लिंक्डइन ही एक व्यवसाय आणि रोजगार आधारित सेवा आहे, जी वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्सद्वारे चालवली जाते. सह-संस्थापक रेड हॉफमन यांनी 2002 साली लिंक्डइनची सुरुवात त्यांच्या राहत्या खोली मध्ये केली आणि लिंक्डइन हे अधिकृतपणे 5 मे, 2003 रोजी सुरु करण्यात आले. लिंक्डइन हे प्रामुख्याने व्यावसायिक कामासाठी वापरले जाते. ज्यामध्ये व्यक्ती नोकरी शोधण्यासाठी त्यांचा बायोडेटा पोस्ट करू शकतात. लिंक्डइनचे कार्य हे व्यक्तींना अधिक उत्पादनक्षम आणि यशस्वी करण्यासाठी जगातील व्यावसायिकांशी कनेक्ट करणे होय. लिंक्डइन इन्स्टिटय़ूटचे स्वप्न हे जागतिक कर्मचाऱ्यांना प्रत्येक सदस्यासाठी आर्थिक संधी निर्माण करणे आहे. लिंक्डइनचे सदस्य बनण्यासाठी व्यक्तीला लिंक्डइन वेबसाइट्स किंवा मोबाईल अॅप्स वरून खाते उघडणे आवश्यक आहे. खाते उघडण्यासाठी व्यक्तीला आपली खासगी माहिती भरणे आवश्यक आहे व आपला बायोडेटा अपलोड करणे आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर संबंधित व्यक्ती जगातील व्यावसायिकांशी कनेक्ट होऊ शकतो व नोकरी शोधू शकतो.

संदर्भ :

समीक्षक – विजयकुमार नायक

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा