टरकाकडी : (हिं. गु. म. काकडी सं. लोमशी, मूत्रला,ग्रीष्म-कर्कटी क. दोड्डसंवति इं. स्नेक कुकंबर लॅ. कुकुमिस मेलो, प्रकार युटिलिसिमस कुल-कुकर्बिटेसी).ही ओषधीय वेल सर्व भारतात (विशेषतः पंजाब व उत्तर प्रदेश) लागवडीत आहे.हिची सामान्य शारीरिक लक्षणे कुकर्बिटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत.फळे ३०–३५ सेंमी. लांब,दंडगोलाकृती,हिरवी,फिकट हिरवी साल गुळगुळीत अगर शिरायुक्त,कोवळेपणी लवदार कच्ची व पक्व फळे (गर्द नारिंगी) खाद्य कोशिंबिरीसारखे पदार्थ फळांपासून बनवितात.बिया लहान व चपट्या असून मिठाईत वापरतात.फळांतील मगज (गर) गोड, आंबट किंवा कधी कडू असतो.बियांतील तेल व पीठ खाद्य व औषधी असून डाळिंब्यांपासून उत्तेजक पेय बनते.तेल मूत्रल (लघवी साफ करणारे) व मुतखड्यावर उपयुक्त असून मेंदूस व शरीरास चांगले असते.बिया रेचक व ज्वरनाशी कच्चे फळ स्तभंक (आकुंचन करणारे),शीतक (थंडावा देणारे),पित्तविकांरावर उपयुक्त,चविष्ट पण पचनास जड,वातकारक व कफकारक असते.पक्व फळ पौष्टिक,दीपक (भूक वाढविणारे),श्रमपरिहारक,तृषाशामक (तहान शांत करणारे) असते.हिचे मूळ गर्भाशयाच्या वेदना (गरोदरपणी) कमी करते.

टरकाकडी (Cucumis melo)

हा काकडीचा प्रकार असल्याने जमीन,खत,पाणी,मशागत वगैरे काकडीप्रमाणे.उन्हाळ्यात व पावसाळ्यात लावतात लागणीपासून दीड-दोन महिन्यांत फळे येऊ लागून पुढे महिन्यात दीड महिन्यात ती तयार होतील तशी व जून होण्यापूर्वी काढतात.हेक्टरमधून ४,०००–५,००० किग्रॅ. उत्पन्न मिळते.

This Post Has 2 Comments

  1. छान नोंद

  2. धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content