महादेवराव खडसे (Mahadevrao Khadse)

खडसे, महादेवराव : (१६ फेब्रुवारी १९३१ - १२ मार्च २०१७ ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सनई वादक. विदर्भातील एकमेव सनई वादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे पूर्ण नाव महादेवराव हंगुजी खडसे असे…

संजीव अनंत गलांडे (Sanjeev Anant Galande)

गलांडे, संजीव अनंत : (२० सप्टेबर १९६७). भारतीय जीवरसायनशास्त्रज्ञ. विविध प्रारूपांच्या साहाय्याने जनुकबाह्य आनुवंशिकीतील (एपिजेनेटिक्स; Apigenetic) उत्क्रांती पद्धती तसेच गर्भावस्थेत मधुमेह असलेल्या मातेच्या संततीतील मधुमेह, टी-लसिक पेशी विकासातील रंज्यद्रव्य आणि…

ट्रान्सेप्ट( Transept)

(क्रॉस). चर्च वास्तूतील ख्रिस्ती क्रूससारखे दालन. चर्चमध्ये प्रवेशद्वारा लगतच प्रशस्त मध्य दालन नेव्ह असते, साधारणत: त्याला काटकोनात छेदणारे ट्रान्सेप्ट  असते. ट्रान्सेप्ट नेव्हपेक्षा लांबीने कमी असून सहसा उत्तर दक्षिण असतात. चर्चच्या…

विठ्ठल क्षीरसागर (Vitthal Kshirsagar)

क्षीरसागर, विठ्ठल : (१ सप्टेंबर १९४३ - १७ जानेवारी २०२४ ) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला, ढोलकी, ढोलक आणि पखवाज वादक. पूर्ण नाव विठ्ठल बन्सी क्षीरसागर. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर येथे…

यशवंत देव (Yashawant Dev)

देव, यशवंत : (१ नोव्हेंबर १९२६ — ३० ऑक्टोबर २०१८). ज्येष्ठ मराठी गीतकार, संगीतकार, कवी आणि निवेदक म्हणून सुपरिचित. यशवंत देव यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील (तत्कालीन कुलाबा) पेण या गावी…

योग संकल्पना, पुराणांतील (Concept of Yoga in Puranas)

पुराणे हा संस्कृत साहित्यातील एक वाङ्मयप्रकार असून त्यात योगशास्त्राशी संबंधित अनेक विषयांचे विस्तृत प्रतिपादन आढळते. सर्वसामान्य व्यक्तींना वेदांचे ज्ञान सोप्या भाषेत समजावे या हेतूने व्यास महर्षींनी पुराणांची रचना केली असे…

कियास (Qiyas)

इस्लामी किंवा मुसलमानी विधीच्या प्रमुख चार मूलस्रोतांपैकी कियास हा चौथा मूलस्रोत. सतर्क युक्तिवाद किंवा सदृश ‘परिस्थिती’तून तर्काने अनुमान काढण्याचे तत्त्व म्हणजे कियास. यालाच ‘कयास’ किंवा ‘किया’ असेही म्हटले जाते. इस्लामी…

अनुनासिक (nasal sound)

भाषाशास्त्रातील ध्वनिशास्त्रीय संज्ञा. जे भाषिक ध्वनी उच्चारताना नाकावाटे हवा बाहेर सोडली जाते त्यांना ‘अनुनासिक’ असे म्हणतात.  उदाहरणार्थ, मराठीतील ङ्, ञ्, ण्, न्, म् ही व्यंजने अनुनासिके आहेत. मानवी मुखातील पडजीभ…

विषुवदिन (Equinox)

संपातदिन. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोन दिवसांना विषुवदिन म्हणून ओळखले जाते. या दोन दिवशी पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी दिनमान व रात्रिमान समसमान असते, म्हणजे १२ तासांचा दिवस व १२…

परिचर्या व्यवसाय व व्यावसायिकता (Nursing profession and professionalism)

प्रस्तावना : जैव-नीतिशास्त्र (Bioethics) या शाखेत वैद्यकशास्त्र आणि जीवविज्ञानामध्ये उद्भवणाऱ्या तात्त्विक, सामाजिक आणि कायदेशीर समस्यांचा अभ्यास केला जातो. ही शाखा प्रामुख्याने मानवी जीवनाशी संबंधित आहे. आरोग्य सेवा देत असताना याचा…

Read more about the article सिएरा दे अतापुएर्का (Sierra de Atapuerca)
सिएरा दे अतापुएर्का (स्पेन) येथील प्राचीन मानववस्ती दर्शवणारी पुरातत्त्वीय स्थळे. चित्रसंदर्भ : Fragments of a million-year-old face found in Spain shed new light on ancient human migrations)

सिएरा दे अतापुएर्का (Sierra de Atapuerca)

यूरोप खंडातील स्पेनमधील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. अलीकडे विसाव्या शतकात स्पेनमधील बर्गोस प्रांतामध्ये सिएरा दे अतापुएर्का पर्वतरांगांमध्ये मीटर रूळांतर (मीटर गेज) रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना कार्स्ट (karst) भूस्वरूपात मोठ्या…

विल्मा सुब्रा (Wilma Subra)

सुब्रा,  विल्मा : (१ जानेवारी १९४३). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व लढाऊ पर्यावरणवादी. सुब्रा यांनी आपले आयुष्य पर्यावरणाच्या परिणामांबद्दल चिंतित असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी समर्पित केले आहे. त्यांचा जन्म लुइझिॲनातील मॉर्गन सिटी…

लसीकरण परिचर्या (Vaccination Nursing)

प्रस्तावना : शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला विशिष्ट जंतू ओळखण्याकरिता आणि त्यांच्याशी लढण्याकरिता प्रशिक्षण देऊन विशिष्ट रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लस देण्याची प्रक्रिया म्हणजे लसीकरण होय. जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळण्याकरिता लस…

नेव्ह (Nave)

चर्च वास्तूतील मध्यवर्ती आणि प्रमुख मध्यदालन. नेव्ह साधारणत: चर्चच्या प्रवेशद्वारापासून ट्रान्ससेप्टपर्यंत पसरलेला असतो. ही जागा प्रार्थना करण्यासाठी उपलब्ध असते. नेव्ह हा शब्द लॅटिन भाषेतील नॅव्ह‍िस (navis) या शब्दापासून तयार करण्यात…

ईश्वरीय न्याय (Divine Justice / Adil)

इस्लाम धर्मातील एक संकल्पना. अल्लाहच्या तीन गुणधर्मांपैकी रबुबियात (दैवी संगोपन) आणि करुणा या गुणधर्मांनंतर अदालत किंवा न्याय या गुणधर्माचा क्रमांक लागतो. क्रमांक तिसरा असला तरी, अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि न्यायिक…