अंगददेव (Angad Dev)

गुरू अंगददेव : (३१ मार्च १५०४—२९ मार्च १५५२). शिखांचे दुसरे गुरू आणि ‘गुरुमुखी’ या पवित्र लिपीचे निर्माते. त्यांचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव भाई लेहना (लहणा) असे…

नो फर्स्ट यूझ धोरण (No First Use Policy)

पार्श्वभूमी : १९४५ साली अमेरिकेने जपानवर दोन अणुबाँब टाकले आणि जपानने शरणागती पतकरली. त्या शरणागतीमागचे मुख्य कारण म्हणजे तेथे मोठ्या प्रमाणात झालेली जीवित व वित्तहानी होय. या हानींमुळे अणुशस्त्राचे दुष्परिणाम…

मिजी जमात (Miji Tribe)

भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात अरुणाचल प्रदेशातील कामेंग, टिप्पी, कुरुंग कुमेय जिल्ह्यात वास्तव्यास आहे. त्यांना साजलोंग किंवा दमाई असेही म्हणतात. अरुणाचलमधील कामेंग जिल्ह्यातील अबू गोपेन गोमा हे त्यांचे वंशज…

महाली जमात (Mahali Tribe)

भारतातील एक अनुसूचित जमात. यांची वसती मुख्यत꞉ बिहार राज्यातील छोटा नागपूर, रांची, हजारीबाग, गुमला, लोहारडगा, सिंगभूम आणि धनबाद या जिल्ह्यांमध्ये असून पश्चिम बंगाल तसेच ओडिशामधील मयूरभंज व सुंदरगढ या ठिकाणीसुद्धा…

कृष्णास्वामी कस्तुरीरंगन (Krishnaswami Kasturirangan)

कस्तुरीरंगन, कृष्णास्वामी : (२० ऑक्टोबर १९४० – २५ एप्रिल २०२५). भारतीय अवकाशशास्त्रज्ञ. जन्म एर्नाकुलम येथे. त्यांचे पूर्वज तमिळनाडूमधून केरळच्या विविध भागांत स्थायिक झालेत. त्यांच्या आजोबांना शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने मुलांनी…

आर्ट डेको (Art Deco)

(आलंकारिक कला). अलंकरणाची एक शैली. ही साधारणत: १९१० ते १९२० च्या दरम्यान पश्चिम यूरोपात उदयास आली आणि १९३०च्या दशकात अमेरिकेची एक प्रमुख शैली म्हणून विकसित झाली. ती प्रामुख्याने वास्तुकलेतील सजावटीचे…

बौहाउस (Bauhaus)

(स्थापना : १९१९). जर्मनीतील एक कलाशिक्षण संस्था. कला, कारागिरी व तंत्रविद्या यांचा समुचित समन्वय साधून या संस्थेने पश्चिमी कलाशिक्षणात क्रांती घडवून आणली. जर्मन वास्तुविशारद वॉल्टर ग्रोपिअस (१८८३ – १९६९) याने…

मृदेची पारगम्यता (Permeability of soil )

[latexpage] स्थापत्य अभियांत्रिकीतील महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे मृदा. प्रत्येक मृदेची काही अंशी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. पारगम्यता किंवा पार्यता हा सरंध्र/सच्छिद्र (Porous)  मृदेचा गुणधर्म आहे, ज्यामध्ये मृदेच्या आंतरबंधीय रिक्ततेमधून…

जावा मानव (Java man)

पूर्व आशियाच्या इंडोनेशिया द्वीपसमूहातील जावा बेटावरील एक मानवी जीवाश्म. जावा बेटावरील काही स्थळांवर मानवी उत्क्रांती आणि मानवी स्थलांतर या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण पुरावे सापडले. भूशास्त्रीय दृष्ट्या हे बेट एक अत्यंत सक्रिय…

बैगा जमात (Baiga Tribe)

भारतातील मध्य प्रदेशातील विशेषतः मंडला, विलासपूर, बालाघाट दुर्ग, दिंडोरी, शाहडोल, सिद्धी, कटनी, सिंग्रौली, अनुपूर या जिल्ह्यांत आढळणारी एक अनुसूचित जमात. मध्य प्रदेशमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. छत्तीसगढ…

गायनस्थळ, चर्चमधील (Choir)

(क्वायर). चर्चमधील धार्मिक गायकवृंदाची जागा. धार्मिक संगीत गाणाऱ्या गायनसमूहाला आणि गायनस्थळ या दोन्हीला इंग्रजी संज्ञा ‘क्वायर’ अशीच आहे. ही जागा बहुदा वेदी (altar) आणि लोकसभागृह (nave) यांमधील असून जेथे धर्मगुरू…

माणिकफन जमात (Manikfan Tribe)

भारतातील एक अनुसूचित जमात. ही जमात मुख्यत꞉ लक्षद्वीप व केरळ येथे वास्तव्यास आहे. त्यांची २०११ च्या जनगणनेनुसार ६४,४२९ इतकी लोकसंख्या आहे. हे लोक मनिकू नावाचा मूळ माणूस आपला पूर्वज असून…

Read more about the article ड्रॅगन मानव (Dragon man)
हार्बिन कवटी

ड्रॅगन मानव (Dragon man)

पुरातन मानवाची एक विलुप्त जाती (स्पीशीझ). या मानवाच्या कवटीचा जीवाश्म चीनच्या ईशान्येकडील हेइलाँगजिआंग (हेलुंगजिआंग, Heilongjiang) प्रांतातील हार्बिन शहरात मिळाला आहे. ‘हेइलाँगजिआंग’ चा अर्थ होतो काळी ड्रॅगन नदी (ब्लॅक ड्रॅगन रिव्हर).…

परोजा जमात (Paroja Tribe)

भारतातील एक अनुसूचित जमात. मुख्यत꞉ ही जमात ओडिशा राज्याच्या कोरापूट व कलहांडी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असून आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणीसुद्धा ते काही प्रमाणात आढळतात.…

Read more about the article आडोशीपट, चर्चमधील (Iconostasis)
Iconostasis 2018

आडोशीपट, चर्चमधील (Iconostasis)

(धर्मचिन्हांकित भिंती किंवा पट). बायझंटिन परंपरेतील ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमधील आडोशीपटाचा प्रकार. पूर्वी चर्चमधील वेदी (अल्टार) आणि लोक सभागृह (नेव्ह) यांना वेगळे करण्यासाठी दगड, लाकूड, धातू किंवा पारदर्शक पडद्याचा वापर केला…