महाराष्ट्रात व कर्नाटकात बैलपूजेनिमित्त साजरा केला जाणारा एक हिंन्दू सण. सर्वसामान्यतः श्रावणी अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे.या दिवशी बैलांना सजवून-रंगवून त्यांची पूजा करतात. त्यांना आरती ओवाळतात व पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवितात. गावातील सर्व बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढतात.काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही लावतात.घराल बैल नसतील, तर मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी शेतकरी बैलाकडून कोणतेही काम करून घेत नाही.बैलांना दैवत मानून त्यांची वर्षातून एक दिवस पूजा करून शेतकरी बैलांविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांच्याबद्दल पूज्यभाव व्यक्त करतो.

या सणास दक्षिण महाराष्ट्रात ‘बेंदूर’ असेही म्हणतात. या सणामुळे धनधान्याची व गोधनाची समृद्धी होते, अशी समजूत आहे. पशुपूजेच्या ह्या प्रकाराचे मूळ मानवाने ज्या काळात पशुपालनास आरंभ केला, त्या प्राचीन अवस्थेत असणे शक्य आहे.

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा