चोपचिनी (China root)

लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव स्मायलॅक्स चायना आहे. चीन, जपान आणि भारत या देशांतील उबदार हवामानात ही वाढते. भारतात आसाममध्ये या वनस्पतीची लागवड केली जाते. स्मायलॅक्स प्रजातीच्या ३००—३५० जाती…

चेतासंस्था (Nervous system)

प्राण्यांच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतींमध्ये समन्वय साधणारी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांना संदेश वाहून नेणारी एक संस्था. बहुतेक बहुपेशीय प्राण्यांमध्ये चेतासंस्था आढळून येते आणि ती कमी-अधिक प्रगत असते. अनेक प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे…

चुका (Bladder dock)

चुका ही वर्षायू वनस्पती पॉलिगोनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुमेक्स व्हेसिकॅरियस आहे. प्रजातीत रुमेक्स जवळजवळ २०० जाती आहेत. ही वनस्पती मूळची पश्चिम पंजाबमधील असून तिचा प्रसार पाकिस्तान आणि भारताशिवाय…

चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण (Magnetic resonance imaging)

वैदयकीय क्षेत्रात शरीराच्या आतील अवयवांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे एक तंत्रज्ञान. रोगनिदान, उपचार आणि उपचारानंतर पाठपुरावा करण्यासाठी शरीरातील अवयवांचे नेमके प्रतिमाकरण करणे आवश्यक असते.चुंबकीय अनुस्पंद  प्रतिमा (एम्. आर्. आय्.)…

चीक (Latex)

सपुष्प वनस्पतींच्या अनेक जातींमध्ये असलेला दाट आणि दुधाळ किंवा पाण्यासारखा रंगहीन द्रव पदार्थ. वनस्पतींपासून स्रवणारा हा चिकट स्राव जटिल व कलिली स्वरूपाचा असतो. त्यात प्रथिने, अल्कलॉइडे, स्टार्च, शर्करा, तेले, टॅनीन,…

चिलट (Grassfly)

डिप्टेरा गणातील क्लोरोपिडी कुलात चिलटांच्या १६० प्रजाती असून त्यांतील सु. २,००० जातींचे वर्गीकरण झाले आहे. हा उपद्रवी कीटक जगभर आढळतो. चिलटांच्या हिप्पेलेट्स व सायपंक्युला या प्रजातींतील कीटकांना आयफ्लाय किंवा आयनॅट…

चिमणी (Sparrow)

सर्वांच्या परिचयाचा एक पक्षी. पॅसरिडी कुलात चिमणीचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस आहे. पॅसर, पॅट्रोनिया, कार्पोस्पायझा व माँटिफ्रिगिला अशा पॅसरिडी कुलाच्या चार प्रजाती मानल्या गेल्या आहेत. त्यांपैकी…

चिनार (Oriental Plane)

एक विशाल, दीर्घायू पानझडी वृक्ष. प्लँटॅनेसी कुलातील या वृक्षाचे शास्त्रीय नाव प्लँटॅनस ओरिएंटॅलिस आहे. हा वृक्ष मूळचा पूर्व भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून त्याचा पूर्वेस प्रसार झाला. वायव्य हिमालयात, सतलजच्या पश्चिमेस…

चित्रबलाक (Painted stork)

पक्षिवर्गातील सिकोनिफॉर्मिस गणातील एक पक्षी. या गणात बलाक, बगळा, करकोचा, आयबिस, दर्वीमुख व रोहित या पक्ष्यांचा समावेश होतो. बलाकांचे क्षत्रबलाक, लहान क्षत्रबलाक, मुग्धबलाक, लोहबलाक, कृष्णबलाक व चित्रबलाक असे प्रकार आहेत.…

चितळ (Spotted deer)

भारतात मोठ्या संख्येने आढळणारा मृग. स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग कुलात (सर्व्हिडी) चितळाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिस ॲक्सिस आहे. श्रीलंका, बांगला देश, नेपाळ व भारत या देशांत…

चिचुंदरी (Asian house shrew)

उंदरासारखा दिसणारा एक सस्तन प्राणी. चिचुंदरी हा युलिपोटिफ्ला या गणातील आहे. या गणातील सोरीसिडी कुलाच्या पांढऱ्या दातांच्या प्रकारात संकस प्रजाती येते. संकस प्रजातीतील प्राण्यांना चिचुंदरी म्हणतात. या प्रजातीत १८ जाती…

चिकोरी (Chicory)

चिकोरी ही एक बहुवर्षायू वनस्पती ॲस्टरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिकोरियम इंटीबस आहे. याच वनस्पतीच्या मुळांची भुकटी सामान्यपणे कॉफीच्या भुकटीत स्वाद आणण्यासाठी मिसळली जाते. ही मूळची यूरोपातील असून ती…

चिकू (Sapodilla)

चिकू हा सॅपोटेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्रस सॅपोटा आहे. ॲक्रस ममोसा, ॲक्रस झपोटीला, मॅनिलकारा ॲक्रस, मॅनिलकारा झपोटा या नावांनीही हा वृक्ष ओळखला जातो. मेक्सिको मूलस्थान असलेला हा वृक्ष…

चिकुनगुन्या (Chikungunya)

अल्फा-विषाणूंनी बाधित झालेले डास चावल्यामुळे होणारा एक आजार. हातापायांचे सांधे सतत दुखणे, अंगावर (विशेषकरून हात, पाय, छाती व पाठीवर) पुरळ उठणे, डोके दुखणे आणि ताप येणे ही या आजाराची प्राथमिक…

चिकणा (Common wireweed)

उष्ण व उपोष्ण प्रदेशांत आढळणारी बहुवर्षायू वनस्पती. ही भेंडीच्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिडा ॲक्यूटा आहे. तसेच ती सिडा कार्पिनिफोलिया या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ही वनस्पती मूळची मध्य…