अवक्षेपण विक्रिया

जलीय विद्रावकातील धन आणि ऋण आयनांच्या संयोगामुळे अविद्राव्य आयनिक घन पदार्थ तयार होण्याच्या रासायनिक ‍विक्रियेला अवक्षेपण म्हणतात. यामध्ये तयार झालेल्या अविद्राव्य पदार्थाला अवक्षेप (precipitate) म्हणतात.

अवक्षेपाचे गुणधर्म : (१) जलीय विद्रावकामधील धनायन (anion) आणि ऋणायन (cation) यांचा संयोग होऊन अवक्षेप तयार होतो. (२) काही अवक्षेपी विक्रिया तापमानावर तर काही विद्रावक संहतेवर (solvent concentration) अवलंबून असतात. (३) अवक्षेप हा स्फटिकी असतो. तो विद्रावकामध्ये विखुरलेला (suspended) असू शकतो किंवा तळाशी साचतो. अवक्षेपाव्यतिरिक्त उपस्थित द्रव्याला ‘अवक्षेपरहित द्राव’ (supernatant liquid) असे म्हणतात. (४) अवक्षेप आणि अवक्षेपरहित द्राव विलगीकरणाच्या विविध पध्दती आहेत : केंद्रोत्सारण (centrifugation), गालन (filtration) व निचरण (decantation).

 

 

 

निव्वळ आयनिक समीकरण (Net ionic equation) : अवक्षेपी विक्रिया सामान्यत: निव्वळ आयनिक समीकरणाद्वारे निर्देशित केल्या जातात. हे समीकरण आणवीय तसेच विद्युत प्रभार यांबाबतीत संतुलित असते.

AB_(_a_q_) + CD_(_a_q_) #\rightarrow#AD_(_a_q_) + CB_(_s_)

A^+_(_a_q_) + B^-_(_a_q_) + C^+_(_a_q_) + D^-_(_a_q_) #\rightarrow#A^+D^-_(_a_q_) + C^+B^-_(_s_)

वरील समीकरणामध्ये  A+ आणि  Dया आयनांमध्ये संपूर्ण विक्रियेदरम्यान कोणताही बदल होत नाही, म्हणून यांना ‘लक्षणी मूलभूत आयन’ (spectator ion) असे म्हणतात. तेव्हा लक्षणी मूलभूत आयनांना वगळून निव्वळ आयनिक समीकरण मिळवता येते.

C^+_(_a_q_) + B^-_(_a_q_)#\rightarrow#C^+B^-_(_s_)

काही द्रावणे एकमेकांत मिसळली असता त्यांच्यात विरघळलेल्या घटकांची रासायनिक अभिक्रिया होऊन अविद्राव्य घन पदार्थ द्रावणातून वेगळा होतो. यालाही अवक्षेपण म्हणतात. उदा., सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात सोडियम क्लोराइडाचे द्रावण मिसळल्यावर घन सिल्व्हर क्लोराइड वेगळे होते म्हणजे अवक्षेपित होते.

AgNO_3_(_a_q_)+NaCl_(_a_q_)# \rightarrow#NaNO_3_(_a_q_) +AgCl_(_s_)

                                                                                सिल्व्हर नायट्रेट    सोडियम क्लोराइड      सोडियम नायट्रेट    सिल्व्हर क्लोराइड

उपयोग : (१) गुणात्मक विश्लेषणामध्ये (qualitative analysis) अवक्षेपणाचा उपयोग होतो. (२) मूलद्रव्य निष्कर्षणासाठी अवक्षेपण पध्दती वापरतात. उदा., सागरी पाण्यामधून मॅग्नेशियमचे निष्कर्षण. (३) पदार्थातील अशुध्द पदार्थ काढून टाकून शुध्द पदार्थ मिळविण्यासाठी अवक्षेपण प्रक्रियेचा उपयोग औद्योगिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात होतो. (४) साबण तयार करताना साधे मीठ घालून द्रावणातील साबण अवक्षेपणाने विलग करतात. (५) रेयॉनासारख्या कृत्रिम तंतूंचे औद्योगिक उत्पादनही अवक्षेपणानेच केले जाते.

 

 

 

 

 

 

समीक्षक : श्रीनिवास सामंत