ग्यानबाचे अर्थशास्त्र (Economics of Gyanba)

एका सामान्य, साक्षर अशा व्यवहारी माणसाला अर्थशास्त्राचा प्राथमिक परिचय करून देण्यासाठी लिहिण्यात आलेला एक अर्थशास्त्रीय ग्रंथ. रोजच्या जीवनातील ग्यानबाची (सर्वसामान्य माणूस) जी आर्थिक वागणूक आहे, तिचा परिचय, तिचे स्पष्टीकरण, तिचे…

गिरिशृंग (Horn)

हिमनदीच्या झीज कार्याने तयार होणारे भूस्वरूप. हिमनदी हा क्षरण (झीज) कार्याचा शक्तिशाली घटक असून त्याने पृथ्वीवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष निर्माण केले आहेत. प्रथमतः हिमनदीच्या खणन कार्यामुळे तिच्या पात्रात आराम खुर्चीसारख्या…

Read more about the article भाषेची उत्क्रांती (Evolution of language)
ब्रोकाज एरिया

भाषेची उत्क्रांती (Evolution of language)

मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यांतील एक महत्त्वाचे परिवर्तन. माणूस हा बोलणारा प्राणी आहे, अशी माणसाची एक साधी व्याख्या करता येते. किंबहुना चिन्हांचा उपयोग करून, म्हणजेच भाषेचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधणे हे…

कोव्ह (Cove)

आखाताप्रमाणे समुद्र किनाऱ्यावर निर्माण झालेल्या अंतर्वक्र खोलगट भागाला कोव्ह म्हणतात. कोव्ह हे सागर किनाऱ्यावरील झीज क्रियेने निर्माण झालेले अर्ध गोलाकार भूस्वरूप असते. अशा किनाऱ्याच्या प्रदेशात मृदू व कठिण खडक एकानंतर…

सर जॉन (कॅऱ्यू) एक्लिस  (Sir John Carew Eccles)

एक्लिस, सर जॉन (कॅऱ्यू) : (२७ जानेवारी १९०३ – २ मे १९९७). ऑस्ट्रेलियन शरीरक्रियाविज्ञानशास्त्रज्ञ. तंत्रिकासंवेदना (मज्जातंतूंद्वारे होणारी संवेदना) एका पेशीतून दुसरीत प्रविष्ट होण्याच्या संशोधनकार्याबद्दल एक्लिस व त्यांचे सहकारी ए. एल्. हॉजकिन…

मानवी वर्तनाची उत्क्रांती (Evolution of Human Behaviour)

मानवामधील सामाजिक वर्तनाची उत्क्रांती. प्राण्यांमधील मानव सोडून इतर प्रायमेट प्राण्यांमध्येदेखील नियमित सामाजिक रचना असते आणि त्यांच्यामध्येही माणसांप्रमाणे आपण स्वतः, आपल्या जवळचे व परके अशा अनेक संकल्पना आढळतात. आपल्याला इतर प्राण्यांपासून…

आशययुक्त अध्यापन पद्धती (Content-Based Teaching Method)

प्रचलित व्यवस्थेबद्दल, सद्यस्थितीबद्दल असमाधान वाटणे ही मानवी मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. प्राप्त परिस्थितीबद्दल असमाधान वाटण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळेच मानवाला प्रगती साधण्यास मदत झाली आहे. प्रगती साधण्यासाठी मानवाकडून विविध क्षेत्रांत संशोधन केले…

लोकसंख्याशास्त्र व परिचर्या (Demography and Nursing)

प्रस्तावना : लोकसंख्याशास्त्र हे लोकसंख्येचे वितरण, रचना आणि हालचालींचा वैज्ञानिक अभ्यास आहे. याचा परिचर्या व आरोग्यसेवा यांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.विविध वयोगटातील लोकसंख्येला योग्य व उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्याकरिता परिचारिका…

आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल (Alfred Barnard Nobel)

नोबेल, आल्फ्रेड बेअरनार्ड : (२१ ऑक्टोबर १८३३–१० डिसेंबर १८९६). स्वीडिश अभियंते, स्फोटकांचे संशोधक, उद्योगपती आणि प्रख्यात नोबेल पारितोषिकांचे प्रणेते. त्यांनी डायनामाइट व इतर शक्तिमान स्फोटक पदार्थ शोधून काढले. नोबेल यांचा…

पॉल एर्डोश (Paul Erdős)

एर्डोश,पॉल : (२६ मार्च १९१३ – २० सप्टेंबर १९९६). हंगेरियन गणितज्ज्ञ. संख्या सिद्धांत आणि चयनशास्त्र यातील गणिती योगदानाबाबत त्यांना सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ लेनर्ड ऑयलर (Leonhard Euler) यांच्यानंतरचे स्थान दिले जाते. त्यांनी…

सर्वंकष अणुचाचणीबंदी करार (Comprehensive Nuclear Test Ban Treaty)

पार्श्वभूमी : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर दोन अणुबाँब हल्ले केले. त्यातून झालेल्या स्फोटाच्या विध्वंसाचे परिणाम पाहून त्या बाँबची संहारकशक्ती जगाच्या लक्षात आली आणि 'अणु शर्यत' चालू झाली. शीतयुद्धाच्या कालावधीत या…

Read more about the article मेंदूची उत्क्रांती (Evolution of Brain)
चिंपँझी, इरेक्टस मानव व आधुनिक मानवांच्या मेंदूंची तुलना.

मेंदूची उत्क्रांती (Evolution of Brain)

मानवी चेतासंस्थेचे एक महत्त्वाचे इंद्रिय. सु. १० अब्ज चेतापेशींचे जाळे असलेल्या मेंदूचे कार्य थक्क करणारे आहे. शरीरातील सर्व कार्यांवर मेंदूचे नियंत्रण असते. सर्व प्रकारच्या भावभावना, विचार, ज्ञानेंद्रियांकडून मिळणाऱ्या संदेशांचे आकलन,…

Read more about the article मानवी उत्क्रांती : अवजारांचे कौशल्य (Evolution of Tool Use)
आयव्हरी कोस्टमधील चिंपँझींनी (पॅन- ट्रोग्लोडायटेस व्हेरस) वापरलेली दगडी अवजारे.

मानवी उत्क्रांती : अवजारांचे कौशल्य (Evolution of Tool Use)

मानवी उत्क्रांतीतील एक महत्त्वाचे कौशल्य. मानवपूर्व अवस्था ते आधुनिक मानव उत्क्रांतीच्या घडामोडींमध्ये दगडांना व हाडांना कृत्रिमपणे आकार देऊन त्यांची हत्यारे व अवजारे बनवण्याचे तंत्र विकसित होण्याला महत्त्वाचे स्थान आहे. प्राण्यांचे…

Read more about the article दोन पायांवर चालण्याची उत्क्रांती (Evolution of Bipedalism)
पाठीच्या कण्याची रचना.

दोन पायांवर चालण्याची उत्क्रांती (Evolution of Bipedalism)

चिंपँझी या कपिचे पूर्वज व मानव प्रजातीचे पूर्वज यांच्या शाखा सुमारे ८० ते ६० लक्ष वर्षपूर्व या काळात वेगळ्या झाल्यानंतर मानवी उत्क्रांतीची वाटचाल निराळ्या दिशेने सुरू झाली. या नंतर शरीररचनेत…

सेवालाल महाराज (Sevalal Maharaj)

सेवालाल महाराज : (१५ फेब्रुवारी १७३९—४ डिसेंबर १८०६). गोर-बंजारा समुदायाचे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक आणि आधुनिक संत. त्यांचा जन्म गोलार दोडी तांडा, ता. गुंटी, जि. अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील…