भाण : (जन्म.१६९८- मृत्यू.१७५५). साहेब. गुजरात- सौराष्ट्र मधील रामकबीर संप्रदायाचे कवी. निवास चरोतर येथील कनखीलोड. ञाती लोहाणा. वडिलांचे नाव कल्याणजी,आईचे नाव अंबाबाई. षष्ठमदासाचे शिष्य. संप्रदायात त्यांना कबीराचा अवतार मानले जायचे. ते आपला पुत्र भीमदास याच्यासहित ४० शिष्यांची फौज तयार करून गुजरात-सौराष्ट्र या भागात फिरून लोकबोलीत उपदेश करीत असत. त्यांच्या गुजराती-हिंदी पदात ज्ञानमार्गी काव्यपरंपरेनुसार पारिभाषिक संज्ञेमधील रूपकात्मक निरूपण दिसून येते. तसेच कित्येक पदात पौराणिक पात्रांचा आणि तत्कालीन लोकजीवनातील प्रचलित दृष्टांताचा अध्यात्मबोधासाठी केलेला उपयोग लक्षणीय आहे. भाण यांच्या रचनांचे संपादन अलीकडील अभ्यासकांनी केले आहे, त्यामध्ये रवि, भाण अने मोरारसाहेबनी वाणी,रविभाण संप्रदायनी वाणी  इ.संपादकीय कृतींचा समावेश आहे.

संदर्भ :

  • भट्ट क्रांतीकुमार,रामकबीर संप्रदाय,गुजरात,१९८२.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा