द्विदलिकित वनस्पती

सपुष्प वनस्पतींच्या बियांमध्ये भ्रूणाला दोन बीजपत्रे असल्यास त्या द्विदलिकित वनस्पती होत. या गटात सु. १,९९,३५० जाती आहेत. या वनस्पतींची मुळे सोटमूळ प्रकारची असून पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. फुलांचे भाग चाराच्या किंवा पाचाच्या पटीत असतात. ज्या सपुष्प वनस्पती द्विदलिकित नसतात त्या एकदलिकित असतात.

द्विदलिकित वनस्पती आणि एकदलिकित वनस्पती यांच्यातील ठळक भेद पुढीलप्रमाणे आहेत.

वैशिष्ट्ये एकदलिकित द्विदलिकित
प्रत्येक फुलातील भागांची संख्या ४ किंवा ५
परागकणावरील खाचा किंवा छिद्रांची संख्या
बीजपत्रांची संख्या
खोडातील संवहनी पूलाची संरचना विखुरलेली सकेंद्री पूल
मुळे आगंतुक सोटमूळ
शिराविन्यास समांतर जाळीदार
द्वितीयक वाढ नसते होते

द्विदलिकित वनस्पतीचा प्रसार विविध प्रकारांनी होतो : जनावरांमार्फत, पक्ष्यांमार्फत, वाऱ्यामार्फत, पाण्यामार्फत होतो. या वनस्पती उंचही असतात.फुले आकर्षक व मोठी असतात. द्विदलिकित वनस्पतीच्या गटांमधील अनेक फुले आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. उदा., गुलाब, जाई, मोगरा, चाफा इत्यादी.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.