलाशयाच्या तळावर राहणाऱ्या अपृष्ठवंशी प्राण्यांचा एक संघ. या संघामध्ये सर्व प्रकारच्या स्पंजांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या शरीरावर अनेक छिद्रे, रंध्रे किंवा भोके असतात म्हणून त्यांच्या संघाला छिद्री संघ…

चौशिंगा (Four horned antelope)

चार शिंगे असलेले हरिण. चौशिंग्याचा समावेश स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिल) गणाच्या गोकुलातील बोव्हिडी उपकुलात होतो. याचे शास्त्रीय नाव टेट्रासेरस क्वाड्रिकॉर्निस आहे. टेट्रासेरस प्रजातीत क्वाड्रिकॉर्निस ही एकमेव जाती आहे. भारत व…

चौलमुग्रा (Chaulmoogra)

चौलमुग्रा हा वृक्ष अकॅरिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिद्नोकार्पस वायटीयाना आहे. हा उंच व सदापर्णी वृक्ष भारत, बांगला देश आणि म्यानमार या देशांत आढळतो. भारतात हा आसाम, त्रिपुरा येथील…